प्राजक्त(पहाटे चंद्र नभातच असतो, तेव्हाच्या स्थितीचे वर्णन)
पिठूर चांदणे त्यात चंद्रमा,
आज अंगणात माझ्या उतरला
स्वागतासाठी रविकिरणे ही
त्यात सम्मिलत झाली.
काय हा अभास
की फितुरी ही
की मिलनाचा
हा भास होता,
सुहास हा मंद पसरे
केसरी ही हळूच डोकवे,
प्राजक्त हा हळूच पहुडला
मंद वार्याच्या झुळकेतूनी
वाळके पर्ण ही,
नभीचा चद्रमा दिसे.
क्षणभर चाले खेळ हा
भास अभासांचे,
मला वाटे दारी माझ्या
लख्ख चांदण्यात चंद्रमा
येई मिलनातून रवी किरणांच्या........................
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹वर्षा प्र पाटील©®
उरण नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा