भूत भाग :२

 भूत : भाग २

माझी आई सांगायची आपल्या पत्रिकेत ३ 'गण 'असतात, 'माणूसगण', 'देवगण,', 'राक्षसगण ', तूझ्या (माझ्या)पत्रिकेत देवगण आहे. 

माणूसगण ला भूत दिसतात , घाबरवतात, आजारी पाडतात. इजा करतात, देवगणला दिसतात, पण स्वत:चा प्रभाव पाडू शकत नाही. घाबरवू शकत नाही. आणि राक्षसगणासमोर  प्रभावहीन असतात. त्यांच्यापुढे भूताची मात्रा चालत नाही.मला ,तुझ्या पत्रिकेत  'देवगण 'आहे म्हणायची.... 

               आम्ही सुट्टी पडली की लगेच मामाकडे जायचो. तिथे मराठी शाळेला आमच्या नंतर सुट्टी पडायची, शाळा सुटली की मोठी मुल तिथे क्रिकेट खेळायला जायची व आम्ही पहायला.... 

 शाळेच्या मागे एक गल्ली एवढे अंतर सोडून डोंगर सुरू होत असे, डोंगरावर गच्च झाडी व मोठाले दगड होते. आम्ही त्या डोंगरावर मधमाशी चे पोळे शोधायला जात असू, छोटेखानी मैदानात एक बटन चाफ्याचा खूप मोठे झाड होते. लागूनच रस्ता होता. मुल रस्त्यावर क्रिकेट खेळत व आम्ही झाडावर बसून रन्स मोजत असू. एकदा खेळ पहात असताना, झाडावर चढ उतर करत  खेळत असताना,, झाडावरून डोंगरावर सफेद साडी नेसलेली बाई झुडपात दिसली, ती आम्हाला खूणा करून बोलवू लागली प्रथम आम्हाला काही कळलेच नाही, गावातील मुले , आम्ही देखील गावातील प्रत्येक स्त्री ओळखत होतो. मग ही नविनच स्त्री कोण होती? गावाबाहेरून कुणी येण शक्यच नव्हतं, नंतर ती बाई एका मोठ्याला दगडावर येवून बसली व आम्हाला खुणेने बोलवू लागली आम्ही मोठ्या मुलांना सांगायला म्हणून मागे वळून पाहिले तर मुल घरी निघून गेलेली. लक्षात येई पर्यंत अंधार पडलेला. आम्ही ६-७जण झाडांवरून उतरेपर्यत धीर धरला. व मग सर्वानी जोरात घरी धूम ठोकली. मामांनी विचारले इतक्या जोरात पळत का आलात. आम्ही घडलेली हकीगत सांगितली. तुम्ही घरी येताना आम्हाला आवाज नाही दिलात ? आम्हाला तिथेच टाकून आलात ? आम्ही सर्व एका सुरात म्हणालाे. खूप दिवस आम्ही शाळेवर खेळायला न जाता, मोर्चा दुसरीकडे वळवला. ... 

           नंतर काॅलेज जिवना पर्यंत भूतांच्या गोष्टी ऐकण्याखेरीज माझ्या जिवनात काही भूतांचा शिरकाव झाला नाही.

 असेच एकदा मामा आमच्या कडे रहायला आला होता. तो मर्चंट नेव्ही मध्ये होता. त्याने त्याच्या जिवनातील अनुभव कथन केला..... 

त्यांची बोट बर्फाळ प्रदेशातून जात असताना बर्फ फोडून बोट पूढे जात असे .बर्फ रात्री चमकत असे, व त्यावरील प्रकाश परावर्तित होवून बोटी भोवती संपूर्ण धुके सदृश पांढरे वलय तयार होत असे, व त्यात कड्याक्याची थंडी कुणीही रात्री कामाशिवाय केबिन बाहेर पडत नसे अशा वेळी त्यांना केबीन बाहेर लहान मुलांचे, पूर्ण परिवाराचे वावरणे, किंचाळणे, रडणे ऐकू येत असे. कदाचित त्या आभासी प्रतिमा असू शकतील.काहीनीं चुकून दार उघडायचा प्रयत्न केला तर त्यांना जोरात बाहेर  खेचले जायचे, मग आतील मंत्र बोलून रामरक्षा हनुमान स्रोत्र ,इतर धर्मातील मित्र त्यांची प्रार्थना म्हणत आत खेचायचे. हे तो मला सांगायचा कारण, मी त्याला, मला मर्चंट नेव्हीत जायचे आहे.म्हणून  सांगायचे. तारुण्यात एक उर्मी असते. मी एक मुलगी असून मुक्त, धाडसी विचारांची होते. मी त्याला मला मर्चंट नेव्ही बद्दल जाणून घ्यायचे आहे सांगायची... व तो मुलीसाठी ते श्रेत्र फारसे चांगले नाही सांगायचा.

 जे काही होण्यासाठी ,बनण्यासाठी आपण आपले मनोबल उंचावतो ते पुढील आयुष्यात नक्कीच कामी येते. 

        काॅलेज मध्ये आम्ही एका मैत्रीणीच्या घरी गेलो. गप्पा टप्पा चालू झाल्यावर ती कुठेतरी पलँचेंट गेम शिकली होती. आम्ही एकमेकांना तयार करून एका बोर्ड वर एक नाण ठेवून  त्यावर सर्वांनी बोट ठेवून ते नाण पूढे मागे करत होतो. डोळे बंद करून आत्म्याला बोलवायचे होते, आम्ही सर्वजण असे करत होते. नंतर ते नाण आपोआपच आपले बोट न हलवता पूढे मागे होत  होते कुणीतरी आमच्या पैकी खेचत असेल असे मला वाटले. ते मला स्पष्ट जाणवले नाही.मग चहा पार्टी करून आम्ही घरी परतलो. त्यानंतर मी भूत बित साफ विसरून गेले. 

        लग्नानंतर आम्ही मोहल्ल्यात रेंट वर रहायला गेलो. बलाँक मोठा होता. पण बंद होता. आम्ही साफसफाई करून राहू लागलो त्यांचांच बाँक्स पलंग होता. आधी तिथे राहणारे आमच्यासारखेच कपल होते. व  पती आय ए एस परिक्षा पास झालेला होता. त्या पंलगात खूप सारी पुस्तके होती एम पी एस सी ,यूपी एस सी अभ्यासक्रमाची. मी ती एकटीच घरी असताना वाचायची .एकदा एका पुस्तकातून उलटे मोठे स्वतिकचे पूजा केलेले चित्र पडले. उलटे स्वस्तिक अशुभ असते पण फाडूनही टाकता येत नाही. काय करायचे, मग दूपारी देवळात घेवून गेले. तर तिथे खूप माणसे त्यांनी ठेवताना पाहिले व हे काय म्हणून ओरडले तर.... मग एका छोट्याशा देवळात ठेवून हुश्श केले ,जणू काहीतरी मोठा अपराधच केला..... 

नंतर मला हळूहळू स्वप्न पडू लागली काही स्वप्न खूपच मोठी ,   एकदा नवरा कामावर गेल्यावर माझा डोळा लागला, मला जोरजोरात कसला तरी आवाज येत होता. मी जागी झाले. सपूर्ण अंग घामाने थपथपलेले, खिडकीतून येणारी सकाळची उन्ह माझ्या चेहर्यावर पडली होती.  सकाळचे नउ  साडेनऊ वाजले होते. मी कानोसा घेतला तर टाकीत फोर्सने पाणी भरले जात होते आणि त्याचा आवाज होता.... 

असेच एकदा नवर्याने आपण आज सासरी जावूयात तयार रहा सांगितले. मी गजरा घालून छान साडी नेसून तयार होवून राहीली व साधारण ४ वाजता आम्ही घरी पोहचलो १ तासांने मला मासं जळण्याचा वास येवून अस्वस्थ वाटू लागले मी विचारल्यावर मागे राहणारी लोक मटण वगैरे भाजत असतील सांगितले. मला तो वास सहन होईना... मी अस्वस्थ झाले. आम्ही घरी परतलो. 

एकदा रात्री मला कुणीतरी मी पूजा करत असलेले देव फेकलेले स्वप्न पडले, सकाळी पहाते तर खरच सर्व देव खाली पडले होते. 

आमच्या बिल्डिंग च्या बाजूने बांगच्या स्पिकरचे तोडं होते. सकाळी मला त्या बांगचाही त्रास होवू लागला. त्या, लोकांना कसं कळल काय माहीत पण त्यांनी स्पिकरचे तोड  दुसर्या दिशेला वळवले. 

एकदा रात्री सैतानासारखं काहीतरी आमच्या घरात घुसू पाहत होते , पण त्याला घुसता येत नव्हते म्हणून त्यांनी खूप  तुफान केलं, सराळी पाहील तर बाहेर ठेवलेले कचर्याचे डबे पडलेले होते. शेजारची  कुत्र्याने पाडले असतील. म्हणाली. मला जागा बदलावीशी वाटत होती. पण त्याच बजेट मध्ये आम्हाला दुसरी  जागा सापडत नव्हती. .........


क्रमंश. 


वर्षा प्र पाटील.©®

९८१९४०६८१३

बीएस सी डी एम एल टी

उरण

१०/८/२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4