लेखणी:
आपल्या तोडांतून ध्वनी बाहेर येतो. हे मानवास समजले. मग त्या ध्वनींच्या माध्यमातून स्वर, अक्षर शब्द भाषा व लिपी उदयास आली. वाल्मिकी ऋषीनी पहिले रामायण हे महाकाव्य रचिले.
पूरातन काळी लिहिण्यासाठी पक्षांची पिसे, लेखणी म्हणून वापरीत, मोरपीस हे लांब ,रूंद, आकर्षक असते म्हणून त्याचा वापर होत असे, विविध जंगली फळांचा गडद रस शाई म्हणून वापरली जात असे.
महाभारत लिहीताना व्यास ऋषींनां बुद्धीमान लेखनीक हवा होता , म्हणून त्यांनी गणपतीस निवडले, गणपतीस लिहायचा कंटाळा होता, म्हणून त्यांनी मी न थांबता लिहीन. जर मी लेखणी थांबवली, तर पूढे लिहीणार नाही. असे व्यास ऋषींनी सांगितले . व्यास ऋषींना विचार करायला वेळ हवा होता. म्हणून त्यांनी मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजल्या शिवाय लिहायचे नाही, असे सांगितले. पूढे लिहीत असताना गणपतीस लेखणीचा त्रास होवू लागला, म्हणून त्यांनी आपला दात तोडला. व त्याची लेखणी बनवून महाभारत लिहीले. व स्वत: एकदंत म्हणून प्रसिद्ध झाले. (एकप्रकारे त्यांनी हस्तंदती लेखणी वापरली. )
त्यानंतर गेरू, ही बांबूच्या किंवा इतर झाडाच्या छोट्या लवचीक काड्या तासून त्यापासून लेखणी बनवून वापरू लागले. फळे-घाणेरी, कंदमुळे-बीट इतर जंगली फळे या पासून शाई बनवून ताडपत्री ची पाने,पलाश वृक्षाची पाने, व इतर वृक्षाची पाने, ही लिहिण्यासाठी वापरीत, अर्थात पूर्वीचे लेखन हे संस्कृत ह्या भाषेत ,व श्र्लोक रूपात लिहीत आसतं. गेरू, टाक,शाईत बुडवून मग लिहीले जायचे.
नंतर आधूनिक काळात अनेक (पेन व पेन्सील)लेखणी चे प्रकार अस्तित्वात आले. कलर पेन्सील, पेन्टिंग चे कलर, वेगवेगळ्या शाईचे प्रकार,धातूत मोरपिसे आडकवलेले पेन हस्तींदंतात शाईची नळी टाकून हस्तिदंती लेखणी , प्लास्टिक चे पेन, वेगवेगळ्या धातूचे, सोन, चांदी, गिनीगोलचे पितळी,लोखंडी, पेन, कॅमेरा लावलेले पेन, आवाज रेकाँडिंग करणारे पेन, अशा नविन रूप ल्यायलेल्या अनेक लेखण्या मिळू लागल्या.
पूर्वीच्या लेखणीने एक प्रकारचा दाब, (जोर) देवून लिहावयास लागायचे, त्यामूळे अक्षर सुंदर मोत्यासारखे यायचे, नंतर आधूनिक कागद झाडापासून तयार झाला तरी अतिशय (स्मूथ)गुळगुळीत तयार होवू लागला. केमीकलने तयार (फिल्टर) गाळून, दाट शाई तयार होवू लागली. आधूनिक विज्ञानात जसे शोध लागू लागले तसे अभ्यासक्रम वाढू लागले. सुखसोयी वाढू लागल्या,पण आळस व अधुनिक सामुग्री मुळे मुलांच्या हस्ताक्षरात दर्जा ढासळू लागला. अक्षरापेक्षा फराटेच कागदावरअधिक दिसू लागले. पूढे आणखी प्रगती होवून टंकलेखन, प्रिटींग प्रेस आली, व खराब अक्षर व लिखाण नामशेष होवू लागले . त्याही पूढे, टंकलेखनाच्या जागी संगणक आला, व ' प्रत्येक' कामाचा वेग वाढू लागला. अभ्यासाच्या तयार (सी डी)ध्वनीमुद्रका मिळू लागल्या विद्यार्थाचा आता अभ्यास पाहून व ऐकून करण्यावर भर पडू लागला. मोजक्या कामा व्यतीरिक्त पेन कागदाचा वापर जावून माउस, व कीबोर्ड चा वापर वाढू लागला.
कुरू क्षेत्रावर युद्ध चालू असताना धृतराष्ट्राला युद्धाची माहीती संजय पाहून सांगायचा.
कोरोनामुळे शाळा काँलेज आँन लाईन झाले आहेत. मुलांचा अभ्यास, परिक्षा पूर्ण संगणकृत झाल्या आहेत. अशा वेळेस लेखणी, कागद हद्दपार होईल की काय वाटू लागले आहे. कागद बनविण्यासाठी वृक्षतोड होणार नाही. हे स्तुत्य असले तरी, मुलांचा अभ्यासच बंद होणार नाही ना? ही भीती खुणावते आहे.
आधूनिक विज्ञानाच्या वापराने माणसांच्या कामाचा वेग वाढला. पण नैसर्गिक तोल ढासळू लागला.
लेखनीक म्हणजे गणेश नाकारून आपण उंदीर वापरू लागलो. त्याचाच बाप्पाला राग तर नाही ना आला.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वर्षा प्र. पाटील. ©®
उरण(नवी मुंबई)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा