नूर भाग: ३


 नूर भाग २ वरून पूढे

काहीतरी विचार करून नूरचे पाय बाजारपेठेकडे वळले. तिने आजच्या मजूरीतून काही लहान सहान ठोकळे, काही रंग व १-२कँनव्हाँस बोर्ड विकत घेतले. काय माहीत कदाचित वडिलांच्या ह्याच कामात आता तिला हातभार लावावा लागेल. सामान बास्केट मध्ये टाकत तिची पावले,घराकडे वळली, ती झरझर पावले टाकत घराकडे निघाली, आपण जर कामावरुन काढले गेलो तर कदाचित बोर्ड रंगवू, किंवा ठोकळ्यांना आकार देवू पण त्याच बरोबर आपला मुलगा आपल्या बरोबर असेल, ह्या विचाराने जरा ती खूश झाली. दारात पानांचा जूडा बकरीला टाकून त्यांना तिन् गोंजारलं ते उगाचच शहरलं हळूच बँ करून ओरडलं,

घरात जावून स्वत:च पटापट आवरून, बकरीचे दूध काढून चहा तयार केला. बाहेरचं कुड लावलं, बाजारातून आणलेल सामान वडिलांना दिलं ते, पाहून ते कसनुसं

हसले. मागच्या खेळण्याचे पैसे अजून आले नव्हते, मुलीला ते नविन सामान आणायला कसं सांगणार? मुलीला त्याच्या चेहर्यावर च हसू पाहून बरं वाटलं, काम आटपून ती गादीवर विसावली. कितीही लवकर उठलं, तरी दररोजची ५-१०मिनीटाचां उशीर ठरलेलाच होता. जून्या ठेकेदाराला ते माहीत होत. पण आता ते चालणार नव्हतं. विचार करता करता नूर ला झोप लागली. नोव्हेंबर महिना सुरू झाला होता. बाहेर बर्फाची भूरूभूर चालू झाली होती. .... 

सकाळी सर्वत्र छान बर्फाचे गालीचे पसरले होते. सुर्याची किरणे त्यावर पडून छान चमकत होती. परावर्तित होत होती. एक सूंदर सकाळ ला सुरूवात झाली होती. नूरने आपले काम आटोपले. व बाळाचा पापा घेवून दार बंद करून चालू लागली. बाप सकाळ पासून लाकडी ठोकळ्यांना आकार देण्यात गर्क होता. 

आपले बास्केट पाठीला लावून नूर पाने खूडत होती. तेवढ्यात नविन मालकाची गाडी तिथे आली. सर्व कामगारांना त्यांनी एकत्र बोलावले. स्वत:ची ओळख करून दिली. त्यांनी फक्त चहाचा बगीचा नाही तर ५*हाँटेलही विकत घेतले होते. कोणत्याही कामगाराला तो कमी करणार नव्हता उलट त्याने खूषीने सर्वांचा पगार वाढवून दिला होता. सर्वानी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. सर्वाना कामे वाटण्यात आली. सर्वाना वाढीव कामे देण्यात आली होती. नूर ला दररोज जाताना बास्केट भरून चहा ५*होटल मध्ये दररोज द्यायचं होत. नूरचा चेहरा पालटला. एकतर तिला घरी जाताना चहाची पाने घेवून जाता येणार नव्हती आणि दररोज घरी जायला उशीर होणार होता. नविन मालक निरोप देवून निघून गेला. मुकादमने नूरचा चेहरा ओळखला त्याने तिला लवकर "चहा पाने"होटल मधे घेवून जायची, मुभा दिली. आणि तिला चहाची पाने वेगळ्या थैलीत नेण्याची अनुमती ही दिली. तिला खूपच आनंद झाला. तिला वाटलं होत त्याहून खूप वेगळ घडलं होतं. खूप चांगल्या गोष्टी घडण्याची तिला सवय नव्हती, तरीही असं काहीतरी चांगल व्हायला सुरुवात झाली होती. उद्याचा नूरचा सुट्टीचा वार होता. तसं सर्वाना एकत्र सुट्टी मिळत नव्हती. आलटून पालटून सर्वाना सुट्टी मिळत असे. 

नूर ने डाळ भात चुलीवर चढवला आणि कधी विचाराच्या तंद्रीत गेली कळलच नाही. तिचा भूतकाळ तिच्या डोळ्या समोर दिसू लागला तिची आई दम्यान त्रस्त होती. त्यामूळे नूर लाच सर्व काम आटपावी  लागत, सकाळी काँलेजला जावून आली की घरातील कामे आटपून ती पहाडीवर बकर्या चरायला घेवून जात असे. पहाडावर जाणं तिला फार आवडत असे, मोकळ्या थंड हवेत ती स्वच्छंद भटकत असे. अशातच एके दिवशी, ती २-३तासाने घरी आली. पहाते तर वडिलांनी चहाचा बगीचा विकण्याच्या पेपरवर सही केली होती . आपण शिक्षित असताना वडिलांनी घरात काहीही चर्चा न करता असा निर्णय घ्यावा, हे तिला आवडल नाही. खूपच कमी किंमतीत तिच्या वडिलांकडून तो मळा  कसणार्यांनी विकत घेतला होता. पण नंतर तो त्यांनी चांगल्या किंमतीत बागाईतदाराला विकला  होता.

 आईचा डाँ. खर्च, नूर चाअभ्यासाचा खर्च, घर खर्च एवढ सगळा खर्च वडिलांना  निघत नव्हता, म्हणून त्यांनी ंमळा दुसर्यला चालवायला दिला,  व स्वत: जोडधंदा म्हणून खेळणी बनवायला घेतली. पण मळा चालवायला घेतलेल्या माणसाची नियत पालटली. मळा हातातून फुकटचा जावू नये, म्हणून वडिलांनी त्याच माणसांला  तो मळा कमी किंमतीत विकला. त्यानंतर वडिलांनी असाच अविचाराने निर्णय घेतला. पैसा संपण्या आधी  त्यांना नूरचे लग्न करायचे होते. त्यांच्याच खेळण्याच्या दुकानात कामाला असलेल्या प्रामाणिक मुलांसोबत नूरचे त्यांनी लग्न केले. नूर सूंदर होती. शिकलेली होती. पण तिचे लग्न त्यांनी  सर्वसाधारण मुलासोबत करून दिले. वर्षभरातच एका अँक्सीडंट मध्ये तो वारला, आणि लहान तान्हा सह नूर घरी परतली. आई आधीच आजारी होती. ती सर्वस्व गेल्याच्या धक्क्यातून सावरली नाही. तीही ६ महिन्यात  स्वर्गवासी झाली. नूर नी वडिलांशी बोलणं टाकलं पण  तिला त्याच घरी रहाव लागणार होत. तेही एका लहानश्या जीवाची जबाबदारी घेवून....... 

रटरटट्या भाताच्या आवाजाने नूर भानावर आली. 

दिवसभरात वडिलांनी खूपच खेळणी बनवली होती. उद्या तीही बाजारात जावून द्यायची होती. 

सकाळची सर्व काम आटपून, नूर पहाडीवर बकर्या चरायला घेवून गेली. मस्त पानांचा आस्वाद घेताना बकर्या अत्यानंदाने उड्या मारत होत्या. तितक्याच निरागसपणे नूर त्यांच्या बरोबर बागडत होती. दूरवरून असाच पहाडीचा आनंद घेणारा कुणीतरी( दूरवरून ) तिला न्याहाळत होता, तिच्या हालचाली टिपत होता, पण तिच्या हे ध्यानी ही नव्हतं अचानक तिला आपल्या मागे कुणाची तरी चाहूल लागली. तिने वळून पाहिलं एक  अनोळखी सूट बूट घातलेला हात खिशात घालून तिच्या मागे येवून उभा होता. त्याच्या चेहर्यावर गाँगल होता, त्यामुळे ती त्याचे भाव टिपू शकली नाही. पण ती व्यक्ती दुसरी कुणी नसून, तिच्या चहा बगीच्याचा नविन मालक होता. नूरने  कालची मळ्यतील ओळख सांगितली. स्वताचे नाव सांगितले,थोड्या गप्पागोष्टी करून  झाल्यावर मालकाने स्वताचे नाव सांगितले, अनिष राँय. दोघे बकर्या घेवून पहाड उतरून खाली आले. तो गाडीत बसून निघून गेला. अशा एकांतात आपल्याला मालक भेटेल असे नूर ला वाटले नव्हते. ती उगाचच मनातून आनंदून गेली. संध्याकाळ होत आली, हवेत गारठा होता. तिला परत बाजारात खेळणी घेवून जायचे होते. पण घरी येताच तिला  आश्चर्याचा धक्का बसला. खेळण्याचा दुकानदार तिच्या घरी आला होता. मागचे पैसे घेवून तेही चांगल्या  परताव्यासह वडिलांनी आजही खूप सारी खेळणी तयार केली होती. दोन दिवसाची खेळणी घेवून दुकानदार निघून गेला. 

दररोज परतताना हाँटेलमध्ये जावून  तेथील कँटीनमधल्या बर्याच मुलांशी नूर ची ओळख झाली होती. ते तिला दीदी म्हणत त्याच बरोबर  तिला ५*हाँटेलच्या आवारात वावरण्याचा सराव झाला होता. तिचा गेलेला आत्मविश्वास परत येत होता. 

अचानक सर्व हाँटेलच्या व बगीच्यातील कामगारांसाठी नविन वर्षाच्या पार्टीची घोषणा झाली. ह्यावर्षी सर्व ासाठी नविन वर्षांची पार्टी ५*हाँटेल मध्ये होणार होती. सर्वांना त्याबद्दल कौतुक उत्सुकता वाटून राहीली होती........ 

क्रमश:

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4