हळदी कुंकू भाग:१

 हळदी कुंकू भाग १:                                                     नवरात्रीतील नऊ दिवस घरोघरी चालणार हळदी कुंकू, मार्गशिर्ष महिन्यातील  हळदी कुंकू  तसंच हळदी कुंकू, किंवा वाण देण्याची प्रथा मकर संक्रांतीतही  आहे. हिंदू धर्मात  ही प्रथा का व कशी सुरू झाली हे सांगणे नको. पूर्वीच्या गृहिणी, गावाकडील स्त्रिया, ह्या कामात व्यस्त असत, त्यांना एकत्र येवून कामापासून थोडी विश्रांती मिळावी , करमणूकीचे काही साधन असावे. रोग राईत अनेक लोक मरत व त्यात आपलं कुंकू टिकून राहावा, आपला आधार हरवू नये म्हणून. 

                माझ लहान पण गावात गेल. लहानपणापासून घर भर माणसं लहानपणीच कधीतरी आत्यांची लग्न झालेली . 

गूरांढोरांनी भरलेला गोठा घरामागे विहीर, तुळशी वृंदावन वाडी, खूप दूरवर पसरलेली शेत आणि त्या शेतात राबणारी आई, पण नवरात्रात, घरोघरी होणार हळदी कुंकू नटून जाणाऱ्या बायका ह्यात माझी आई असे आमच्या घरी दोन हळदी कुंकू असायची, एक आईचं एक काकीचं दोन सवाष्ण पूजन असायची, एक आईच, एक काकीच, घरात, देव्हार्यात, तुळशीत, विहिरीजवळ, गोठ्यात, गाईला कुंकू लावताना तिच्यात ही आई दिसायची, गावच्या वेशीजवळ आणि देवीच्या देवळात असं सात ठिकाणी आणि तेही दोनदा आम्हा कुमारिकानाइ पूजले जायचं. इतरांकडे एक, दोन, फार फार तिन ठिकाणी, पू जायचे. गावातील प्रत्येक घरातील, अगदी वेस ओलांडून असणार्या गावातून ही हळदी कुंकूवाचं आमंत्रण असायचं, देवळात येणाऱ्या प्रत्येक स्त्री, कडून मिळणार हळदी कुंकू आम्हा लहान किशोरी मुलींच् मस्तक मळवटाने भरून जायचं . अन मन एका पवित्र शुभ लहरीन,,, अशा मनात पापाचा शिरकाव होण शक्य नसायच. 

मार्गशीर्ष महिन्यातील हळदी कुंकू आमच्या घरी नसायच पण  दर गुरूवारी संध्याकाळी गावागावातून बायकांच्या घोळक्यात आई बरोबर फिरताना खूप छान वाटायचं ,घरातील लहान मुलींना न्यायची पध्दतच होती, हातावर मिळणारा प्रसाद सत्यनारायणाचा प्रसाद ह्याची चव घरातील बदाम साजूक तूप आणि दूध घालून केलेल्या शिर्यालाही नाही, मग केसर दूध आणि एखाद फळ नंतर शेवटच्या गुरूवारी उपासनेच पुस्तक. 

जानेवारीत संक्रातीच्या तिळगूळ वाटपा बरोबर प्रत्येक स्त्रीच वाण ,नवीन सवाष्ण खूप छान  नटूनथटून खूप सारी ह़़ळदी कुंकू ची मोठाली भांडी भरून ठेवून हवी तेवढी लयलूट करायची, मग पूढील पाच वर्षे टिकली, फणी, पावडर, काजळ  अशी प्रसाधने वाटायची हेतू एवढाच की त्या साठी नव़र्याकडे पैसे मागायला लागू नयेत. 

लहानपणी अनुभव लेले हे क्षण तना मनाला संस्कारून गेले. एवढे अनुभव ले की नंतर ते कितीही दुखरे बनवले तरी मनाला इजा नाही करू शकले. 

मी लग्न करून खेड्यात गेले. पहिल्या नवरात्रीच्या हळदी कुकूंवासाठी सासूने दारातून जाणाऱ्या  आदिवासी स्त्रिया बेलावल्या, नंतर मी मोहल्ल्यात रहायला गेली. तिथे बिल्डिंग मध्ये चार पाच हिंदू कुटूंब, त्यात दोघी तरूण विधवा मी अगदीच नव़खी काय करावे कळेना, हळदी कुकूंवासाठी बायका जेमतेम मुस्लिम भगिनींना बोलावले आणि सासूला कळले ,तर सासू कर्मठ, बोलवून एवढे जिने चढता येणार नाहीत म्हणून मुद्दाम टाळणारी, बिल्डिंग च्या तळाशी सहकार बँकेत चेअरमनपदी काम करणाऱ्या काकूने त्याच दिवशी हळदी कुकूवाचा कार्यक्रम ठेवला. तेव्हा तिने दोन मुली असलेली विधवा स्त्रीला बोलावले, नारळ वाटले, ती निघून गेल्यावर मला म्हणाली का नाकारावे आपण त्यांना कुमारी असताना पूजतो , मग नवरा नाही तर नाकारावे? 

मी जिन्यातून जाताना हळदी कुकूंवासाठी आमच्या ही घरी या सांगितले, ती आली नाही. पण मोठ्या मुलीला पाठवल कदाचित माझ्या पहिल्या हळदी कुकूंवासाठी नको वाटलं असावं चेअरमन बाईंच्या घरी मुलाच् लग्न ठरलेले. .नविन जागेत  शिफ्ट झाले ,लग्नाच आग्रहाचे आमंत्रण देवून गेले पण छोटी ओळख मग कशाला म्हणून टाळले. आता काय.!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4