सहप्रवासी

 सहप्रवासी :आपण प्रवास करताना नेहमीच बरे वाईट अनुभव  घेत असतो.  कधी आपण चुकतो कधी समोरचा, कधी अतिशय चांगला  अनुभव आपल्याला येतो.कधी मनाला त्रास होईल असा. 

(मरोळनाका )नेल्को येथे मी बस मध्ये चढली .तिकीट काढायला सर्व जवळ असलेल्या पर्स बघितल्या.  सुट्टा पैसे संपलेले फक्त 4रू  कंडक्टर जवळ  आला, केविलवाणे मी पैसे सुट्टे नाहीत. 500रू नोट पाहुन  बस मधून खाली उतरा, 10रू साठी इतके सुटेट देवू ,मलाही सुचेना cst जवळ गरीबाला 5रू दिल्याचे आठवून मन चुटपुटल नाइलाजारस्तव उतरायला गेले,  तेवढ्यात एका तरूणीने थांबा उतरू नका, करून पर्स मधून 20ची नोट काढून दिली, मी कंडक्टर कडून 10ची नोट व 4 ची चिल्लर  14 रू परत केले.  6रू अनोळख्या मुलीचे कर्ज माझ्यावर राहीले .आपण कुणालाही देतो म्हणून ती विसरूनही जाईल.पण मला मात्र कायम स्मरणात राहील. वेळ एवढा कमी होता की मी तिचे नावही विचारले नाही, लक्षात ठेवून मला ती भेटणार ही नाही.कंडक्टरला 4रू घेवून मला तिकीट देता आल असतं किंवा सहप्रवासाकडून 500 सुट्टे देता आले असते.पण ह्कंया उलट कंडक्टरला सांगूनही त्याने मला  पासपोर्ट सेवा केंद्र स्टाँपवर उतरवल नाही . पूढे विजयनगरला उतरून परत चालत आले. बहुतेक त्या मुली कडून पैसे घेणे त्या कंडक्टरला रूचले नाही. असो एकाच प्रवासात मला दोन माणसं भेटली. एक विक्षिप्त व एक सहज मदत करणारी.

प्रवास करताना मीही रिक्षेतून उतरताना अधू माणसाला 2रू दिले .मघाचची रूखरूख जाणवू नये म्हणून, त्यामुळेच तर मला एक धडा मिळाला. भिख मुजोराना ,हट्टाकट्टात्यानां देवू नये. पण भुकेल्याला,वार्धक्यामुळे बेबस झालेल्यानां   शेवटी आपण एकाच ईश्वराची लेकरंआहोत.त्यांना कणभर मदत केली. तर क्षणभर मनाला ब्रिटिश वाटतं. 


Varsha Patil.©®

Bsc(Micro) DMLT. 

9819406813

Uran

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4