सोनेरी केसांची राजकन्या भाग २
सोनेरी केसांची राजकन्या भाग:२
राणीला कळून चुकते, राज्यात परत जाणे शक्य नाही. कारण युद्ध संपले असले, तरी राज्य कुणाच्या ताब्यात असेल काही माहीत नाही. त्या वाट धुडांळत वनात पोहचतात. तिघी मिळून आदि जीवन व्यतीत करू लागतात. राजकन्या थोडी समजदार झाल्यावर राणी तिला आपल्याजवळील ७ बिया व एक कट्यार देते. व सांगते ह्या बिया रूजव व कट्यार स्वत:जवळ बाळगून स्वरक्षण कर. . राजकन्या सांगितल्या प्रमाणे करते. राजकन्येबरोबर ती सात झाडे मोठी होवू लागतात. ती इतकी वाढतात की त्यांचे शेंडे खालून दिसत नाहीत जणू आभाळाला टेकलेले. राजकन्या, दासी व राणी ह्यांच्या संस्काराखाली वाढू लागते. ती तारुण्यात पदार्पण करते. व अतिशय सुंदर दिसू लागते. तिचे डोळे निळेभोर असतात. केस सोनेरी, पायघोळ असतात. कान्ती गोरीपान असते. दृष्टीस पडली तर कुणालाही लुभावेल अशी....
राणीला तिची काळजी वाटू लागते. तिचा भाऊ राजकुमार गादीवर बसला असेल ,आणि त्याच्या दृष्टीक्षेपात ही पडली तर.....
भावाबहिणीचे लग्न होईल व सर्व अनर्थ होईल.
मुलीच्या चिंतेने राणी आजारी पडू लागते, तिला समजते आपण आता बरे होणार नाही. ती राजकुमारीला जवळ बोलावले,आपल्या तबेल्यात एक छोटे सोनेरी केसांचे अश्व होते. आता ते मोठे झाले असेल. ते राजकुमाराला खूपच आवडत असे.जर ह्या वनात सोनेरी केसांचा घोडेस्वार आला .
तर तो विजय नगरीचा राजकुमार आहे का ?विचार आपण त्या पासून कसे तुटले होतो. ह्याचा उखाणा घाल. तुम्हा भावा बहिणीची ओळख पटली ,की तो तूला राज्यात परत घेवून जाईल. व तूझा वनवास संपेल, पंरतु जर का त्याने तूला लग्नास मागणी घातली तर तू ह्या उंच झाडावर चढ..एवढे सांगून राणी मरण पावते.
आता वनात फक्त राजकुमारी व दासी जिवन व्यतीत करू लागतात. एकदा राजकुमारी केस धुवून नदीकिनारी त्यांना वाळवत बसते.
झोपडी बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येतो. दासी बाहेर येवून पाहते तर १०-१२सैन्याबरोबर राजकुमार असतो. तो दासीला दरडावून विचारतो ह्या झोपडीत सोनेरी केसांचे कोण राहते. त्या केसांची गुंत माझ्या घोड्याच्या पायात अडकली, व माझ्या ह्या जातीवंत घोड्याच्या पायाला इजा झाली आहे. तो नीट पळू न शकल्यामुळे आमची शिकार निसटली. ह्याची शिक्षा म्हणून तुम्हाला चाबकाचे फटके खावे लागतील. दासी ने घाबरून इथे असे कुणीच रहात नाही सांगितले. तेवढ्यात राजकुमारी नदीवरून परतते.
क्रमंश:
Varsha patil. ©
Uran (navi mumbai)
9819406813
1:10 am
21/5/20

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा