विष
मलाच मी एकदा भेटून गेले
वदले, इथेच समोर रिचवले
विषाचे प्याले.
मी विस्मयाने पाहीले,
विस्मृतीचे एक एक पान उलगडले
बालकास न उमजली मेख,
उदकाची तृष्टता मोठी
जल समजून विषास केले प्राशन,
परि हरी, तू साथ ना सोडी,
तयाचे रंगच न्यारे,
पून्हा भेटून आठवून देशील सारे
ती तर तुझीच बाललीला रे
तूला, मला पून्हा भेटावेसे वाटे,
ह्यातच आले सारे... . ...
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
वर्षा प्र. पाटील. ©®
उरण (नवी मुंबई)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा