संस्कार/संस्कृती/संयम

 तीन  सं च पालन करा. कोणते?

संस्कार,संस्कृती,संयम

लहानपणापासून आपल्याला घरी शाळेत संस्काराचे धडे मिळत असतात. वर्गात फळ्यावर सुविचार लिहणे. व ते  आत्मसात करणे.,हा ही संस्काराचाच भाग. मोठ्यांचा मान राखणे. नेहमी खरे बोलणे.वरिष्ठांनी सांगितलेली छोटी  मोठी काम ऐकणे., देशप्रेम राष्टप्रेमावरील गाणी ऐकून उर अभिमानाने भरून येतो. हा ही संस्काराचाच भाग..... 

मग हे संस्कार विसरल्याने काय होतं. ?

अशांति... 

जी स्वतःला, घराला, देशासाठी विघातक

मोठ्यांना उलटून बोलणे, त्यांची काम न ऐकणे.  या तून त्यांना अपमान वाटतो ,मग ते आपल्याला समजवायला गेले की ते उपदेशाचे  डोस पाजतात.असं वाटून, यातून तणाव वाढत जातात.  हे टाळणं गरजेच आहे.  

नेहमी खरे बोलावे,  हा फक्त सुविचार नाही. त्यातून फसगत, लबाडी, गैरसमज, आणि चुकीचा संदेश ह्या गोष्टी घडत नाहीत .खरे खोटे करणे ,वाद घालणे. ह्या गोष्टी टाळतात. ,एखाद्याचे  सहज खोटे बोलण्याने  काही जणांचे आयुष्य बरबाद होते. हे सर्व टाळता येते. ताण टाळता येतो. 


संस्कृति :भारतीय संस्कृतिला  प्राचिन इतिहास आहे.  आपला देश विविधतेने नटलेला  आहे. प्रत्येक राज्याची एक बोली भाषा आहे. प्रत्येक धर्माचा आदर करणं हे संस्कृती जपल्याच लक्षण आहे. मजहब नही सिखा्ता आपस मे बैर रखना, हे इथलं सत्य वचन आहे. ईदच्या दिवशी उपवास ठेवणं, आणि अंगारकीच्या दिवशी मटन खाणं, असा एकमेकांचा धर्म घेउ नका,  एकमेकांच्या धर्माचा अपमान करू नका.  ईदच्या दिवशी शीरकुर्मा ,मटन खाउन ईद साजरी करून आम्हीही तूमच्या आनंदात सहभागी आहोत हे दाखवून द्या. अंगारकीचा उपवास करून आम्ही तूमच्या धर्माचा आदर करतो हे दाखवून द्या.

 व्यवस्थित वेशभूषा ही संस्कृति ,तीचा आदर हा संंस्कार,

एखाद्या मूलीने वेडेवाकडे कपडे घातले की तीचं निरीक्षण करून आपल्यातील सैतान जागा करू नका,आपला संयम जागृत करा. 


संयम:आपल्या रागावर नियंत्रण ठेवल्याने अनेक अनर्थ टाऴता येतात .

आपल्या कामेच्छावर आवर घातला की खूप घरं उध्वस्थ होण्यापासून वाचतील.

एखाद्याच्या एकटेपणाचा,अडचणीचा, परिस्थितीचा ,गैरफायदा घेण्यापेक्षा त्या वेळेला आपल्या विचारांना चालना द्या. ती कुणाची तरी आई ,बहीण ,मुलगी आहे.त्यापेक्षा ती माझीच आई, बहीण, मुलगी आहे आणि तिला मदतीची गरज आहे. हे ध्यानी घ्या, तिला परोपकार समजून मदत करा. आपल्या इंद्रीयावर ताबा मिळवा. ह्यातच खरा पुरूषार्थ आहे. आपल्या  सिनेमा सृष्टीत अत्याचारापासून वाचवणाराच हीरो असतो. हे ध्यानी घ्या. आपला  देश हा अधोगतीपासून वाचवणं, आपल्या देशाची शान ठेवण व आपल्या  संस्कृतीशी इमान राखणं हेच खर देशप्रेम होय. 

सिमेवर शत्रुबरोबर लढून सैन्य आपला देश सुरक्षित ठेवतात. आपण देशात तीन सं च पालन करून देश सुरक्षित करूयात.  स्त्रीच्या अब्रुच रक्षण करून तिचा आदर करूयात. 


वर्षा पाटिल.©®

9819406813

Bsc DMLT. 

Uran

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4