बदला
मीही बदला घेईन म्हणते,
तूझ्या विखारी नजरेचा ,
तूझ्या बलात्कारी स्पर्शचा,
मीही बदला घेईन म्हणते
तू छाटलेल्या पंखाचा
तू तोडलेल्या लेखणीचा
मीही बदला घेईन म्हणते
माझ्या भंगलेल्या स्वप्नांचा
माझ्या विस्कटलेल्या घरट्याचा
मीही बदला घेईन म्हणते
माझ्या तुटलेल्या नात्यांचा
माझ्या नसलेल्या विश्वासाचा
माझ्या संपलेल्या श्वासांचा
मीही बदला घेईन म्हणते
ओघळलेल्या अश्रूंचा
साडंलेल्या रक्ताचा
चोरलेल्या प्राक्तनाचा
मीही बदला घेईन म्हणते......
दिलेल्या दु:खाचा
ओरबडलेल्या सुखाचा
मीही बदला घेईन म्हणते....
Varsha patil. ©®
9819406813
Bsc DMLT.
Uran
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा