फसलेली गरूड झेप
माझ्या आठवणीतून: फसलेली गरूड झेप,
जेव्हा आपण स्वत:वरच विश्वास ठेवून वावरत असतो तेव्हा इतर आपल्याकडे सांशकतेने पहात असतात, प्रथम ही पैसा कसा उभा करणार? मग हीला जमेल का? आणि नंतर काही तरी नक्कीच भानगड असणार ,कुठेतरी पाणि मुरत असणार.. मी ह्याबाबतीत पूर्ण अनभिज्ञ होते
माझा ब्रेकअप झाल्यावर मला सर्वांकडून एकच प्रश्न येत असे मग तुझ कस चालत? पैसे कोण देत, समोरच्याला दुखवावे असे मला वाटत नसे, तो त्याच्या बुद्धी प्रमाणे विचारतो किंवा त्याच काय चुकल त्याला आपल्याला टोचून बोलायचा चान्स मिळतोय म्हणून विचारतोय, पण मग एक दोघांना मी चांगलच फैलावर घेतल, म्हटलं मी लग्नाअगोदर नवर्याच्या दुप्पट कमवत होते. काय मिळाले मला संसार? अपराध नसताना दुसर्यांच्या वाटणीचा मार ,फसवणूक आणि बेकारी,असो. तात्पर्य काय मदत करण्यापेक्षा पाय खेचण्यात मराठी माणूस पूढे त्याचा फायदा मात्र परप्रांतीय नक्कीच घेतात.
एवढी मोठी झेप आणि तेही एक बाई, लोकांच्या डोक्यावर आठ्या दिसू लागल्या आणि मी पैसे कसे ,कुठून ,उभे करते ह्यावर माहीतगारांचे लक्ष
मला CA ला भेटण्याात intrest नव्हता ,कारण एक तर मला त्याच प्रयोजन कळले नव्हत, २ र असं की त्याची फी हा मला मधूनच उपटलेला खर्च मी invest करत असलेले पैसे लोन नव्हत, मी tax saving(white money) invest करत होते .कंपनी बरोबर paper sanction होवून signature करेपर्यंत मध्ये जागेचा करार करायचा होता. आणि त्या आधी जागा sanction करायची होती.furniture ची वर्णी लावायची होती. त्यासाठी मी फर्निचर मा्र्केट उल्हासनगर ला जावून फर्निचरचे भाव,मटेरीयल किती काही हव तसं बनवून काही रेडीमेड, ठरवून आली जागा ताब्यात मिळाली की आणून ठेवायचे होते तसेच instrument lab साठी किती लागतील त्याचे रेट काय आहेत हे ठरवून आले होते. हा पैसा माझा मी खर्च करणार होते. करार करताना CA ची आवश्यकता लागली तरी मधे थोडा वेळ जाणार होता. मग एवढ्यातच CA चे प्रपोजल कशासाठी? त्याही पेक्षा माझी इच्छा ,काम पूर्ण होईपर्यंत गरज वाटत नाही त्या माणसावर मला वेळ घालवायचा नव्हता ,मी कशासाठी आलीय हे तरी मला त्याला सांगता आल पाहीजे without company चा माणूस मी CA बरोबर aggrement बाबत काय चर्चा करणार? तरी सुद्धा मी CA च्या शोधात होती. 2 nd visit new mumbai try करत होते. पण मला पुण्याला जाव लागणार होत. तेवढ्यात तूम्ही दिल्लीची मेन लँब पहाण्यात intrested आहात का ❓असाल तर दिल्लीला या प्लान करून मी ह्या प्लान वर खूष झाले कुठेही फिरले नाही तरी flight नी जावून येवून 4तास व तिथे गाडीने 4तास लँब पहायला 4तास 12तास मुलीला घेवून शनिवारी रात्री च्या flight नी गेली तरी रविवारी रात्री परत . पुण्याची visit पुढे ढकलून मी दिल्ली trip fixed करण्यास सज्ज झाली. मी नक्की काय करते हे न कळत असल्याने राजकीय पक्षांच्या नजरा माझ्यावर पडल्या. मला त्रास देणे. पाळत ठेवणे. सुरू झाले मी काय करू पहात होते. एक जिद्दी मुलगी आपल्या बुद्धीला जिंकवू इच्छीत होती.
माझ्या प्रत्येक कामात नकार घंटा वाजायला लागल्या. मुलीलाही त्रास होवू लागला, माणूस जर जगायचं ठरवू इच्छित असेल तर पैसे कमवायला हवेत जर त्याला नवर्याच्या घरच्यांचा पाठबळ नसेल तर स्वत:च्या बुद्धी च्या जोरावर !कमी जास्त प्रमाणात त्याला यश येईल पण काही करूच नये हा हट्ट कशासाठी... आणि मग खोचक विचारायचे तुझ कसं चालतं ?
अनाडी शिक्षण नसलेला माणूस ही त्याच्या परीने कमावतो मग शिकलेल्या चे पाय कशासाठी ओढायचे ? करू द्यात ना प्रयत्न. त्याचे त्याला पण नाही..
मी चार वेगवेगळ्या माणसांना भेटणार होती ते एकमेकांशी किंवा कंपनीशी निगडीत आहेत की नाही हे मी समजू शकत नव्हती.का, कधी ,कसे, हे नाही सांगू शकत पण माझे पुणे दिल्ली प्रवास cancel झाले. Contactsतुटले स्वप्न भंगले. वडिलांकडून पैसे घेतले नाहीत......
ज्या marketing managerबरोबर दिल्ली ची
Visit ठरवली होती. त्यांचा फोन आला ,मँम मैने जाँब छोड दिया मैने पुछा क्यू ?उसने बोला ऐसेही खुद का बिझनेस सुरू कर रहा हूँ ।
नंतर कळलं पण नीट माहीत नाही vivo mumbai branch बंद झाली. शक्यता नाही वाटत पण असेल कदाचित! माझी marketing managerबरोबर ph a friend, what's app मैत्री दोन वर्षे होती. आता तीही संपुष्टात आली. आता न सुरू झालेल्या Institute च्या आठवणी हव्यात कशाला मी ते पेपर फाडून माझ्या स्मृतीपटलावरून काढून भिरकावल्या त्या फाडलेल्या पेपरांच्या कपटासारख्या.......
एक खंत मात्र राहीली तिसर्यांदा patho चा syllabus शिकवण्याचा chance माझ्या हातातून गेला.
समाप्त.
Varsha patil. ©
Uran (Navi mumbai)
9819406813
e mail id :Varshupatil17@gmail.com.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा