दिपावली भाग:१
आम्ही बी घडलो, ह्या मध्ये द्विअर्थी कोटी आहे. म्हणजे आम्ही पण घडलो., म्हणजे च तयार झालो, शिकलो. आणि आम्ही बिघडलेा. आता तुम्ही म्हणाल ह्या वाक्याचा आणि दिवाळीचा काय संबंध तर? तुम्हाला लेखाच्या शेवटी ह्या वाक्याची मेख लक्षात येईल.
आमच्या लहानपणी (हे वाक्य लहांनासाठी आहे. कारण समवयस्कांचे बालपण जवळ जवळ सारखंच असणार फक्त ते कलम हातात घेवून लिहीत नाहीत. )सहामयी परिक्षा झाली की दिवाळीची सुट्टी पडत असे. परिक्षेचा ताण,क्षीण निघून गेलेला असे. पास, नापास ,नंबर, ह्याची २१ दिवस तरी खंत नसे.
आता मोहीम फत्ते करायची असे. खूप सारी कामे असत, सर्वात प्रथम प्रत्येक गावाच्या अंगणात लहान/मोठे अंगण तयार करायचे असे, त्या साठी कुदळ फावडे घेवून साधारण ४,बाय सहा फूट लांब आयत आखून तो खणून त्यावर पाणी शिंपडले जाई, मग त्या ढेपळांना फोडून मऊ करून चोपटण्याने चोपून गुळगुळीत जमीन तयार करून त्याचे ६ते ८ इंच उंच अंगण बनवून दिवाळी यायच्या आठ दिवसा आगोदर पर्यंत दररोज चोपून छान अंगणात अंगण तयार करून त्यावर सारवण केले जाई. सारवण झाले की अंगण तसेच ठेवू नये म्हणून एखादे स्वस्तिक, किंवा छोटी रांगोळी रेखाटली जाई.
रांगोळीचा कागद नीट १इंच लांब वा इंच रूंद मोजून खाकी कागदावर ७५ ते १०० आडवे व उभे टिपके काढून त्याला उदबत्ती ने भोके पाडून नवा कागद तयार होई. मग सोप्या ते कठीण रांगोळ्या काढायची तयारी होई. आधी अंगण सारवून त्यावर टिपके काढून, ६०-७०टिपक्यांची रांगोळी निवडून टिपके काढायला, रंग भरायला लहानांपासून परवानगी असे पण टिपके गोलच आले पाहिजेत, रंग डार्क व फिकट न भरता एकसारखे च भरता आले पाहिजेत, रांगोळी चे रेखाटन मधील रेख ही सुंदर बारीक हवी जिथे नागमोडी असायला हवी तिथे तशीच वक्र हवी. मला ते छान जमत असे. अंगण बनवताना त्यावर जास्तीची माती शेतातून आणून टाकणे, शेणाने अंगण सारवणे , मोठ्या मोठ्या रांगोळ्य काढण्यास मदत करणे व नंतर तेवढ्याच मोठ्या रांगोळ्या स्वता काढणे, मला फार आवडत असे . मी शेजारी ही मोठ्या आवडीने रांगोळी काढायला मदत करण्यास जात असे मोठ्या रांगोळ्या २-३तास काढाव्या लागत, व कुणी मदतनीस असेल तर बरे पडत असे. नंतर शेणा ऐवजी गेरूने अंगण सारवले जाई.
मोठे अंगण सारवले जाई. माती, धोपटणे,गेरू, टिपक्याचां कागद, पुस्तक, रंग ह्याची सहज देवाण घेवाण होई. ,
हे झाले अंगणात आता घरातील कामे, सर्वात प्रथम माळा साफ करणे. सकाळी अंघोळ न करता माळावर चढायचे प्रत्येकीने एक एक कोपरा पकडायचा व साफसफाई करायची, मग सर्व माळावर ठेवलेली पितळी,लोखंडी भांडी, मोठाले डबे खाली काढून ती चिंचेने, राखेने घासून स्वच्छ केली जाई. मग उन्हात चटईवर उपडी घालून सुकवले जात, ह्यात वाळत घालण्याचे व काढण्याचे काम माझे असायचे. पूढे पूढे घासलेली भांडी धुवायचे काम करण्यात मजा यायची , कारण हे सर्व ५-६जणी मिळून करीत असू.
त्यानंतर कराष्टमीच्या दिवशी घरात पूजा करून घराभोवताली राख व पाणी शिंपडून ७ प्रदक्षिणा घालत असू. हेतू हा की तेलकट पदार्थ करताना कोणतीही पिढा //घटना घडू नये. भूतपिशाच्छाची बाधा होवू नये.
ह्या दिवसापासून दिवाळी च्या पदार्थ करण्याची सुरूवात होत असे सारवलेल्या अंगणात सुके खोबरे, खसखस, काळे, पांढरे, तीळ तांदूळ, गव्हू,पोहे भाजणीच्या डाळी,जीर्, मीर, धणे, इ. धुवुन, कडक उन्हात वाळत घालणे व मग थोडे गरम असतानाच परत कढईत भाजणे. व वेगवेगळे गिरणीत दळून आणणे, किंवा बर्याचदा जात्यावर घरीच दळणे कारण जर तिथेच उभे राहून दळून घेतले नाही, तर पीठ अदला बदली होत असत. व पदार्थ बिघडत असत.
मग वसू बारस.......
वर्षा प्र पाटील. ©®
Bsc( micro) DMLT.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा