दिपावली भाग २
दिवाळी सुरू होत असे. सुगीचे दिवस सुरू झाले पिक घरी आली. की शेतात काम केलेल्या बैलांना विश्रांती सुरू होत असे. त्यांनी पावसाळ्या पसून शेतात राबून पिक घरी घेवून येई पर्यंत कष्ट केलेले असतात. तेव्हा त्यांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जाणारा सण. ह्या दिवशी बैलांची आंघोळ करून त्यांची शिंग रंगवून झालर टाकून गळ्यात माळा टाकून नटवून नंतर त्यांची पूजा करून गोडाचे(गूळ घालून केलेले पदार्थ) पदार्थ खाउ घालत.
धनत्रयोदशी:ह्या दिवसापासून पहाटे लवकर उठून दिव्यांची पूजा करून अंगणात दिपांची(पणत्यांची) माळा लावण्याची प्रथा असे.दिव्यामध्ये काही दिवे मातीचे, काही मिनगुट(निवडुंग)चे काही पिठाचे असत. ते दिवे वेगवेगळ्या जागी तेवत ठेवत गोठ्यात, विहिरीजवळ, तूळशीजवळ, मोरीजवळ, माळ्यावर, माजघरात, जवळ शेत असेल तर त्यांच्या बांधावर ठेवण्यात येत असत. हेतू हा की आपल्या जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याजागा प्रकाशमान कराव्यात.
नरकचतुर्दशी: ह्या दिवशी पहाटे ४ला उठत असू. व गावात सर्व प्रथम उठणारे प्रथम फटाके 🎇 वाजवत असतं, काही महाभाग रात्रभर रांगोळी काढत बसत काही दिवाळीचे काही राहिलेले पदार्थ बनवत असतं व नंतर तसेच अंघोळी उरकून घेत. सर्वात पहिल्यांदा उठणचा आनंद भारी असे. प्रदूषण फार नसल्यामुळे तेव्हा दिवाळीत थंडी असे. रांगोळी काढून पाट मांडून त्यावर बसल्या वर आई केसांना नारळाचे तेल लावी. मग कानात गरम केलेले तेल टाकी, मग अंगाला उटणे लावी. ते गरम तेलात कालावलेले असले , तरी अंगावर लावल्यावर थंडी लागत असे. मग मोती साबणाने अंघोळ. दरवर्षी चा साबण ठरलेला, तो हातात पकडताना येत नसेइतका मोठा. मग नविन टाँवेलने अंग पुसून नविन कोरे कपडे घालायचे, मग आई दारात आरती ओवाळीत असे. मग फटाके फोडायला पळायचे, लंवगी माळ, देवी बार, अनार् नरसाळे, मोठे मडक्यातील अनार, सुतळी बाँब, पिस्तुल, खडी फूलबाजी, साधी फूलबाजी, चक्र, नागगोळी, एका झाडाच्या टोकापासून ढुसर्या झाडाच्या टोकापर्यंत ४०ते५० फूट लांब धाग्यात बांधून सु सू.........करत जाणारा फोन, बाण, असे एक ना अनेक प्रकारचे फटाके पुरवून पुरवून वापरत असू . सर्वांच्या अंघोळी झाल्या वर सर्व एकत्र बसून फराळ करत असू. मग आईने बांधून दिलेला फराळ घरोघरी वाटत असू.
लक्ष्मीपूजन:ह्या दिवशी नटून थटून संध्याकाळी दिप प्रज्वलन करून झाल्यावर मग घरी दागिन्यांची पूजा करत असू. लक्ष्मीला नैवेद्य दाखवल्यावर , भावाबरोबर गाडीवर बाजारात व्यापारी करत असलेली फटाक्यांची आतषबाजी बघायला जात असू. नंतर नंतर मैत्रीणी सोबत फटाक्यांची आतषबाजी पहायला जात असू
गोवर्धन पूजन : गाई गूर जिथे चरायला जातात. त्या किल्ल्याला गोवर्धन पर्वत मानून त्याची किल्ल्यावर जावून साफसफाई करून पूजा केली जात असे. ज्यांच्याकडे गाईगूर नाहीत, ते डोंगरावर न जाता घरीच छोट्या अंगणा शेजारी गड तयार करून मातीचे दिवे पणत्या खेळणी विकायल घरोघरी फिरणार् बायकांकडून मातीचे शिवाजी, मावळे, गाई गुरांच्या प्रतिकृती विकत घेत व किल्ला सजवता. दिवाळी संपे र्पयत ठेवत.
बलिप्रतिपदा: ह्या दिवशी सकाळी लवकर उठून थाळी व चमचा घेत, व वाजवत आई केर काढीत असे तिच्या मागे इडा पिडा टळो नी बळीचे राज्य येवो. असे बडबडत पार रस्त्यावर जावून कचरा, झाडू टाकून येवून परत अभ्यंग स्नान करून पाडव्याला नविन कपडे घालून. अंगणात रांगोळी काढून, त्यावर शेणाचे गोळे ठेवून, गवताचे कोंबडे(फुलाचा प्रकार) खोवून पूजा करत असू.
. भाऊबीज: ह्या दिवशी सकाळ पासून संध्याकाळ पर्यत आईचे १६ भावंड भाउबिजेला येत असतं ४ दिवसांनी मानलेला १८वा भाउ येत असे. प्रत्येक मामा नवनविन प्रकारची वेगवेगळ्या चवीची मिठाई आणत, प्रत्येक जण आईला साडी आणि, आमच्या साठी खूप सारे फटाके🎇 फटाके . मिठाई व साडी हे सर्व मुंबई च्या मेन मार्केट मधून आणत असत, आईचा १८वा भाउ हा साडी मँचींग ब्लाउसपिस, व मिठाई घेवून येत असे. ते शाळेत गुरूजी होते. व आई च्या माहेरच्या घरी अख्ख छोटेखानी घर भाड्याने घेवून रहात असत. आईचा सतरावा भाउ हा आईचा सख्खा बाहेरगावी(परदेशात मर्चंट नेव्हीच्या असणारा)असणारा हा भाउ दिवाळी झाल्यावर २-३महिन्याने येत असे येताना, फळे ,खूप सारी मिठाई ,आईला साडी व आम्हा सर्व भावडांना बाहेरचे कपडे आणत असे. आणि खूप सार्या गोष्टी.
माझे दोन भाउ, एक मानलेला भाउ,२ चुलत भाउ, ३ आते भाउ, ३ मामे भाउ,२ मावस भाउ१३-१४ भाउ भाउबिजेला येत असत. आम्ही सर्व बहिणी एकत्र त्यांना भाउबिज करत असू.
वडिलांना दरवर्षी सुक्यामेव्याचे मोठे बाँक्स कामावरून मिळत असे . पण काकांची छोटी मुलगी मामाकडे भाउबिजेला जात असे. ती आठ दिवस तिथेच मुक्काम ठोकत असत, पण ती परत आल्या शिवाय वडिल तो ड्रायफ्रुटचा डबा फोडू देत नसतं. ती आली की सर्वाना फोडून वाटत असतं, सर्व प्रकारचे मेवे लहानपणी खाण्यात खूप अप्रूप वाटत असे.
कराष्टमी ते वसू बरस पर्यत सर्व पारंपरिक पदार्थ तयार करतात. त्यात इतके पदार्थ असतात. की त्यांची लिस्ट खूपच मोठी होईल. इतके पदार्थ करताना एकमेकांच्या घरातील सुगरण बायकांची मदत घेतली जात असे. आमच्या कडे सकाळी कांकाच्या दोन्ही मुली आमच्याकडे मदत करायला व संध्याकाळी मी काकीकडे मदत करायला अशी आमची वाटणी होत असे. त्या नंतर माझी आत्या मला मदतीला जवळच्याच गावात तिच्या घरी बोलवत असे. ती खूपच चविष्ट आहार करत असे. तिच्या पध्दतीही कष्टकरी व वेळखाऊ असतं पण ती त्या सुंदर खमंग पदार्थ करत असे. तिने मला खूप सार्या पध्दतीने लाडू (चूरम्याचे लाडू),करंज्या करायला शिकवल्या. बहिणीने शेजार्याने रांगोळी काढायला शिकवले. भावांनी अंगण बनवायला फटाके वाटून घ्यायला, मामांनी द्यायला, वडिलांनी दुसर्या साठी वाट पहायला शिकवले. आईने इतरांना मदत करायला, आत्याने नविन कठीण पदार्थ बनवायला शिकवले. म्हणून मोठ्ययच्या संस्कारात घडले. मग आता बिघडलेा कुठे????
नेहमीच्या प्रवासात सकाळी ४ वाजता उठणे आता रोजचे झाले आहे. तेव्हा, दिवाळीची सुट्टी असून विश्रांती हवी म्हणून आम्ही सकाळी लवकर उठणे वर, केस तेलकट होतात म्हणून खोबण्या दुध केसांना लावत नाही. कोणतेच पदार्थ धड आवडत नाहीत. सगळ्याच पदार्थ ााााना नावे ठेवली जातात. वेळेअभावी फराळ विकतच आणला जातोफटाक्फयातील गंमत निघून गेलेली आहे आता त्या ठिकाणी ध्वनिप्रदूषण ााााने घेतली आहे . आता गावात सोडाच नातेवाईकांना फराळ घेवून जाणे आम्हाला आवडत नाही. पूर्वी ७ दिवस चालणारी दिवाळी आता २ दिसतात आटपते.
समाप्त.
वर्षा पाटील©®
उरण नवी मुंबई.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा