योग साधना



माझं शालेय जीवन संपले, नी मी काँलेज ला जाण्यास सुरूवात केली. शाळेतील मधल्या सुट्टीत, पी. टी. च्या तासाला खेळताना होणारा व्यायाम बंद झाला. अर्थात दररोज घरातील कामे,विहीरीचे पाणी शेंदून गाईगुरांना पाणी नेवून पाजणे, झाडांना पाणी घालणे, पीठ मिळणे वाटण वाटणे, हा व्यायाम होत असे. पण तरी शाळेतील खेळ, कसरती बर्यापैकी कमी झाल्या होत्या. मी सुट्टीत माझ्या आत्याकडे गेली. तिथे माझी आते बहिण योगा क्लासला जात असे. अर्थात आता जसे उघड्यावर योगासना करतात. तसे न करता बंद ़खोलीत करत असे. मला शिकायचे तर होतेच, पण त्याहून कसे करतात पहायचे होते. खूप आढेवेढे घेतल्यानंतर तीने मला व तिच्या लहान बहिणीला पहायला खोलीत प्रवेश दिला. ३-४दिवसांनी मग तीने मला योगासने शिकवला सुरूवात केली. तिचे पाहून मी करत असे. आम्ही तिघीही थोड्या स्थूलते कडे वळत होतो. त्यामुळे घरी आल्यावर मी तिचे, पाहिलेले, व शिकवलेले योगासने ,नित्यनियमाने करू लागले. कारण मला स्थूल मुळीच व्हायचे नव्हते.त्यावेळी मी रहात असलेल्या शहरात योगा क्लासेस नव्हते. 

माझे काका तेही मुंबईलाच रहात असतं त्यांनी संपूर्ण योगा क्लासेस केले होते. व योगदान म्हणून ते त्या क्लासचे प्रशिक्षक म्हणून तेथेच योगासना शिकवत. गणपती, दिवाळी, मे महिन्यात ते नेहमी गावी येत. ते जे आठ दिवस रहात त्यात योगासना मध्ये त्यांचा एकही दिवस खंड पडत नसे. सकाळ, संध्याकाळ ते ठरलेल्या वेळी योग साधना करत. मी त्याच्याकडून व्यवस्थित शिकून बंद खोलीत योगासना करत असे. मीही खूप शिस्तप्रिय होती. मीही एकही दिवस न चुकता योगासना करायचे. नंतर पूर्ण दिवस काँलेज, प्रॅक्टीकल व नोकरीत सकाळी ६ते रात्री ८-९ वेळेपर्यत व्यस्त राहिल्या कारणाने योगा साधनेत खंड पडला, पण शनिवरी/रविवारी ंं,वेळ ,मुड, असेल तशी योगासना करू लागले. 

नोकरी सोडून मी माझी लँब सुरू केली. तेव्हा आम्ही रहात असलेल्या टाउनशिप मध्ये नविन प्रशिक्षक योग सधना शिकावयास येत असतं त्या वेळीही माझे शेड्युल व्यस्त होते. पण मी दुपारी ३-४ या वेळेत क्लास जाँईन केला. पंरतु अचानक माझे लग्न जमले व माझा क्लास पूर्ण झाला नाही. पण इथे मी माझा योग अभ्यास पूर्ण केला. म्हणजे मला त्यावेळी प्रत्येक योगासने चांगल्या रितीने येत होती. त्यातील  सर्व श्वसन प्रकार मी आत्मसात केली होती.नंतर तोच क्लास मला मी रहात होते तेथून रहात  जवळच सुरू झाला होता. पण नविनच लग्न झाले होते म्हणून करता आला नाही.

प्रेग्नसीच्या वेळेला सकाळी व संध्याकाळी डाँ. कडील योग प्रकार शिकायला जायला जमले नाही.

त्याचे वाईट वाटले. व डिलीवरीला त्रासही झाला.

मुलगी ५ वर्षाची झाल्यावर सायकलिग, स्विमिंग, बॅटमिंटन, योगासना, दररोज मुलीला शाळेत घेवून जाताना व येताना चालणे.व घरातील सर्वे कामं हे माझे नित्यनियमाने झाले. मुलगी १२ वर्षाची झाल्यावर तीही योगासने  करू लागली. आम्ही संपूर्ण येगासना ह्या पुस्तकाचा तपशीलवार अभ्यास करून नित्यनियमाने योगासने करत असू. मुलगी १०वीत गेल्यावर आमची परत जोडी तुटली , ती सकाळी शाळेत गेल्यावर मी योगासना करत असे. पण दुपारी मी तिला क्लासला घेवून जात असे.( उरण-मुंबई )व  आम्ही रात्री येत असू. त्यामूळे तीला योगासने करायला वेळ मिळत नसे. मी योगासना बरोबर सुर्खं नमस्कार,करत असे दररोज ५ सुर्यनमस्कार वाढवत दररोज ५५ सुर्यनमस्कार करत असे. मुलीची १०वीची प्रिलीयम परिक्षा सुरू असताना,माझ्या पायाच्या बोटाला ठेस लागल्या मुळे बोट फँक्चर झाले. व थोड्या वेळा पूरते माझे सूर्यनमस्कार, व योगासन थांबले. परत मुलगी काँलेजला जावू लागल्यावर सकाळी १ तास चालणं, सुर्यनमस्कार, योगासना चालू होते. लाँकडावून सुरू झाल्यापासून चालणं,बंद व योगासना अनियमीत झाले आहेत. थांबून  वैयक्तिक कारणाने किंवा थोडा ब्रेक घेवून मी तरीही नियमीत/अनियमित ३० वर्ष योगासनां करत आहे. त्यात सुर्यनमस्कार मला सर्वात आवडते आहे. मग कधी करताय तूम्ही योगासना शिकायला  सुरूवात. 


वर्षा पाटील ©️®️

उरण. 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4