उध्वस्त
तू तूझ् आयुष्य उध्वस्त करताना,
माझ ही केलस् ,
तूला ते कळले की नाही.
कारण आपण एकाच धाग्याच्या
दोन टोकांना बांधले गेलो होतो.
कदाचित! एखाद्या अवचित क्षणी
आपण एकमेकांना भेटणार होतो.
एकमेकांच्या हातात हात गुंफणार होतो.
अति धाडसाने ! दोन्ही कडून खेचले गेलो.
तुटलो!
खोल गर्तेत जावून पडलो.
वर्षा पाटील©®
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा