पोहा/पोहे
भात पाण्यात भिजत घालून नंतर भट्टीत भाजून प्रेशर वर गिरणीत दळून पोहे तयार करतात.
माझ्या लहानपणी, भाताचे कोठार भरल्यानंतर राहिलेल्या भाताच्या गोणी आमच्याच ओटी वर मोठ्या जात्यावर दळायला घेत, व वर्षभराचा तांदूळ दळून काडून(साफ करून) ठेवत. काही वेळेस एखादा माणूस `भात` बियाणे म्हणून किंवा तांदळा सठी विकत नेत असे. आणखी एक गोष्ट म्हणजे बादल्या, बादल्या(खूप सारा) भात भिजत घालून व उपसून प्रथम भट्टीत वं नंतर दाबाच्या पट्टीवर गिरणीत ताजे घरच्या तांदळाचे पोहे (,पोतभर म्हणजे) ४०-५०किलो दळून आणीत. ताजे पोहे मुठभर खाल्ले तरी सुरूवातीला थोडे किंचीत कडू व मग चावल्यावर गोड, असे पोहे चवीने खाल्ल्यावर पोट भरत असे. लहानपणी दूध, पोहे, साखर व जरा मोठे झाल्यावर चहा, पोहे आवडीने खात असू. तीच आमची सकाळी व संध्याकाळी शाळेतून आल्यावर न्याहरी असे. कधी कधी तर नुसते साखर - पोहे खात असू .
नंतर सिडकोने जमिनी घेतल्या व भात, व त्घा बरोबररचे पोहे बंद झाले. पण पोहेवालीकडून पोहे विकत घेवून न्याहरी कधी चपाती तर कधी पोहे झाली. तेच लहानपणी चे पोहे वांरवार भेटत राहिले.
साधारण ७-८वीत मी प्रथमच एका मैत्री कडे मधल्या सुट्टीत तिच्या घरी गेली. तिच्या आईने मी कोण ,कुठे राहते.काय विचारले ,तिची आई माझ्या आई सारखीच जाडी, गोरी ,सुंदर होती.तिने आम्हा दोघींना दूध पोहे खायला दिले. ते मला माझे बालपणची आठवण देवून गेले.
मधल्या वेळेत चहा बरोबर कांदे पोहे करताना, त्यात वाढीव म्हणून वेगवेगळे जिन्नस टाकून ते अधिक चटकदार बनवतात.
आमच्या मामाकडे आम्ही दिवसभर सुट्टीत हुंदडतअसू व संध्याकाळी खूप भूक लागली म्हणून मोठ्यांना सतावत असू तिथे सामान डायरेक्ट मुंबई मार्केट मधून आणीत. व ते महिन्या भराचे एकदाच भरलेले असायचे व पाहूणे (आम्ही सारे) आले की जिन्नस जरा लवकरच संपत असे. सगळच काही घरात असेल असं नाही. कधी तेल तर कधी पीठ कधीआणखी काय संपलेले असे. अशावेळी माझी मोठी मामी मुलांवर न वैतागता ,पोहे ,मीठ ,साखर, कांदा ,मिरची, आणि खूप सार ओल खोबरे , लिंबू, की त्यांनी पोहे नरम होत व कोंथीबीर ,टाकून दडपे पोहे तयार करून आम्हा मुलांना देत असे.
पांढऱ्य शुभ्र पोह्यांच्या अनेक रेसीपी जिवनात भेटत गेल्या.
पुण्याला मामाकडे गेले असताना मामी तिच्या माहेरी ८ दिवसासाठी गेली. मी लहान नव्हते. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले होते. मामाला मी सर्वाचें जेवण बनवेन सांगितले. पण मामांनी बाहेरून डबा लावला तू मुलीं बरोबर पुणं फिरून घे म्हणाला.
मला सकाळी तू नाष्टाल्या काही बनवशील का विचारले मी हो म्हणाली.मामेबहिणीला सोबत घेवून कांदेपोहे बनवले. तिने सर्वाना परत, परत आग्रह करून वाढले. त्यांची दोन घरे होती व खालच्या घरी मामांचे वडिल अण्णा रहात . त्यांना पोहे द्यायचे राहून गेले, मी मामे बहिणीला जी ंंमाझ्याहून लहान होती. आठवण करून दिली ,पण तोपर्यंत पोहे संपले. आता बाबांना (मामाला) काही बोलू नकोस म्हणाली. मी पाहुणी होते गप्प बसले थोड्या वेळाने मामा आला व तिने मामाला डिश भरून पोहे दिले(ती दोघांना अर्धे अर्धे देवू शकली असती पण ती म्हणाली जावू दे आता विसरलो तर...) मामाने पोहे खावून झाल्यावर तूम्ही खाल्ले का? अण्णाना दिले का?विचारले. मी आम्नाही सर्वानी खाल्ले पण अण्णा नां नाही दिले. मामा वैतागला म्हणाला मग मला कसे दिलेत त्यांना नेवून द्यायचे ना?ते वयस्कर होते व जेवणापर्यंत उपाशी राहीले. मला खूपच ओशाळल्यासाऱख झालं कारण, पोहे छान होवून सूद्धा तिला अशी चुकीची किनार लागली होती. असो.
दर शनिवारी कामावर हाफ डे असे व त्या दिवशी आई मला डब्याला कांदेपोहे,(बटाटा पोहे) उपमा, कोंथीबीर वडी असंच काही देत असे . पोह्यात वाढीव व चविष्ट पोहे होण्यासाठी बटाटे, मटार, शेंगदाणे, टोमॅटो टाकत असे, माझ्या डब्यात कांदेपोहे होते. व आम्ही स्टाफ ,जे कोणी सर(डॉ, प्लँस्टिक सर्जन)असत त्यांच्या बरोबर लंच करत असू, तेव्हा सरांनी तू मराठा, घाटावरची आहेस का विचारले ? ह्या प्रश्नावर मी थोडी गोंधळले. त्यावर ते म्हणाले शेंगदाणे हे पौष्टीक तर असतातच, पण ते घाटावर मुबलक मिळतात. मी पाहतोय की जेव्हा ,केव्हा तू कांदेपोहे डब्यात आणतेस तेव्हा त्यात शेंगदाणे असतात. म्हणून विचारले. पोह्याबरोबर मी ज्या ज्या वरिष्ठाबरोबर काम केले ते ते आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी माझ्या स्मरणात राहिल्या. प्लँस्टिक सर्जर्याकरून ते आमचं आहे म्हणणारे महाभागा पाहीले. भेटले. पण काम करताना त्यांच काम, त्याच्यातील देवपण , त्यांच मार्गदर्शन हे केवळ माझ्या बरबरच राहीले.
आम्ही रहात होतो. तिथे आमच्या वरती एक बॅचलर मुलगा रहात असे. त्याचे गावी लग्न होते पण गावी असल्यामूळे आम्ही कुणी गेलो नाही. महिन्याभरात तो बायकोला घेवून आला. तो व त्याचा लहान भाऊ कामावर गेले की ती एकटीच घरात असे.ओळख व्हावी म्हणून माझ्या आईने त्या तिघांना चहासाठी बोलवले मी बटाटे घालून पोह्यांचे वडे केले. ते एवढे खमंग व चविष्ट झाले की त्यांनी सर्व वडे आवडीने संपविले. आणि मी नव-नविन रेसीपी करण्यात तरबेज झाले.
आम्ही घरचे सारे लग्न ठरल्यावर नवर्याच्या घरी गेलो असता, त्याच्या मोठी बहिणीने पोहे केले होते. मी प्रवासामुळे किंवा इतर कारणाने अस्वस्थ झाले होते. त्यात मला पोहे खाण्याची इच्छा नव्हती. तरीही आग्रहामुळे मी खायला सुरूवात केली. त्यात साखर जास्त झाली होती. (किंवा तिखट वाटू नये म्हणून मुद्दाम जास्त साखर टाकली होती. ) पण मला मळमळू लागले. उष्टे केले तर टाकता ही येईनात तसे मला पोहे फार आवडतात. पण त्या दिवशी पोह्यांनी माझी फार दयनीय अवस्था केली.
मुलीला शाळेत/काँलेजला शनिवरी, रविवारी सुट्टी असते तेव्हा , उठणे उशीरा होते. कमी वेळात सर्व लवकर आवरायचं, म्हणजे चपाती भाजीला सुट्टी असते. त्या दिवशी कांदेपोहे उपमा असंच भरपेट जेवण असतं . माझ्या मुलीला कांदेपोहे खूप आवडतात. त्यामुळे ह्या आँपन्शला ती लगेच तयार असते.......
माझ्या आठवणीतून
Varsha patil. ©®
Bsc(micro)DMLT
8 oct 2020 (3:30pm.)
9719406813
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा