बोन्साय
विचारांच बोन्साय होवू देवू नका,
त्यांच्या मुळांना खोलवर रूजू द्या,
त्यांच्या फांद्या दूरवर विस्तारू द्या,
विचारांच्या फांद्या पानां, फुलां, फळांनी
लगडू द्या.
बोन्साय दिसायला सुंदर असलं तरी, त्याची मुळ
तारांनी आवळलेली असतात, त्या मुळांना मुक्तपणे
पसरू द्या, मातीत रूजणं,रुजून, विस्तारणं,
वाढून फळ, फुलणं, हाच निसर्ग नियम आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वर्षा प्र पाटील©®
उरण नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा