नूर भाग:२


  बाप दिवसभर पेंटींग काढायचा, किंवा लाकडी खेळणी बनवायचा, बाप एकदम शांत. मुलीशी मोजकेच बोलायचा म्हणजे त्यांच बोलणंच बंद झाले होत, काय आणि कशावर चर्चा करणार खेळणी व पेंटींग दुकानात द्यायला स्वता जायचा पण मोबदला फारच कमी मिळायचा, ते पैसे रंग व बोर्ड आणण्यातच खर्च व्हायचे ते पाहून नूरने ते काम स्वतःकडे घेतलं, पैसे वस्तू विकल्या शिवाय आधी मिळत नसायचे ,त्यामूळे बेभरवशाचे  वेळेवर हवे तेव्हा मिळणं कठीण ,त्यामूळे नूरच्या रोजंदारीवरच घरखर्च चालायचा, 

सकाळी स्वताच आटपून बकर्यांना दिवसभराचा पाला टाकून बाप-पोराच जेवण करून नूर कामावर जायला तयार झाली. दोन झाडांच्या मध्ये अडकवलेल्या दोरीवर पटकन कपडे आडकवत होती. नूर सूदंर गोरीपान गुलाबी गालाची उंच  रूंद बांध्याची दोन नाकाच्या मध्ये आडकवलेली चांदीची वाळी, उंच मानेत अडकवलेल चांदीची कडं, हातभर हस्तीदंताच्या बांगड्या व चांदीची कडी तशीच कडी दोन्ही पायात आणि कानात डुल,लांब पायापर्यंत पसरलेला घेरदार स्कर्ट आणि त्यावर गडद हिरव्या कंच रंगाचा लांब हताचा स्वेटर हा नेहमीचा नूरचा पेहराव. जस तिचं दिसणं सुंदर तसचं तिचं सहज खळखळून हसणं,पाहताच कुणाचीही नजर खिळावी.

 बापाजवळ पोराला ठेवून जायला नूर ला जड जाई, पण तिला ते करावचं लागे.

नेहमी सारखा आजही नूरला उशीर झालेला, ़घाईघाईत ती कामावर पोहचली हजेरी लावली, व मोठी पान छाटायची कातर घेवून झुडपांना आकार द्यायला लागली.... 

करकचून ब्रेक दाबत मोठी गाडी रस्त्याला थांबली तशी मोठी गाडी यायला रस्ता अरुंद च होता, पण तसंच महत्वाचे काम असेल म्हणून आज ती कुणीतरी आणली होती. गाडीतून चहा मळ्याच्या मालकासह आणखी दोन तीन माणसे उतरली. हसून खेळून गप्पा मारत मळाभर  फिरली. आणि आली तशी गेली. मालक मळा विकून नवा मालक येतो अशी बातमी ठेकेदाराकडून आली. तसा नूरचा चेहरा उतरला, ह्या व्यवहारात माणसं कपात किंवा  जूनी काढून नवी भर्ती असं काही व्हायला नको. आज तिच लक्ष कशातच लागेना सर्व दिवस विचार करण्यात गेला. प्रत्येक दिवसाच तिच वेळापत्रक ठरलेल, वेगळ असं खास तिच्या जिवनात नव्हतं. 

नेहमी सारखीच आपली मजुर घेवून पान खुडत नूरने घरचा रस्ता धरला, वातावरणातला गारवा अधिकच वाढला, बहुतेक हिमवर्षाव होतो की काय? 

क्रमंश:

:.. 

वर्षा प्र पाटील©®

उरण नवी मुंबई

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4