नूर भाग ४


 नूर ही न्यू इयर पार्टी बद्दल उत्सूक होती. तिलाही त्या पार्टीचे आकर्षण होते. एवढ्या मोठ्या होटल मध्ये ती कधी गेली नव्हती. तिथला शाही थाट तिला अनोळखी होता, पण तिथे जाण्यासाठी तिला साजेसे कपडे लागणार होते. रात्री तिने लवकर कामे आटपून जूने कपाट उघडले त्यात टाळेबंद केलेली संदूक होती तीने ती उघडली. त्यात तिच्या लग्नातील लेंहेगा होता, तो परत तिने कधी घातला नव्हता. ह्यापेक्षा चांगला व महागडा पेहराव नूर कडे नव्हता. पण खडीचे काम असलेला हा पेहराव नक्कीच पार्टी साठी योग्य होता. 

बाबाला सांगून , त्याची न्यू इयर पार्टी साठी परवानगी मागून, नूर दुसर्या दिवशी होटल मधून सरळ घरी न येता बाजारपेठेत गेली, निळ्या ड्रेस साठी निळ्या बांगड्या व खड् यांच कानातले व नेकलेस खरेदी केला. हे खर्चिक होत, पण नुकतेच तिला खेळण्यांचे पैसे मिळाले होते. व मोठ्या पार्टी साठी अनिवार्य होतं, 

न्यू इयर पार्टी ला जाताना नूर ने आपल्या बरोबर काम करणार्या मुलीला बरोबर बोलवलं होतं, 

निळ्या रंगाचा लेहगा त्यावर खड् यांचे वर्क व कानात गळ्यात खड् यांचे नेकलेस, हातभर निळ्या बांगड्या डोळ्यात काजळ, ओठावर लाली नूर एखाद्या राजकन्येसारखी सूंदर दिसत होती. 

दोघी होटल पशी पोहचल्या, बाहेर रंगीत बल्बचे तोरण लावून सर्व होटल सुशोभित केले होते. हळू आवाजात कोणतं तरी गाण लागले होत, बाहेर पोर्चमध्ये टेबल मांडली होती त्यावर पांढरेशुभ्र क्लोथ अंथरले होते. ते सर्व पाहून दोघीही अवघडून गेल्या. नूर ल तर तिथूनच पळून जावसं वाटलं, पण होटल मधील मुलांच ल़़क्ष गेलं, त्यांनी दोघींना जिथे पार्टी चालू होती त्या हाँल मध्ये आणून सोडले. लगेच दुसर्या नी हातात ड्रींक आणून दिलं. मुकादम सहीत सर्व स्टाफ पार्टीत हजर होता. नूर ल आता थोडं बर वाटलं, आता ती सर्वात मिसळून गेली. पार्टी बिझनेस पर्पज ने होती त्यामुळे पार्टीत मालका सारखेच उंची लोक होते. त्याचे पेहराव ही शाही होते. पण त्यांच्यातही नूर सौद्यर्या मुळे उठून दिसत होती. पाठीवर बकेट घेवून पान खूड़़णारी नूर, बकर्यांच्यात मूल होवून खेळणारी नूर व पार्टीतील नूर मालकाला वेगळीच भासली. त्याचे संपूर्ण लक्ष तिने वेधून घेतले. 

पार्टीत ३ भाग चा मोठा केक मधोमध ठेवला होता. सर्वत्र फुले लावून सभागृह सुशोभित केल होत. वेटर सतत ड्रिंक घेवून पार्टीत फिरत होते. मालकांनी केक कापला, सर्वांनी टाळ्या वाजवल्या. सर्वांन केक वाटण्यात आला. मग अर्थात सर्व पोर्च मध्ये बुफे डिनर साठी वळले. पार्टीची रंगत वाढली होती. लोक हसून खेळून सर्व गोष्टींचा आस्वाद घेत होते. नूरने वडिलांनी बनवलेली लाकडी मूर्ती व स्वत: रंगवलेले पोट्रेट भेट म्हणून नविन मालकास भेट म्हणून दिले. त्याने ही तिने दिलेल्या भेटीचा आनंदाने स्विकार केला. 

नूरला मात्र आता अस्वस्थ वाटू लागलं रात्र उलटून गेली. तिला मुलाची चिंता वाटू लागली. पण पार्टीत  तल्लीन झालेल्यांना मात्र ती कुणाला काही बोलू शकत नव्हती तिने धीर करून एकटीच निघण्यचा निर्णय घेतला. पोर्च ओलांडून जात असताना तिला तिच्या ओळखीतील वेटरने पाहीलं, लगेच त्याने मालकाला मी तिला  घरी सोडून परत ड्युटीवर येतो सांगितलं. पण मालकांनी त्याला तिथेच थांबवले. व स्वत: गाडी काढून होटल बाहेर आला. नूर रस्त्याला लागली होती. त्याने तिच्या जवळ जावून गाडी थांबवली. नूर कावरीबावरी झाली. तिला आपली चूक लक्षात आली. ती कुणालाही न सांगता निघाली होती. व तरी पकडली गेली होती. ती संकेताने गाडीत पूढील सीटवर बसली....... 

क्रमशः

⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

वर्षा प्र पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4