जहालवादी
जहाल वादी:
लोकमान्य टिळक हे जहालवादी नेत्यांमध्ये होते.
मी पहिलीला असताना त्यांच्या जन्म तिथीला (जंयती) प्राथमिक शाळेत भाषण दिले होते. त्यात त्यांची आठवण म्हणून एक गोष्ट सांगितली होती.
वर्गात मधल्या सुट्टीत टिळक आपल्या घरी जेवायला जायचे, एकदा टिळक वर्गात आले आणि मधली सुट्टी संपली. मुल वर्गात आपापल्या जागेवर जावून बसली . तासांवर गुरूजी आले. त्यांनी पाहिले मुलांनी शेंगा खाऊन टरफले वर्गात टाकली होती.कचरा केला होता. गुरूजींनी मुलांना विचारले ही टरफले कुणी टाकली, कुणीही उत्तर देईनात, मग गुरूजींनी पूर्ण वर्ग उभा केला. म्हणाले, प्रत्येकाने नाव सांगायचे ,नाही तर छडीचे फटके खायचे, एक एक करत मुले हातावर छडी खाऊ लागले. आता टिळकांचा नंबर आला, गुरूजींनी हात पुढे करायला सांगितले. टिळक बाणेदार पणे म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी छडी घेणार नाही. मी कचरा उचलणार नाही. मग गुरूजींनी त्यांना मुलांची नावे विचारली. टिळकांनी मी वर्गात नसल्याने मला माहीत नाही. तेव्हा मी नावे सांगणार नाही. किंवा चाडी ही करणार नाही. म्हणाले. गुरूजींनी त्यांना घरी जा व उद्या वडिलांना घेवून ये. सांगितले. टिळकांनी दप्तर उचलले. व घरी गेले. दुसर्या दिवशी ठरल्या प्रमाणे वडिलांना शाळेत घेवून आले.
हे संस्कार हल्ली शाळांशाळांत होत नाहीत. आपल्या घरातील कचरा दुसर्यांच्या दारात नेवून टाकणे व तूच गेलास म्हणणे. आपली पेन्सील मोडकी असेल तर ती बाजूच्या मुलांच्या दप्तरातील बदलणे. हेच चालू असते. व २ रूपयांची पेन्सिलीचे ना मुलांना काही वाटत ना आईवडिलांना, ज्याने काही केले नसेल त्या निरागस मुलाच्या माथी कसे मारायचे हेच आई बाप मुलांना शिकवत असतात.
आजच्या मुलात ना बाणेदार पणा दिसत. ना करारी वृत्ती दिसत.
गोड गोड बोलून आपलं हित साधणं व दुसर्याचे परिश्रम आयते गिळंकृत करणे. ह्या सवयीला आई वडीलच जबाबदार असतात. चूक कबूल करणं, माफी मागणे, हे मुलांना आवडत नाही. आपण काहीतरी गाड्या चालवून ग्रेट पणा करतो असंच वाटत असतं त्यांना
आता तर संस्कार करणाऱ्या शाळाही आँनलाईन झाल्या आहेत.
वरील गोष्ट लिहीण्यांच कारण एका माणसाने मला वाँट्अप करून मला एका शिक्षिकेने केलेला व्यवहार तुम्हीच केलेला आहे. कळवलं(नाव सेम असल्याने गफलत झाली असावी) पण मला मात्र टिळकांची गोष्ट आठवून हा लेख लिहिण्यास भाग पाडले. आपण जे वागलो. ते चूक की बरोबर हे राहीले बाजूला. पण मी ते केलेच नाही. किंवा तसे वागलोच नाही. असं म्हणणं म्हणजे निरापराध्याला जन्मठेपेला पाठवण्या सारख आहे. निदान हया वागण्याला शिक्षक अपवाद असावेत. आपण केलेलं दुसऱ्याच्या माथी मारणं ह्यासारखा आपराध नाही.
वर्षा पाटील©®
बी. एस. सी.
डी. एम. एल. टी.
9819406813
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा