नूर भाग ५
नूरच्या घराच्या थोड्या लाब अंतरावर त्याने गाडी थांबवली ,व बोलायला सुरूवात केली. मी तूझी व तूझ्या मुलाची जबाबदारी घ्यायला तयार आहे सांगून, त्याने आपल्या खिशातून डायमंड रिंग काढली व तिला ह्या आठवड्यातच तूझ्या वडिलांना भेटायला मी माझी आई घेवून येतो. तो पर्यंत ही अंगठी प्रेमाची भेट म्हणून तूझ्या बोटात राहू दे सांगितलं. नूर सठी हा एक आश्चर्याच धक्का होता. तिला हे सर्व स्वप्नवत वाटत होतं.
रविवारची 💛 सोनेरी सकाळ उजाडली नूर ने अंगण सारवले. छान सुबक रांगोळी दारात काढली. ओट्यावर बांध लेल्या बकर्या झाडाजवळ बांधल्या घर धुवून पुसून स्वच्छ केलं. बाळाला न्हाउ माखू घालून छान नटवलं,स्वत: नहाणं आटपून तयार झाली. बाबाला जाणीव करून दिली. वडीलही नीटनेटके कपडे घालून तयार झाले.
नूरच्या दारात गाडी थांबली, त्यातून एक वृद्ध स्त्री बाहेर पडली. तिने सिल्कची सोनेरी किनार असलेली पांढरी शुभ्र साडी परिधान केली होती. चेहर्यावर सोनेरी कडा असलेला चश्मा घातला होता. अर्थात ती अनिषची आई होती. बरोबर अनिषही गाडीतून उतरला, त्याने हलकेच झाडाखाली बांधलेल्या बकरीच्या पिल्लाला(कोकरू)हात ✋लावला. बकरीने शहारून बँ... केलं. दोघही नूरच्या घरात शिरली.....
समाप्त.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा