ती

   अजूनही ती तशीच आहे का?

   सोन चाफ्याच्याफूलापरी!

   अजूनही ती तशीच दिसते का?

   मावळत्या सूर्यकिरणांनीआरक्त

     झालेल्या आकाशापरी!

     तीच आमची सखी होती.

     तीच आमची मैत्रीण होती.

      अजूनही ती तशीच अवखळ हासते का?

     खळखळत्या निर्मळ झऱ्यापरी!

     मोरपिसी स्पर्शाविना अजूनही ती तशीच 

      लाजते का?

     मी ही कुठे इथे मस्त आहे,

     मी ही इथे कोमजलो आहे,

     बकुळीच्या फुलापरी!

     पण राखून आहे गंध तयाचा!

      जेव्हा स्पर्श होता मखमली!

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Varsha patil. ©®

Bsc DMLT. 

9819406813

Uran.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4