स्वभाव
दोन समांतर रेषा कधीही कुठेही मिळत नसतात.
पण एकाच प्रतलात राहून पार क्षितिजापर्यंत सोबत देवू शकतात.ही त्यांची सोबत खरी सोबत असू शकेल का?तसंच थोडस वक्र रूप धारण केलेली रेषा परिघाने एकमेकांत मिसऴता येतात. थोडेसे असेच असतात का मानवाच्या स्वभावाचे पैलू आपल्या स्वभावातील ताठरपणा न सोडल्यामूऴे आयुष्य एकदाच मिळंत हे माहीत असून सूद्धा खूपश्या गोष्टी हव्या असून सोडून देणारे!,पण थोडा वक्रपणा स्वभावाला न देणारे? अन् असेही काही असतात आयुष्यभर स्वभावाला वक्रपणा देवून दुसऱ्यासाठी जगणारे आणि त्यातून आनंद मिळवून तो अक्षय टिकवणारे आपल्या आवडींना मुरड घालून दुसऱ्यांच्या आवडी जपणारे वक्रपणा धारण करून धरणीला आकाश टेकवणारे...........
प्रत्येकाने ठरवायचे ,आपण कसे जगायचे.
Varsha patil. ©®
9819406813
Bsc(micro) DMLT.
Uran
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा