कर्ज भाग १
कर्ज:भाग१
मी तूला हातात घेताना खूप हारकलो ! फार नाही बा ला धोतर ,आयला लुगडं तिला काचोळी ,नी पोराला सदरा ,नी पोरीला परकर,! इतकच नाय थोड बियाण, थोड खताणं ,नी थोड भाकरीला पीठ, नी थोडा कडबा , घरला घेवून आलो.
शेत नांगरून बियाणं पेरलं ,खताणं मारलं, हिरवं वार्यावर डोलू लागलं, मन कसं आनंदान भरून आलं.
आवकाळी पावसानं घेरलं ,कशी? ढगफूटी झाली रे देवा! होत्याचं नव्हत केलसं !
क्रमश:
वर्षा प्र पाटील. ©®
उरण, नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा