आई
Afternoon 12:00 06/02/15 To Arina
आई काय असते?
मी तूला का सांगावे?
ते मूलीनेच समझावे.
चांगल्या वाईटीची जाणीव
करून देते.
कधी रागावते,
कधी पाठीत धपाटे घालते.
कधी ऐकत नाही, म्हणून
त्रागा करते.
अशी आई मला का आवडवी?
मी फूलपाखरू होवून बागडावे,
पक्षी होवून आकाशी झेप घ्यावी,
मासा होवून पृथ्वीचा तळ गाठावा,
तर मग हीने मला का दटवावे?
आई देखील एक मूलगीच असते.
थोडी काळाने ठोकारलेली,
थोडी अनुभवाचे निखारे हातावर
घेवून वाट चाललेली!
तीच वाट चालताना तू
ना कुठे धडपडावे,
ना कुठल्या किटकाने तूला भक्ष्य करावे,
ना कुणी तूझे पंख छाटावे!
पाण्याविना तूला कुणी ना तडफडावे,
म्हणून दिपस्तभांसारखे तूला मार्गदर्शन करणारी!
पण तूला कसे ते रूचावे?
तूला वाटते हीने माझ्या रस्त्यात,
मधे मधे का यावे?
जेव्हा तूझ्या-
हातावर असलेली आईच्या
मायेची पकड सैल पडावी
कळीचे तू फूल व्हावे,
भ्रमराने तूला सतवावे,
आईचे मग बोल आठवावे,
सहचर्याला तू निवडावे,
आईचे तू आईपण घ्यावे,
तूच बरोबर म्हणून डोळे टिपावे,
इतुके होईपर्यन्त तू थांबावे,
आई काय असते समझावे,
पण................
तो पर्यंत आई कुठे असते?
ती शिकवता शिकवता
थकलेली असते.
मध्येच हात सोडून देवापाशी
जावून बसलेली असते.
गालातल्या गालात हसत
म्हणते कशी गंमत केली?
आता हवी काग आई?
पहा ना, तूझ्या हातातल्या
कळीतून मी तूला
दटावते आहे का?
खरंच!
आईचे आईपण समझायला
एका जन्माचे दान द्यावे लागते.
Varsha Patil. ©®
Bsc( Micro) DMLT.
9819406813
Uran

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा