सोनेरी केसांची राजकन्या भाग १
सोनेरी केसांची राजकन्या भाग: १
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. अर्थात आपण जीवनाच्या धबागड्यात सर्व विसरून गेलेले असतो .पण एका ठराविक वयानंतर लहानपणी केलेल्या खोड्या मस्ती आठवू लागतो. आपल्या मुलात आपल् बालपण शोधू लागतो. अशीच लहानपणीची माझी आठवण व त्याला लागूनच लहानपणी ऐकलेली गोष्ट लिहीते. आता चालू असलेलं, संस्कारहीन, यादवी जिवनात ही गोष्ट कदाचित काडीचा अधार ठरेल.
मी लहान असताना, एका लग्नासाठी म्हणून माझ्या दोन्ही मोठ्या भावांना blue जीन्सच्या पँन्ट आणल्या होत्या, तेव्हा मुलींनी पँन्ट घालायचे जास्त फँड नव्हते. ते दोघे नविन पॅन्ट घालायचे तेव्हा मलाही त्यांच्या सारखीच पॅन्ट हवी असायची. मीही पँन्टसाठी हट्ट करायचे. त्यांनी थोडे दिवस वापरून नंतर त्या पँन्ट मला मिळाल्या. मी दिवसा पँन्ट घातली की मला सर्व चिडवायचे. मला राग येवून मी रडू लागायचे. मला पँन्ट तर घालायला हवी असायची, मग दररोज रात्री झोपताना मी त्या पँन्ट आलटून पालटून घालायचे. झोपताना मी आई वडिलांच्या मध्ये झोपायचे. व एक दिवस आई व एक दिवस वडिल गोष्ट सांगायचे. वडिलांच्या कथा ह्या इसापनीती, पंचतंत्र मधील असायच्या. अलिबाबा आणि ४० चोर ही कथा वडिल खूप रंगवून, टापांचे,,गाढवांना हाकलून देताना चे आवाज काढून सांगायचे. मी रहात होते त्या माझ्या गावाशेजारी उंच डोंगर व गर्द झाडी होती त्यामुळे अलिबाबाची गोष्ट ऐकताना मला फार भिती वाटायची. पण तरी ती गोष्ट ऐकावीशी वाटायची.
आईच्या गोष्टी परीकथा, राजकन्या, म्हातारी, भोपळा, सिड्रेला,र्चिंबोरी, अशा वेगळ्या छान होत्या. आता मी लिहीत असलेली कथा माझ्या लहानपणी ऐकलेली लिहीत आहे. गोष्ट लहानपणीची असली तरी आशय मात्र मोठ्यांसाठीच आहे.
आटपाट नगर होते . नाव होत विजयनगर .तिथे विजयकुमार नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला एक मनमिळाऊ लोभस राणी होती. व एक मुलगा व एक मुलगी होती. मुलगी अतिशय सुंदर होती .राणि तिची अतिशय काळजी घेई.
कालांतराने शेजारच्या राजाकडून विजयनगर वर आक्रमण झाले. राजा, प्रधान, सिमेवर युद्धासाठी निघून गेले माघारी राणी व दोन मुले राहीली. . युद्धात राजा मरण पावल्याची खबर आली. शत्रू पक्ष आपल्याला बंदी बनवेल या भयाने राणी, राजपुत्र ,राजकन्या व सोबत दासी व विश्वासू नोकर ह्याच्यांबरोबर भुयारी मार्गाने राजमहालातून निघून गेली. विश्वासू नोकर व राजपुत्र ह्यांची ताटातूट झाली. राणी, दासी, व राजकन्या रस्ता चुकली. व रानावनात भटकू लागली.
युद्ध थांबल, राजा युद्धातून परत आला, राजाच्या मृत्युची बातमी खोटी ठरली. राजाने सर्वांचा शोध घेतला. त्याला विश्वासू नोकर व मुलगा परत मिऴाला. मात्र राणी व राजकन्येचा शोध व्यर्थ ठरला. राजा आपला राज्यकारभार पूढे चालू ठेवतो. मुलाला घोडेसवारी तलवारबाजी, , युद्धकला, व राज्यकारभाराचे शिक्षण घेत राजपुत्र मोठा होतो.
क्रमंश
Varsha patil. ©
Uran(navi mumbai)
9819406813
Bsc DMLT
18/ 5/20
2:45am

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा