होळी
होळी
शाळेच्या घंटेचा टिणटिणाट झाला, दरवाजाच्या पाशीच रंजीचा हात धरून उभा होतो. सुसाट घराकडे पळालो, आज्जी परसदाराकड चिंचोके भाजत बसली व्हती. मी इकडे तिकडे पाहिलं आज्जीला म्हंटल आय कुठं दिसेना आज्जी म्हनली सुकड गोळा करायला दोग बी गेल्यात , रंगीला विचारले चल रानात जाउ ती म्हनली नग ती चिंचोक खाणयात रमली व्हती मी आज्जीला म्हनल, मी ,बी जातो,
रान मला लय आवडायचं रानात काय बी कमी नसायच कानात वारा भरल्यागत आमी धावायचो , कयर्या, चिंचा बोर, जांभळ, रांजण सुकड,, आवळा, करवंदा, खिस भरून शाळेला न्यायचो, बाप फळ, आनी सुकड नेवून बाजारात विकायचा, येताना पिंठ नी गुळ आणायचा भाकरी नी गूळ खावून शाळेला जायचो, कधी गावात काय विकला की कणी गावाची ,आज्जी त्याची पेज बनवायची, कधी तांदूळ गावला तर चिंचेचा आंबट नी भात, बापाला कधी रानकोंबडी गावली, तर माराचा नाय घरी आणून कवटा(अंडी)उबवून बाजारान पिला विकायचा, कोंबडा असला की मोठा कराचा नी पैसे गावे पर्यत तसाच ठेवाचा ,पैसा गावला की बाटली, तांदूळ ,नी मसाला आणाचा , कोंबड्या चा रसा नी भात आम्ही नाकाशी पाणि येईपर्यंत खायचो, बाप पीवूनशी आडवा पडायचा ,पण एकदम गरीब, चोरी करूनशी ,झगडा करूनशी क़़धी काय आणला नाय, अंडी उबवून नाहीतर भाजून खायला लय मज्जा यायची, पण आस देयाची नाय विकली की पैसा पीठ तांदूळ गावाच
रान आमचा पोटाला आधार होता, आमी वानरा वानी झाडावर चढाचो, नी हरणाच्या वानी धावाचेा, पायाला भिंगरी बांधून पळाचो,
रानात माय माय बोंबलत सुटलो नी पोरार म्हनूनशान बापाने हाक दिली , बाप नी आयस ऐनाच्या झाडाच्या बुधांशी बसलेल,बापाने वर मान केली नी बोटान इशारा केला, म़धीचा एवढा मोटा पोळा, माझ्या तोंडाशी लाळ टापकाला लागली
बाप म्हनला होळी आलीया ,
मी इथे तिथे बघीतले, सुक्या काटीचा भला मोठा बारा ह्याेता. टोकाला त्याच्याच एका लांब काटीला रानटी कोंबडी टांगलेली मध्येच कलकलाट करत होती, आय़शीच्या ओटीत ७-८झाडीत गावलेली अंडी ,नी ,कुत्र्याची छत्री,फोफडं,(आळंबी, मशरूम) नी वरती मदीचा पोळा,...
कसा काढाचा बाप चिंतेत ,.जवळच पाण्याचा नाला शोधला बापाला म्हनल चढ वर मी आलूच अंगाला कापडाच्या दोन बाह्या एकत्र गावल्या गाठ घातली, चार तान घेतलं कापड्याच्या बाहीला, गळ्याला गाठ घालून एक ताना गाठीच्या कोनशीला अडकून लांबचक काटक्यास बांधून पाण्यात डुबकवल नी बापाच्या मागून सरासरा ऐनाचा टोक गाठला ,बापाला म्हनल हळूच डागळी तोड नी ओल्या बेाचक्यात टाक बापाने तसं करताच बेचक्यात तेाडं तान्यान आव़ळलं .खाली आलेा नी पाणवठ्यावर धाव घेतली, माशी डसू नये म्हनूनशान मी नी बा डुंबलो, बाप माझ्या वर लय खुश झाला पोरामु़ृळे इतका मद गावला, बापाने मला खाद्यांवर बसवलं नी आम्ही वाट उतरू लागलो.
घरी आलो पोटात आग पडली व्हती, चुलीत दोन कवटा(अंडी)भाजली नी रंजी झोपली तिच्या बाजूला पडलो,
कधीतरी जाग आली बाप नी आस टोपात मद काढत नी
ती बाटलीत ओतत होते, एक बाटल पोरांसस्नी राहू द्या,
उद्या सकालच्याला पाटलाचे जावून विकतो ,नाही जमल तर बाजारान जावूनश्यान विकेन. बाप बोलला. मी गावातला पाटील आठवू लागलो।.........
गावात पाटलाला ताडाची झाड तोडाची व्होताी,माझा बा ला बोलावलं आट दिस झाड तोंडाला बाप नी आस ,आज्जी , मी ,रंजी सालपा गोळा करायला पाटलाच्या ओट्यावर दूपारी जवन,गावाच .डाळीचा आंबट, भात पापड, नी लोणची, आधाश्यासारखा खायचो, ८ दिवसानी कणी नी बक्कळ पैसा गावला, पाटलाच्या ओटीवर खेळलो, पाटलांनी बापाला कागूद दिला नी शाळेच्या मास्तरांना नेवून दे, शाळेतून पाटी पुस्तके मिळतील ,कपडे मिळतील पोरांना शाळेत घाल, सांगितलं
आमच्यासाठी पाटील देवमाणूस होता.
आज्जी बापाला बोलली पैश्या नी खोपटी बांध
बाप ताडपत्रांच ओझे घेवून घरला निघाला.
बाजारात जावून मेणकापड आणला, नविन कापड आणली दारूची बाटल आणली. गोड नी पीठ आणलं ताडक टाकून आम्ही सगळ्यानी मोटा खोपट बनवला, बाप कागूद घेवून मास्तरांकड गेला, शाळेत दाखला मिळवला.ह्या पावसाळ्यात खोपटात पानी गळणार नव्हतं ,विचारात कधी गुंगी आली कळलाच नाय.
सकालच्याला शाळेचा सवाल नव्हता, शाळेच्या कापडात च मद गोळा केलेला, दोनच कापड व्हती पाण्यात डुंबलो, बाप आस नी मी पाटलाकड मद ,कवटा,विकली .पाटलानी तांदूळ नी पैका दिला मी शाळेत जातूतर मला गणती येत व्हती म्हणून बाप खूष होता नी सुकड कुत्र्याच्या छत्र्या घेवून बाजारात गेलाो. येताना बापाने कापड, रंग, मसाला, दारू, डाळ पिठ घेतलं होळी होती नव्ह
गावात शिमग्याचा आरोळ्या वाजत होत्या, पाटलाकड रागोंळ्या पताका, बाशिंग बांधून सोंग का़ढली जात होती.
आज्जी नी आय चुलीवर पिठ डाळ गेोड घालून काय बाय बनवत होती, बापान आणलेली नविन कापड घालून आमी होळीला निघालो आसीनी ताट होळीला दावला नी परत प्रसाद म्हणून माघारी घेतला. पहिलाच आमी देवाला घास देत होतो. शिमगाच्या सोंगात फिरलो नाचलो, सपाटून भूक लागली बापाला चल घरला म्हटलं नाही निघत तर रंजी ला खूण केली. तिन भाेकाड पसरवला आणि मग नाईलाजाने बाप निघाला, घरी आज्जी नी भात, डाळ नी डाळीची गोड घालून केलेली, मद विकून मदासारखी केलेली गोड कोंडाळी खाल्ली पहिल्यांदाच खात होतो. बाप खूश व्हता, उद्या सकालच्याला परत डब वाजवावी नी पाटलाच्या वाड्यावर पोस्ट, पैका मागायला...
डब घेवून नाचलो,गावात फिरलो भूक लागली तसा घंरला फिरलो.
दारू पिवून झोकांड्या घेत असलेला बाप नी पाटलांनी दिलेली पोस्ट घेवून घरला आलेो, थोबाड कापड रंगानी माखलेली घरच्या मटनाचा वास नाकात शिरलेला ,......
मटनाचा रस्सा नी भात खाताना, रानात नदीचा पोळा शोधायला जायचं नी मान वर करून झाडावर पोळ शोधायचा,
एकच इचार डोसक्यात घोळत होत, ......
टीप:
आदिवासी, वारली भाषेत लिहीताना autocorrection चा त्रास खूप झाला. परत परत शुद्ध भाषेत लिहील जात होते.
कृपया आवडल नाही तर डिलीट करू नये पूर्ण लिखाण डिलीट होत. तसेच इतर ठिकाणी उतारा, किंवा पूर्ण लिखाण छापल्या स किंवा forward केल्यास नावासहीत करावे।
धन्यवाद.
Varsha Patil. ©®
Bsc(micro) DMLT.
9819406813
Uran. 2:20am
4/2/2020

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा