राजगिरा
राजगिरा;
लहानपणी माझी आई राजगिराचे लाडू किंवा चिक्की, खाऊ म्हणून बाजारातून घेवून येत असे. उपवासाला राजगिरीच्या पिठाचे थालीपिठ बनवत असे.तेव्हा खाऊ म्हणून वापरला जाणारा पदार्थ आज एवढा महत्वाचा का,? ते उपवासाला का वापरतात?
उपवासाला धान्य खात नाहीत. राजगिरा धान्या मध्ये मोडत नाही. वजनाने हलके असते .कमी चरबीयुक्त असते.आणि पौष्टीकता भरपूर असते. म्हणून........
भरपूर ऊर्जा युक्त असल्यने त्याला हिंदीत (शाही अनाज,) चौलाई व इंग्रजी मध्ये एमरंथ ग्रेन (मृत्यू ची शक्यता कमी करणारा.) सायंटिफिक नेम ऍमऱ्यांथस(Amaranthus ).
राजगिर्याच्या लाह्या,पीठ,तेल उत्तम स्त्रोत म्हणून वापरात आणतात.
राजगिर्या मध्ये ग्लूटन नसते.जे गव्हू राई व जौ मध्ये असते.सिलीयाक डिसीज पासून वाचायचे असेल तर राजगिरा उत्तम स्त्रोत.जे ग्लूटन मूळे होते.
सूज कमी करण्यासाठीही राजगिर्याचा उपयोग होतो.
कॅलशिअम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडवृदधी साठी वापरतात.
ब्लड मधील कोलॅस्ट्रोल नियंत्रणासाठी राजगिरा उत्तम स्त्रोत आहे.
राजगिर्याचे तेल हे बॅड कोलेस्टेरॉल,व ट्रायग्लिसराईड (ब्लड फॅट) कमी करते.हाय ब्लड शुगर(हायपरग्लासिमियां) बरं करते.सिरम इन्सूलिनची मात्रा कमी करते
राजगिरा मध्ये. Vitamin 'A' 2 IU/100 gm इतक्या प्रमाणात असते. जे immunity boost करते.डोक्यासाठी उपयुक्त आहे.नजर कमजोर होत नाही.
Vit E 1.19mg/100 gm असते.जे. antioxidant सारख काम करतं व कॅन्सर पासून बचाव करत.immune system strong करत.
Vit ''C’' 4.2 mg/100gm असते.जे त्वचे साठी लाभदायक असते.हे एक antioxidant आहे जे त्वचेची यू व्ही किरणापासून होणार्या हानीला रोखते.चेहर्यावरील मुरूम दूर करते.त्वचेतील कोलेजन वाढवते.
Proteins 13.56gn/100gn.लायसिन हे एक amino acids आहे जे proteins बनण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते.प्रतिकार शक्ती वाढवते.
Fiber ; 6.7gm/100gm, जे एक पोषक तत्व आहे.मलावरोध समस्यावर उपाय आहे.पचन शक्ती मजबूत करते.खूपवेळ पोट भरल्याची जाणीव करून देते.त्यामूळे अन्न कमी खाल्ल जात व ह्यात अनेक सत्व असल्याने हानी होत नाही.वजन नियत्रित करते.
Zink ,; 2.87mg/100gm zink ची मात्रा प्रतिकारशक्ती वाढवते.केसांच्यां वाढीसाठी हे उपयुक्त आहे.
इतर पोषक तत्वे/100 मध्ये
पोषक तत्व. / 100gm
Energy 371 kcak
Water 11.29gm
Lipid. 7.02gm
Carbohydrates. 65.25
Sugar. 16.8 gm
Minerals ;
Ca. 159mg
Iron. 7.6 mg
Mg. 248 mg
P. 5.57 mg
K. 508 mg
Vitaminsl्
Thyamin. 0.16 mg
Riboflavin. 0.20 mg
Niyacin. 0.923 mg
Vit B6. 0.591mg
Florate. 82 microgm
Fatty Acids;
Polysaturated. 2..778 gm
Total saturated. 1.459 gm
Monosaturated. -1.685 gm
राजगिर्यात प्रत्येक पोषक तत्व असल्या मूळे गर्भावस्थेत योग्य व पूरक आहार मानला जातो.
50 ग्राम राजगिरा दररोज खाऊ शकतो.अतिप्रमाणात दररोज खाणे. हानीकारक आहे' .ca ' bladder मध्ये stones तयार करते.
Varsha Patil©️®️
Bsc[micro]
DMLT.
9819406813
13/8/20
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा