हळदीकुंकू भाग :२
माझ्या आठवणीतूनः हळदी कुंकू
भाग: २
४ वर्षातच मी मोहल्ला सोडून आले .येताना बरीच चांगल्या वाईट आठवणींची शिदेारी घेवून आले,
निवडणुका तोंडावर आल्या होत्या आणि बायकांच् हळदी कुंकू सुद्धा. नटून थटून बायका गल्लीच्या बोळात जमल्या होत्या. माझी आई आजारी होती पण मी परतल्याचा आनंद तिला भारी, जणू सिमेवरील युद्धातून जिंकून जिवंत परत आले होते.
बायकांच्या त्या हळदी कुंकूवात साडी वाटप झाले. मी कुठे? बायका बोलवत होत्या, आणि मी जायला तयार नव्हते. अग हळदी कुंकूवासाठी नाही म्हणू नये. साडी घ्यायला मात्र मी नकार दिला, मी वर्गणी विली नव्हती त्यांच्या वार्षिक वर्गणीतून हळदी कुंकू होते. मी आपली एवढी वर्गणी काढतात, मोठाली वस्तू भेट म्हणून देतात. चांगल्या भरजरी साड्या, मी आपले भाबडे पणाने विचारले. नंतर प्रत्येकीच वैयक्तिक हळदी कुंकू झाले. खूप सारी वाण गोळा करून आले, घरी आल्यावर आईने ती साडी मलाच दिली प्रेमाने बहुतेक ते वाटप पक्षाच्या वतीने होते, माझ्याच भाबड्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले.
दरवर्षी प्रत्येकीच्या घरी अगत्याचे आमंत्रण होते. आणि मी आवर्जून जात राहीले. इथे बायकांच्या संखेला तोटा नव्हता, फक्त माझे हळदी कुंकू मात्र थांबले होते.
आई वारली. मी आणि मुलगी दोघीच त्या एवढ्या मोठ्या घरात रहात होतो. भावांचे घर भावाने हवे होते. तेव्हा वडिलांनी बाजारपेठेत नविन छोटा वन रूम किचन फ्लॅट घेवून दिला. माझ्याच विंग मध्ये मी हळदीकुंकू वाला जात होते. असे अनेक जणांकडून हळदीकुंकू मिळत राहीले. इथे आल्यावर मी मार्गशिषातले गुरूवार सुरू केले. ५व्या वर्षी उद्यापन केले. बिल्डींग मधील बायका बोलवल्या . गावातील एकजण मुलीच्या शाळेत मावशी होती. तीला आमंत्रण दिले संध्याकाळी ती नवरा, बायको, दोन मुलं आली. विंग मधील बायका आल्या दुध शिरा,फूल, फळ आणि पुस्तक वाटली. पण सर्वांचाच उपवास असल्याने बायकांनी फूल, फळ पुस्तक घेतले. शेवटी फळ, पुस्तकेही संपली. आता दरवर्षी करेन ठरवलं पण पुढल्या वर्षी शेवटचा गुरूवार आड आला. आणि राहिलेलं हळदीकुंकू राहूनच गेलं. पाहू ह्या वर्षी जमतंय का? कारण ललितापंचमीला करेन ठरलं पण कोरोना मुळे बायका जमवणे शक्य राहीलं नाही. स्वत:च्या मुलीला पुजून ह्या वर्षीच हळदीकुंकू आटपून घेतलं.
समाप्त.
वर्षा पाटील।©®
9819406813
Bsc(micro)DMLT.
24/10/2020
12:20 am
Uran.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा