वाट
वाट :
वळणा वळणाची
मला कधी
तूझ्या घरी घेवून आलीच नाही
. आणि कधी
माझ्याही घरीही घेवून गेली नाही.
मी तिच्यावर विश्वासून
चालत राहीली पण..
कायम ती मला
चकवा देत राहीली.
वाट आयुष्याची
मला कधी
माझ्या ध्येयपूर्तीकडे
घेवून गेलीच नाही.पण..
तरी ,मी
कठीण चढण चढतच राहीली.
कारण ती संपत नव्हती,
तिनेच मला चालण्याची स्फूर्ति दिली.
वाट,
मना मनाची
कायम मला
विचारांची चालना देत राहीली.
म्हणूनच मला ती आवडत गेली
वर्षा प्र पाटील©®
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा