स्वच्छता:
स्वच्छता:
आज थोडासा वेगळा विषय कारण प्रचंड जनसंख्या असलेला आपला देश आणि मी थोडासा कचरा केला तर काही देश अस्वच्छ होत नाही अशी मानसिकता असलेले लोक, आणि त्यातून तयार होणारे प्रचंड कचर्याचे ढीग त्यातून होणारे 'प्रदूषण' व निर्माण होणारी 'रोगराई 'ह्या विषयावर प्रथम प्रखरतेने विचार मांडले ते गाडगेबाबा यांनी ते कुणाच्याही दारात कचरा दिसला की खराटा(माडाच्या झाडाच्या झावळ्यांच्या काडीने तयार केलेला झाडू(बूतारा)) घेवून झाडलोट करीत. पण तेव्हा अशिक्षित लोकांना विचार सांगून नाही, तर कृतीने पटवून द्यावे लागत, हा धडा लहानपणी पहिलीच्या पुस्तकात आम्हाला आ़भ्यासाला हेाता . म्हणजे संस्काराचे बाळकडू लहानपणापासूनच मिळत असे ,अन तेही सरकारकडून असं असताना का नाही लागत आपल्याला स्वच्छतेच्या सवयी! आपल्याला प्रदूषण नसलेले स्विझर्लड आवडत, चकचकीत हाँगकाँग आवडत, पण अस्वच्छता, गरीबी, प्रचंड लोकसंख्या असलेला भारत नाही आवडत . का? मी मास्टर (पदवी) भारतात झालो. पण पगार मात्र डॉलर किंवा पाउंड मध्ये पाहीजे,का? पैशांनी उच्चभ्रू राहणीमान मिळत, आणखी लहानपणा पासून न आवडणारी 'अस्वच्छता' साफ करायला नोकर ठेवता येतो. (अमेरीकेत,स्वतःची कामे स्वत :करावी लागतात)मला स्वच्छता आवडते .पण ती मला कुणाकडून तरी करून घेता आली पाहिजे, मला ती करावी लागू नये. एवढीच मानसिकता!
घरात सामान्य गृहीणी सर्व घर स्वत:च साफ करतात, एखादा दिवस कंटाळा केला तर तिलाच दुसऱ्या दिवशी हातात झाडू घेवून दुप्पट साफसफाई करावी लागते. तिला नोकर, मदतनीस मिळत नाही, मिळालीच तरी पैसे द्स्वयावे लागतात व स्चच्छता हवी तशी असेलच असं नाही आज कामवाली म्हणून स्वच्छता वाटतं अशी कामवालीलाच शाबासकी मिळते. आणि त्यातच समाधान मानावे लागतं,
मोदी सरकारने ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, कचर्यापासून खत निर्मिती, स्वच्छ गाव अभियान स्पर्धा राबविल्या. तरी आमच्या गावातील शहरातील, देशातील अस्वच्छता संपली नाही. कारण मानसिकता बदलली नाही. एखादा सीनियर सिटीझन पहाटे समुद्र किनार्यावर कचरा उचलताना दिसतो. सार आयुष्य नोकरी करण्यात, लोकलचे धक्के खाण्यात गेलं. आता फावल्या वेळात राहीलेले स्वच्छतेचे काम करतोय. स्वत:पासून सुरूवात करतोय म्हणतोय हे ही नसे थोडके. कारण तरूणांना घरात वयस्कर गृहस्थांची अडचण होते. तेही रिकाम टेकडे समुद्रावर फिरत साफसफाई करतात. 🙏🙏(क्षमस्व)
आपण नविन सोसायटीत रहायला गेलो ,की प्रथम काय पहातो, सुरक्षारक्षक आहे की ,नाही? पाणी मुबलक आहे कीं नाहीं ? आणि सफाई कामगार आहे की नाही? . सर्व छान असलं की आपल्याला उत्साह येतो. हवी असलेली स्वच्छता मिळणार असतात. थोडे दिवस छान जातात. आणि मग लक्षात येते, इमारतीच्पा कोपऱ्या कोपऱ्यात साचलेला कचरा, भिंतीवर थुंकलेल्या पानाच्या पिचकार्या, आता बिल्डिंग मध्ये कुणी पान खाणारे रहाते नसते. मग कुणाला माहीत? कोणाचे पाहुणे भिंती रंगवून गेले ते...
आपली स्वच्छता ही आपल्या ब्लॉक पुरती, सिमित असेल. ती सोसायटीत, सुदधा दिसत नसेल तर, गावात ,शहरात ,आणि देशात ,कुठून दिसणार....
आमच्या सोसायटी मध्ये जवळ जवळ १२५ फ्लँट आहेत. त्यापैकी किमान १०० भरलेले, इतक्या फ्लॅट चा कचरा दररोज साफ करणे , तेवढ्याच इमारतीचा परीसर रोज सकाळी झाडणे, ५,चार मजली विंग झाडणे, ,महिन्यातून एकदा ५ विंग ़धूवून काढणे, दररोज इमारती खाली उभ्या असलेल्या चारचाकी धुणे ही काम श्रमाची आहेत, आणि एवढी काम आमच्या इमारतीचा सफाई कामगार करतेा . स्वच्छता अभियान आमच्या इमारती मध्ये चालतं मग मला एवढा मोठा लेख ह्या विषयावर लिहावसा का वाटला.
आमच्या समोर एक क्रिस्ती इंग्रजी माध्यमाच्या बाई (टिचर) रहायला आली. मला जरा साफ सफाई करायची आहे तर झाडू द्या (आपली केरसुणी दुसऱ्यांना देवू नये आपली लक्ष्मी जाते) मी नविन शेजारी मिळणार ह्या उत्साहात मागेल ते स्वच्छता करण्यासाठी दिल, (झाडू बादली सूप पाणी इ. ) . दिवाळीच्या पहिल्या दिवशी माझी बेल वाजवून मला म्हणाली, बाहेर ठेवलेल्या तुमचा केराचा डबा स्वच्छ नाही, माझ्याकडे पाहुणे येणार आहेत तर ते तुम्ही कठड्यावरून काढा. माझे केराचे दोन डबे होते दोन दिवस मी आजारी होते. त्यात "दिवाळी" जेम तेम घरातील स्वच्छता केली. पण बाहेरचे ओल्या कचर्याचे डबे साफ करणे राहून गेले.(दूसरे नविनच होते) मी म्हटलं अस्वच्छ डबे सफाई कामगाराला फेकून द्यायला सांगायचं होतीस, मला काही वाटलं नसतं, त्या साठी सणाच्या दिवशी बेल वाजवून सांगायची काय पद्धत, ? तर म्हणते तुमचं ग्रील पण स्वच्छ नाहीत, तिचे पाहूणे माझ्या घरात 'परिक्षण ' करणार होते का? काय माहीत पण माझ्या जखमेवर मीठ चोळले होते. मी म्हटलं मी आजारी असून घरात सफाई केलीय, तूझ्यासारखी कामवाली कडून नाही करून घेत,
एकदा सकाळी उठून पहाते तर भाजीचा कचरा दारात, सकाळ होती सफाई कामगाराने उचलून नेला मग नेहमीचंच झाले, माझा फ्लँट 'मधला,' दोघी कडेही लहान मूल पँसेज मध्ये बाळाच डायपर एकदा तर माझ्या दारात इतकी 'दुर्गंधी 'मी पोलीसांना फोन केला मला पोलीस म्हणतात :अहो तुम्ही काही पण "तक्रार " काय करताय? मी म्हटलं मी दारही उघडू शकत नाही मग मी काय करू ते सांगा, तूम्ही एकदा समज देवून पहा, मी कोण दारात घाण टाकतात ते पकडू शकली नाही, स्वत;कडे कामवाली असूनही, तिच्या कडून पँसेज साफ करत नव्हती. त्यावरून तिचीच शक्यता निर्माण झाली . कारण त्रास पण मला एकटीलाच होत होता. पण नाही म्हटलं तरी सकाळी सफाई कामगाराला ती घाण साफ करावी लागते, त्यामुळे ती देशाची, मोदी सरकारची, इमारतीची, माझी, कुणाची दुश्मन आहे ते पकडता येत नाही, पण गेले दिड वर्षभर मी हा त्रास सहन करते म्हणूनच हा लेख प्रपंच,
ह्यावर मानसिकता बदलणे गरजेचे आहे ,पण कुणाची ?आणि कशी बदलणार........
वर्षा पाटील.©®
Bsc DMLT
Uran
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा