नवरात्र

 


दरवर्षी मी नवरात्रीत घट बांधते . घट स्थापनेच्या दिवशी विधीवत पूजा करते. कुंकूमार्चन करते. दुर्गा स्तोत्र,दुर्गा कवच वाचते. दोनओट्या एक देवळात व एक घरात देवीच्या ओटीत(साडी, खण,नारळ, वेणी, कृत्रिम दागिने, हळद कुंकू,तांदूळ, धागा, पान सुपारी,बांगड्या) भरते.सकाळ संध्याकाळ आरती,धूूूूूूप कापूर लावते. नउ दिवस घरात असली तरी नऊ रंगाच्या साड्या नेसते. नउ दिवस वेगवेगळे  नैवद्य करते.( खीर, गुलाबजामून, पुरणपोळी, घारगे[ पंचपीठाचे, नारळाचे,केळ्याचे डांगराचे, ],मखान्याचे लाडू,, शीरा,इ) पहिल्या दिवशी फक्त पाणी आणि चहा घेवून उपवास करते. दुसर्या दिवशी पासून दसर्या पर्यत फळ, चहा, कंद(कंनक, कांरीदे,वळकांदे शकरकंद, काकडी), दूध,(क्वचित) ताक, दही काही ठराविक थंडपेय पिते. मुलगी विचारते, प्रसाद खायची इच्छा नाही होत का? तर स्वच्छेने अंगिकारलेल्या व्रताला कधी मोह  होत नाही. घरातील सर्व कामे करते.रात्रदिवस नंदा दिप जाळते,फुलांच्या पानांच्या, दूर्वाच्या माळा करते. ललिता पंचमीला  कुमारिका म्हणून मुलीला पूजेत पूर्वी बिल्डिंग मधील मुलींना पूजांयची, देवळात सुहासिनीला हळदीकुंकू देते. . विजयादशमीच्या दिवशी तोरणं, हत्यार, पुस्तके, पूजते. हे प्रत्येक वर्षीच घेतलेल व्रत. 

ह्या सवयी मला लहानपणापासून लागल्या. आमच्या घरी असं सर्व यथासांग करत असू. आमची देवी चंडिका ती परळ व वसई जूचंद्र गावात. दरवर्षी ९ दिवसात पूर्वी दोन्ही कडे जायची, आईला घेवून. नंतर मुलीला घेवून(कुठेतरी एका ठिकाणी). पण ह्यावर्षी घट बसवायचा नाही. असे ठरवले,फक्त उपवास करायचे ते सोडायचे नाहीत. कारण कोरोना मुळे काही राहीलं, तर बाजारातून पटकन आणता येत नाही, दुसरं ती वस्तू मिळेलच अशी शाश्वती नाही. तिसर खूप लोकांच्या घरात दु:ख असताना ,उगाच नको.  काहीही तयारी केली नाही. पण सकाळी मन बैचेन व्हायला लागलं, काही सुचत नव्हतं, स्वस्थ बसवेना,मग तांब्याच्या तामणात तांदूळ पसरवून हळद कुंकू वाहून देवी बसवली. जसं जमेल तशी सरळ साधी पूजा केली. फुलांच्या दररोजच्या माळा,पूजा, प्रसाद अगदी साधेपणाने.माझ्या मुलीने, ह्या सर्व गोष्टी तू कशासाठी करतेस असे विचारते. एक लहानपणापासूनचे संस्कार,दुसरं मनाला समाधान, ती नास्तिक नाही, देव मांडलाय पूजा करायची. एवढचं, लहानपणी तिलाही  हे सर्व खूप आवडायचे. मैत्रीणीची आई दरवर्षी तिला उपशी ठेवून जेवायला बोलवायची. सुहासिनी पूजतात. त्या पूजेला जायची. पण आता रस नसतो. 

माझ्या लहानपणी आमच्या गावात एका मैत्रीणीच्या घरच्यांनी त्यांची काही जागा एका दूधवाल्या भैयाला विकली. ते नविनच रहायला आले होते. व नवरात्रीत त्यांनी देवी बसवली होती. सर्व लहान मुलींना बोलावले. पूजन केल्यावर सर्वाना लाह्या फूल प्रसाद दिला. मी तेव्हा ४थीत होते. सर्व मुली निघून गेल्या. मला लाह्या व स्कर्ट सांभाळून चालता येईना, त्या घंरगळू लागल्या. त्याच्याकडील ३ आसनी खुर्चीत मी बसले. थोड्या वेळाने त्यांचे लक्ष गेले. मला विचारले ह्या लाह्या तूझ्या साडल्या का? मी हो म्हटले. त्यांनी मला त्यांच्या दुसर्या मुलीला बोलवून परत पूजा करायला सांगितले. पाच प्रकारची फळ, वेणी, कागदात बांधून शिरा(प्रसाद)दिला. प्यायला मसाला दूध दिलं. हे सर्व एका पिशवीत भरून दिलं व आता जा घरी सांगितलं, मी घरी आले, मला उगाचच थांबले असं  वाटले, मी आईला विचारले, मी हावरट आहे असं वाटलं असेल का ग ?तर आई म्हणाली नाही. त्यांनी हे सर्व तूला  दिलं कारण त्यांना  वाटलं त्यांची देवी त्यांच्याकडे थांबली. त्यानंतर मात्र मी कधीच कुणाकडे कामाशिवाय रेंगाळले नाही. 

 माझ्या वर्गात आणखी एक माझी मैत्रीण होती.तिच्या घरात खूप सारी माणसं होती कोणताही उपवास हा त्यांच्या घरात सर्वांना असे. तेव्हा मराठी ४थीत असताना तिने उपवास सुरू केले. व मग मीही हट्टाने सुरू केले.त्याच वर्षी आईने कितीही समजावलं तरी मी ऐकत नसे, कारण जर माझी मैत्रीण करू शकते तर मग मी का म्हणून नाही. (माझ्या मुलीला मी अजून एकही उपवास दिला नाही)

माझी आई आणखी एक गोष्ट मला सांगायची , उपवास केला की दुपारी झोपायचे नाही. पाल येवून आपले  पाय चाटते व उपवासाचे पुण्य व सत्व चाटून जाते.(उपवास केला की आळस करू नये. ) माझ्या मुलीला, मला हेच सांगायचे आहे. मला जर काही, जीवनत यशस्वी होता आले नसेल ,तर मला अडथळे घालणारे, यशस्वी होवू न देणारे, हक्काचे न देणारे माणूसरूपी पाली,माझ सत्व व पुण्य न्यायचं काम करतात.

माझ म्हणणं एवढच आहे. समोर दिसणारी सिवलेस ड्रेस घालतेय, जीन्स घालतेय, पटकन कुणाशीही बोलते . नवर्या बरोबर न रहाणारी, ही बाई चंट आहे. न बोलणारी , नवर्याबरोबर नीट संसार करते ,दाखवणारी ,सासरची,माहेरची माणसं धरून ठेवणारी , सोज्वळ,सतीसावीत्री आहे असं दाखवणारी स्त्री सच्चील,शील जपणारी असेलच. असे नाही. दिसतं तसं असतं तर जगाची फसवणूक झाली नसती. एखाद्याला कमी लेखून तूम्ही त्याला यातना देवू शकता, पण अगदी सहजपणे त्यांचे संस्कार काढू शकत नाही. 

जय माता दी. 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4