भूत:भाग:३

 भूत:भाग ३

भाग २ वरून सुरू

माझे सासरे आजारी होते. जवळच सरकारी हाँस्पीटल होते. तेथे ते अँडमिट होते. नवरा दिवसभर  तिथे थांबत असे  दुपारी जेवायला घरी येत असे व परत डबा घेवून हाँस्पीटल मध्ये जात असे.मुलगी लहान होती. म्हणून मी फक्त चहाच्या वेळेला संध्याकाळी एक फेरी मारत असे. दुपारी तो घरी आल्यावर हाँस्पीटलचे, कपडे बाथरूम मध्ये ठेवून ,,परत जाताना तेच कपडे घालून जात असे, व रात्री परत बाथरूम मध्ये अडकवून ठेवत असे, माझा वावर बाथरूम मध्ये असताना मला धुरकट आकारहीन प्रतिकृती दिसत असे मी मुलगी रडते का? घाबरते का पहात असे, मला काही त्रास होतो का पहात असे. पण असा काहीही त्रास होत नव्हता. पण नवरा घरात आला किंवा घरातून बाहेर पडला की ते धुरकट वलय नवर्या पाठोपाठ येत असे व जात असे हे काय आहे हे मी कुणाला विचारू शकत नव्हते. नवर्याला असा काही मला भास होतो आहे हे सांगू शकत नसे. 

.सासरे बरे होवून घरी गेले. व ते धुरकट वलयांकित प्रतिमाही नाहीशी झाली. 

मध्यरात्री मुलगी जमिनीवर ठेवली की झोपेत रडायची.ती मांडीवर झोपायला तशी लहान नव्हती , दिड वर्षाची असेल. सकाळी खिडकीत उभी केली की मम्मा बुवा बघ सांगायची. कुठे ,कधी घाबरली असेल म्हणून  मी कोळसा पाणी ओवाळून टाकत असे, मला कुणीतरी तंबाखू च्या वासाला भूत घाबरून पळून जात सांगितले. मी तंबाखू आणून भाजून बाथरूम मध्ये टाकला. व पाणी फ्लश केले.  मध्यरात्री मला जाग आली, व घरात, मला ओळखीच्या वृद्ध नातेवाईकंची मूर्ती  दात विचकाटून हसत चालताना दिसली. ते मृत नव्हते. पण मुलगी परत रडत उठली मी तिला घट्ट कवटाळून घेतले. नंतर ते दिसेनासे झाले. पण जिवंत माणसाचा वावर  घरात कसा? मुलीला मांडीवर घेवून अशा कित्येक रात्री मी जागून काढल्या. मी सुशिक्षित, अधुनिक विचारांची होते ,पण मला अनुभव असे विचित्र येत होते. की मी कुणाला काही विचारू किंवा सांगू शकत नव्हते. 

     हाँस्पीटल मध्ये एक पेशंट सलाईन लावलेला होता.  त्याचेच ब्लड रिपोर्ट  अर्जट देण्यासाठी मला थांबावे लागलं होतं नाहीतर मी तशी तीन-चार वाजताच हाँस्पीटल मधून निघत असे. मी रिपोर्ट देवून लँब बंद करून निघाले. बाहेर व्हरांड्यात २-३ डाँ. गप्पा करत थांबले होते. पेशंट जवळ २ नर्स होत्या. पेशंटची सलाईन संपायला १० मी. अवकाश होता.बाकी स्टाफ निघून गेला होता. माझी बँग सीट वर ठेवून मी टाँयलेट मध्ये गेली. Toilet entrance room ला दोन door लावून, toilet madhe geli २ मिनिटात बाहेर आली. बाहेरचा डोअर ची कडी काढली .पण दरवाजा उघडत नव्हता. आतील दरवाजा ठोठावून बाहेर आवाज जात नव्हता. कारण बाहेरचा आणखी एक डोअर बंद होता. कितीही प्रयत्न करून दरवाजा उघडला जात नव्हता .मी आत अडकले होते. टाँयलेटच्या बाहेर पडायला रस्ता शोधू लागले  मी इथे अडकले हे बाहेरच्या डाँ.रांच्या  लक्षात  आले नाही. तर..... 

 मला माझी पाळणा घरात ठेवलेली छोटी मुलगी आठवली, नंतर नवर्याचा संशय आठवला, व मग मी बाहेर पडायला रस्ता शोधू लागले .टाँयलेटच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या तरी आडवे लाेंखडी राँड होते. मग दरवाज्याच्या व लादी च्या मध्ये एक झरोका येण्या इतपत जागा होती. मी खाली बसली. बोटे त्या गँपमध्ये घालून दरवाजा जोरात ओढला व जिंकले दरवाजा उघडला. बाहेर कुणाच्याही लक्षात आले नाही. तुम्ही तर मघाशीच गेला होतात ना डाँ बोलले. मी मानेने नाही म्हटले व न बोलता त्यांच्याबरोबर चालू लागले .मी आत अडकले होते एवढे ही बोलू शकले नाही. फक्त एक सुटकेचा निश्वास टाकला. ते भूत नव्हते. किंवा आपण असे कुठेही अडकतो, पण पावसाळ्यात दरवाजे घट्ट बसतात तिथे ,.किंवा बांधकाम जूने झाले असेल तिथे. पण अशा नविन ठिकाणी दरवाजा उघडला नाही म्हणून अडकण्याचा, हा अनुभवच  मला खूप काही सांगून गेला. 

माहेरी १०००चौ फूट च्या घरात ३ वर्षाच्या मुलीबरोबर राहण्याची वेळ आली. पण मला कधी भिती वाटली नाही. जे अनुभव आले ते रात्री चे भयाण स्वप्न होते समजून  विसरून गेले. पण आठवणी छोट्याश्या झरेाक्यातून कवडसा येतो. तश्या भरभरून बाहेर येतात. 

      माझा एक विद्यार्थी बाहेर शिकायला गेलेला. तो आल्यानंतर मला रस्त्यात भेटला व छान स्माईल देवून गेला. मित्रांबरोबर फिरायला शिर्डी-नाशिकला पिकनिक ला गेला होता. रस्त्यावर कार अँक्सीडंट मध्ये सर्व मित्र गेले. त्यादिवशी आमच्या  अख़्ख्या गावात काळोख पसरला. तो जावून किती दिवस झाले होते माहीत नाही. पण मी झोपत असलेल्या बेडरूम च्या खिडक्यांवर हातांचे छाप जोरजोरात आपटत होते. एक दोन नाही खूप सारे विचित्र आवाज मी मुलीला घट्ट बिलगून ़छातीजवळ कवटाळून डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करायचे. खिडकी बाहेर सावल्या दिसायच्या. तू आम्हाला वाचवलं का नाही विचारायचे. मी त्याला फक्त एकट्या लाच ओळखत होते. पण तो कुठे गेला, कधी गेला हे माहीत नसताना मी कशी वाचवणार होते.? पण त्याने मला त्याच्या घरी नेवून स्वताच्या फोटोला हार घातलेला दाखवला.(झोपेत) तो अनुभव भयानक होता. त्याच्या घरी जायला माझ्यासोबत कुणी नव्हतं व मला एकटीला जायला धीर ही झाला नाही. मुलीला घेवून जायचं व काही कमी जास्त झालं आजारी पडली तर. त्याच्या जवळील व्यक्तींना असा अनुभव आला आहे  की नाही माहीत नाही. पण मी व मुलींनी सकाळ पर्यंत ती रात्र फक्त आक्रोश घातलेल्या आत्म्या बरोबर घालवली. पण आम्ही घाबरलो नाही. पण जे दुख देवून तो मला गेले. ते मी सांगूच शकत नाही. आणि सांगितले तरी तो मला जवळचा, जातीतला, नव्हता त्यामुळे कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही. 

    पावसाळ्यात मध्यरात्री प्रचंड विजा चमकत होत्या, ढग गडगडत होते. एक विज एवढ्या जोरात कडाडली.की आमच्या घरावर पडली की काय? असे मला वाटले. आमच्या घराच्या समोरील गल्ली वजा रस्त्यावरून एक पांढरी शुभ्र साडी नेसलेली लांबसडक केस असलेली स्त्री जात असताना पाहीली.(ती गाडी होती? ) एवढ्या भयाण रात्री रस्त्यावरून कुठे जात असेल. कोण असेल ती स्त्री ? सकाळी पहाते तर , खिडकीची काच तडकली होती.

असे अनुभव प्रत्येकाला येतात. की ते भास अभासांचे खेळ आहेत. लहानपणी व लग्न झाल्यापासून ते माझी पाठ सोडत  का नाहीत? 

मी घर बदलून आता राहते त्या घरी आले. इथे आल्यावर मध्यरात्री माझा कुणीतरी घसा दाबत होते. मी उठायचा प्रयत्न करत होते पण उठता येत नव्हते. मी रामनामाचा जप केला व डोळे उघडून पाहिले, पण कुणी असणं शक्यच नाही. 

  मुलगी शाळेत गेली की  मी माझी सर्व कामे आटोपून  पुस्तक वाचावयास घेत असे पुस्तक वाचताना मी एकदा  झोपली असताना मला घरातील लाईट चे बटन दाबताना एक मान  नसलेली व्यक्ती दिसली  दिवसा हे कसले स्वप्न  मी स्वप्नात वडिलांना हाक मारली. मला हे सर्व अनुभव घरात येत होते. मी पूजापाठ व्यवस्थित करत असताना, आमच्या घरात गैर गोष्टी घडण्यास वाव नाही.अभद्र काही घडत नसताना ह्या निगेटिव्ह लहरी कुठून येत असतील. ? 

काही अनुभव इतके भयाण असतात. की मन गारठून टाकतात. मग मनाचे खेळ तरी कसे म्हणायचे.? एखाद वर्ष झाले असेल आमच्याच विंग मध्ये एक व्यक्ती  गेली. मुलगी रात्री ९ नंतर क्लास वरून येत असे व तीला आणायला मला २० मी स्कूटी चालवून आणायला जावे लागे. त्या दिवशी मेन रस्त्याची लाईट गेलेली. रस्त्यावर चिटपाखरूही नाही. एखादी मोटार ओव्हरटेक करून गेली तरच... अशा वेळी जोरात वारा वहात होता. व मी काळोखात फक्त माझ्या गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात गाडी चालवत मुलीला आणायला जात होते. , एक मोठी पोटली  घेवून जाणाऱ्या माणसाच्या अगदी जवळ गेले, कारण काळोखात मला तो दिसलाच नाही. व रस्ता मोकळा असल्यामूळे माझ्या गाडीला वेग होता. त्या माणसाने मला उंचावून हात केला. खरोखर त्याजागी माणूस आहे की नाही हेही मी पाहीले नाही कारण इतक्या रात्री काही विकणारा लाईट नसताना माणूस रिक्षा सोडून एवढे ओझे घेवून चालत कशासाठी जाईल? लांबून तो माणूस नाही , पण त्याचे भलेमोठे गाठोडे मला दिसायला हवे होते की नको? 

       मला गाडीच्या आरश्यात  वार्यावर उडणारी माझी ओढणी  दिसली.व उडताना होणारा वारा भरलेला फडफड आवाज कानात ऐकू येत होता. म्हणून मी माझी गाडी स्लो केली.एका हाताने ओढणी पकडण्याचा प्रयत्न केला तर हाताला उडणारी ओढणी लागत नव्हती म्हणून पुढून ओढणी पकडून पाहीले तर दोन्ही टोके मी गाठ बांधून अडकवली होती. मग मी चरकलेच.गाडीला वेग देत पल्ला गाठला. येताना बरोबर मुलगी होती. व भीतीही गेली. 

मध्यरात्री नीळे डोळे दरवाज्याजवळ मी अनेकदा पाहीले लाईट लावून पाहिल्यास बाहेरील लाईट दाराच्या खालच्या फटीतून आत येताना दिसते. 

मी पहिला लेख ज्या रात्री लिहीला. त्या रात्री मुलीच्या डोक्यामागे एक स्त्री आपले मोकळे केस डोक्यावरून उलटे करून डोके माझ्या मुलीच्या डोक्यावर वाकवून उभी असल्याचे पाहीले. माझी मुलगी भूत मुळीच मानत नाही. ती घाबरत ही नाही. पण पूर्ण रात्र झोपत नाही. मला (घरात ) येतात. तसे अनुभव तिलाही येत असतील? तिलाही भूत दिसत असतील पण घाबरवत नसतील आम्ही ह्यावर चर्चा करत नाही उगाच  दोघींचे अनुभव सारखे असायचे. दोघी तिच्या जन्मापासून एकत्रच राहत आहोत. तेव्हा लहान असताना बुवा म्हणणारी आता भूत ओळखणारच....... 

आत्मे संवाद साधतात एवढे  मात्र नक्की कारण प्रत्येकाला आपले जीवन प्रिय असते व आपण अजून जगावे असे वाटतच असते. .... 

ह्या मागे सायन्स असेल,,, रक्तदाब वर खाली झालेला असेल, सावल्या असतील. भास असतील मन कमकुवत असताना मनाचे खेळ ही असतील. माझा इथे भूत असल्याचा दावा, किंवा मतही नाही. पण हे माझे एका  मनाच्या दुबळ्या क्षणी  आलेले खरे अनुभव आहेत. भुताला वरचढ म्हणून मनात देवही असायलाच हवा. 


समाप्त. 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


वर्षा प्रभाकर पाटील. ©®

बी, एस, सी,(micro) 

 डी एम एल टी. 

९८१९४०६८१३

१५/०९/२०२०

उरण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4