मोहक कळी


तूला संबोधून वेलीवरची

  मोहक कळी 

  केली मी तुझ्याशी मैत्री

  डोलले वार्यावरती, 

  झुलले वेली वरती

  तरल तुझ्या स्पर्शाने 

  वेडावले  मन माझे,

   हर्षित मी झालेा..., 

  ते  पाहिले त्या नादान भवर्याने

  त्याने तोडली तूझी

  नाजूक पंखूडी

  ओरबाडले तूला

  त्याच्या विषारी डंखाने

  भयभीत झालो मी 

  तूझ्या दुखर्या हुंकाराने

  मीही मग सिद्ध झालो

  लढण्यास साहसाने

  परी नाजूक माझे पंख

  नाही घेतली माघार

  झेलले विखारी डंख

  विलग झाले अंग

 धारातीर्थी पडलो. 

 जिथे पडल्या होत्या

 आधीच तूझ्या पाकळ्या

 उडाले वार्यावरती पर

 संग उडाले पराग कण

 नाजूक उमलतील पून्हा कळ्या

 पून्हा उडतील तितलियाँ 

 सतावतील खोडकर भ्रमरे

 पून्हा घडतील अशाच कहानीयाँ


Varsha patil©®

Uran

9819406813

18/3/20

1:55am

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4