सत्यनारायणाची महापूजा
माझ्या आठवणीतील : सत्यनारायणाची महापूजा
कोणतीही पूजा असो त्याच स्वरूप हे धार्मिक असत, एक पावित्र्य, शुभलहरी, मांगल्य त्यात भरलेल असत,
मी नक्की साल सांगू शकत नाही, पण अशा ठराविक पूजा माझ्या स्मृती पटलावर कायमच्या उमटलेल्या आहेत की त्या मला कागदावर उतरल्या शिवाय स्वस्थ बसू देत नाही,
1: मी आठ किंवा नउ वर्षाची असेन, माझ्या जिवनात प्रथम आलेली पूजा:
शाळेला सुट्टी लागली की माझी आई आम्हाला सर्व भांवडाना घेवून मामाकडे जायची , थोडे दिवस राहून परत माघारी यायची, आम्हाला टाकून म्हणजे टाकून सर्व मामा मामी त्यांची मुल आणि इतर पाहूणे मंडळी यात आपल्या मुलांना कोण नीट पाहील वागवले ह्याची तिला खंत नसायची, सुट्टी संपेपर्यंत आम्ही रानावनात, डोंगर, एक नाही दोन दोन पालथे घालायचो, अर्थात माझा दोन वर्ष मोठा भाऊ, मामांची मुल आणि गावातील आजूबाजूची मुल खूप हुदडायचो, मामा, मामी, मावशी यांनी कधीही आम्हाला दुय्यम वागणूक दिली नाही, कधीही दम दिला नाही किंवा काही विपरीत होवू दिल नाही आम्ही निसर्गची देणी अगदी निसर्गात लीन होवून बागडत असू, त्या माझ्या आजोळातील प्रत्येक नातेवाईक आणि शेजारच्यांचे आता आभार मानायचे, आम्हाला चांगली वागणूक मिळायचे कारण माझ्या आई ला आजोळी एक वेगळाच मान होता.
मामा़च्या तीन लाँच आणि त्यात तीन तीन पूजा ठेवल्या होत्या, आणि समुद्र किना्र्याला धक्काला लागून एका बाजूला एक अशा तीन लाँच उभ्या करून त्यांना डेकेरेशन केलेले, लायटिंग इतके छोटे कलरफूल बल्ब फुलांच्या माळा, सभोवतालच्या भरती वर फेसाळणार्या लाटा, वर चांदण्यानी भरलेले आकाश, आणि झाडांनी भरलेले भले मोठे डोंगर, आणि वर देवालयात जाण्यासाठी असणाऱ्या भल्या मोठ्या दगडी पायऱ्या, आजूबाजूला असलेले उत्साहाने वावरणारी नातेवाईक, गाववाले,, शेजारी ,आणि तिथेच बाजूला असलेली मोठी, कँटीन, पांढरा सनमाईका असलेल टेबल आणि चार खुर्च्या, कितीही खा पण आमच् मन खाण्यात नसायचं कुणी दिल तरी खायचो नाही, आणि लिमका, मँगो ला, गोल्डस्पाँट, त्याचे बिल्ले जमवायचा वेड तिथेच लागलेले, कोल्ड्रिंक्स लहान असून आम्हाला खूप आग्रहाने प्यायला मिळायचे, आणि त्या वागणूकीचा अभिमानही वाटायचा,
असा अनुभव मला लहानगीला खूप भारावून गेला, एका लाँच मधून दुसर्या मग तिसर्या आम्ही उड्या मारत असू मग लाँच ते कँटीन असे धावत असू, धक्क्याला लांबच लांब जड साखळ्य
आणि मध्ये मध्ये एक एक खांबा, इतके वर्णन करायच कारण त्या साखळयाना धरून खेळताना माझा पाय घसरला आणि नाजूक असल्याने न आडकता डायरेक्ट समुद्राच्या आतल्या बाजूला साखळीखंड न सोडता लोबकळत,मामेभाऊ व मोठ्या भावाने खेचून मला वर काढले ,इतक्यत मोठ्याने कुणीतरी ओरडलेही, अरे भरती आहे आणि इथे काय करतात, त्यानंतर आम्ही प़ळत तिथे मनोरंजन पर असणाऱ्या पडद्यावरच्या सिनेमा पाहण्यासाठी गेलो. सािनेमा न झोपता रात्री जागून पहात बसायचो, पडद्यावरील सिनेमा आयुष्यात इथेच प्रथम पाहिलेला ,टिव्ही मात्र लहान ३ वर्ष ची असल्यापासून पहात आले. तेही मामाकडे च, सिनेमा संपाल्यानंतर रात्री मावशीचे, भावाचा नाहीतर मामाचा हात धरून १/२ते १ तास पायी चालत जाणे, वाटेत लागणार धरण, /डँम हंयाचीही ओळख इथेच झालेली,
पहीली अनुभवलेली पूजा मग मात्र ती दरवर्षी च माझ्या आयुष्यात अधिक झालेली,
आठ दिवसात आईचा निरोप आला मामा कडून घरी ये आपल्याही गावात यंदा पूजा आहे, मामा कडून यायला आम्हाला कसले तरी अमिष द्यायला लागायचे,
तिथून निघताना लवकर उठून सकाळचा मचवा पकडायला लागायचा आणि माझा तो नेहमीच चुकायचा कारण सकाळी मला लवकर उठता यायचे नाही, पूजेसाठी मात्र मला सकाळी उठायचे होते. कारण माझ्या गावातही ह्या वर्षी नविन गावाची पूजा सुरू होणार होती. मामाकडील पूजा मी गावात घेवून आले होते.
2(संपूर्ण गावभर कागदी पताका लावून , गावच्या वेशीजवळ मोठ पिंपळाच झाड आहे आता तिथे छान देवूळ बांधलेले आहे, मी लहान असताना तिथे छोटसं देवूळ हेत, लाऊडस्पीकर वर गाणी , मे महिना म्हटल्यावर गावात प्रत्येक घरी पाहूणे आलेले असायचे, म्हणजे त्यांना पूजेच आमंत्रण असायचं दरवर्षी एका ठराविक तारखेला किंवा शनिवारी पूजा असायची, नंतर पडद्यावरील सिनेमा हे तेव्हाच करमणुकीचे साधन,
मोठ्या मुलींना रवा निवडणं बेल तुळशी निवडून, मोजण, हार करणं, वेलची निवडण,ह्या कामासाठी बोलवले जायचे ही सारी कामं पंचायत समितीच्या सदस्या च्या घरी असायची त्या घरामध्ये माझी वर्ग मैत्रीण होती, व माझ्या आई ला तेही शेजारी मानत होते तेव्हा मी लहान असून माझी वर्णी त्यांच्यात लागत असे, पूजा निश्चय संपल्यानंतर
दुसर्या दिवशी गावच्या पूजेच्या प्रसादाच वाटप असे . गंमत म्हणजे माणसी वर्गणीनूसार प्रसादाचे वाटप असायचे,दोन्ही नवरा बायकांनी वर्गणी दिली तर दोघांना पूड्या चार भावांनी वर्गणी दिली तर चार पूड्या, ह्यामुळे गावात एकी होती, पवित्रता राहते, गावाशेजारी असलेल्या गावात जिथे पूजा व सिनेमा असायचा तिथे गावातील मुले मुली आम्ही मोठ्या घोळक्याने जात असू.
3)मे महिन्यातील मामाकडील पूजा व आमच्या गावातील पूजा अ़शा दोन पूजेला मी हजेरी लावत असे, फक्त आता गावाजवळील धक्क्याला लाँचपूजा होत असे,
अशीच एक आठवणीत राहिलेली पूजा: माझ्या मामाकडे विहीरी खूप लांब होत्षा त्यामुळे कपडे व पाणि भरायला कामवाली असे, मग ती दिवसभर भाकरी भाजणे, सारवण करणे कपड्यांच्या घड्या घालणे अशी कामेही करायची, तेव्हा घरात मामा व आजी दोघे असायचे, मामा गावातील शाळेत मित्राबरोबर झोपायला जायचा, व घरात आजीला सोबत म्हणून काम वाली राहायची, खालच्या गावात देवळात सार्वजनिक पूजा होती, व सर्व पूजेला गेले, पूर्ण गाव पूजेला गेलेला रात्री आजी कशी जाणार मी काम वाली आणि आजी ति़घाना थांबवुन ठेवल, आणि मग आम्ही छान टँक्टर मध्ये बसून पूजेला गेलो, अर्थात नंतर मनोरंजन पर पडद्यावरील सिनेमा .पिश्चर संपल्यानंतर परत टँक्टर मध्ये बसून घरी पण जनरेटर वाल्याला रिळे लावून पडदा काढण्यासाठी मदत करायला टँक्टर चा चालक गेला. हळूहळू सर्व लोक पांगलेले, आजूबाजूला काळोख, एका बाजूला डोंगर आणि दुसर्या बाजूला फेसाळ लेला समुद्र व त्याची ऐकू येणारी गाज वरती असंख्य चांदण्षानी भरलेल्या आकाश, बाजूला भयावह शांतता वअंगाला झोंबणारा वारा आम्ही तासभर तरी तसेच बसून होतो. मी कामवालीचा हात घट्ट पकडून ठेवलेला.व मला पूजेच मांगल्य जावून भयाण शांतता भयावह वाटू लागली.टँक्टर थोडा दूरवर थांबलेला त्यामूळे सादही घालता येईना, त्याला मध्येच कुणीतरी आठवण करून दिली मग तेा धावत धावत आला, एक मामा पण थांबलेला तोही आला व आम्ही टँक्टर मध्ये बसून घरी आलो, पहिल्या पूजेला
चालायला लागले होत ,आता चालायला देखील न लागता पूजेला गेलो.
4)घरी पूजा असली की गावात आमंत्रण द्यावे लागते, एक मंगल कार्य केले की दूसरे लगेच होते म्हणून माझ्या काकांचे लग्न झाले नव्हते व आाजीनीं कांकाची पूजा ठेवली, घरातील समज आल्या नंतर ही पहिलीच पूजा तशी लहान असताना दुसर्या काकांची पूजा झालेली, पण मी तेव्हा खूपच लहान होते त्यामुळे स्मरणात नसलेली, अतिशय साधेपणाने झालेली,
त्यानंतर काकांचे लग्नही झाले व पूजाही
5) भावाचे लग्न झाले पूजा झाली.त्याला मूलगी झाली व तिला जन्मताच ग्रहांची साडेसाती लागली, व त्याच्या शांतीसाठी ग्रहशांती व स्त्यनारायणाची पूजा सांगितली पहिल्या दिवशी होम करून ग्रह शांती केली, नंतर दुसऱ्या दिवशी पूजेची सर्व तयारी झाली भटजी आले , भाउ भावजय पूजेला बसणार तेवढ्यातच भावजय ने ़सांगितल मला पूजेला बसता ये़णार नाही, तिला महिन्याचा प्राँब्लेम सुरू झाला. बाबा काही तरी आणायला बाजारात गेलेले ते १तास तरी येणार नव्हते, भटजीना दुसऱ्या पूजेला जायच होत त्यांना घाई होती. मग मात्र मला तयार केलं गेलं मी पूजेला बसलेल वहीनीच्या आईला आवडलं नसावं ती नूसती बडबड करायला लागली मा़झ्या वहीनीनी कितीही समजावल तरी तिला पटत नव्हते पण मला मात्र एक मांगल्याचा नविन अनुभव मिळाला, नंतर ठरवूनही लग्नातील पूजा झाली नाही, मुलगी दहावी झाल्यावर करणार होते. ती पूजा रद्द झाली, गावातील पूजेला जाण होत नाही आणि बिल्डिंग मधीलही पूजा अटेंड करता येत नाही पण सध्या तरी अचानक पूजा ह्या मंगल विधीतून काही कारण नसताना हद्दपार झाले आहे ,बघूया परत क़़धी योग येतो ते..
ृजीवनात आलेली पहिली पूजा ते पूजा बंद पर्यंत चा प्रवास आठवणीच्या कप्प्यात बंदीस्त करून ठेवला, व हळूच पानावर उतरवला. येता जाता देवळातील रस्त्यातील सार्वजनिक पूजेला नमस्कार होतो.
Varsha patil.©®
Bsc DMLT.
9819406813
Uran.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा