एक संवाद: वटवृक्ष आणि हिमालय
Dt.9/6/95
Varsha Patil
Uran
एकदा एका विस्तिर्ण वटवृक्षाने जोमाने वाढायला सुरूवात केली. आपण उंच उंच जाऊन त्या गगनाला भिडायच खूप काही सांगायच,आकाशाला भिडल्यावर खूप काही पहायच,वाढता वाढता त्याला दिसला हिमालय, अरे ! हा तर आपल्याहून उंच आहे हजारो मैल ,बहुतेक हा आकाशाला भिडलेला.
वटवृक्षाने हिमालयाला विचारले, हे तूझे रूप पाहून मी मोहीत झालो आहे. अन तू किती नशीबवान आहेस ,इतक्या उंचावरून कस दिसत हे जग? अन आकाशाशी गप्पा केल्यास ? त्याच हे उंच दूरवर राहण मला आवडत.
हिमालयाने एक सुस्कार सोडला,!
वटवृक्ष म्हणाला : मला याहून आता आणखी काही वाढता येत नाही ,तेव्हा असं कर तूच मला रसभरीत वर्णन करून सांग अन माझा आणि आकाशाचा सुसंवाद घडवून आण.
हिमालयाने आपल बोलण सुरू केल,,हे दोस्ता जस तूझ्या मनात आकाशाला गवसणी घालायचे विचार आले तशाच ध्येयाने मी प्रेरीत झालो होतो. अन दुप्पट तिप्पट वेगाने वाढायला सुरूवात केली.उंचच उंच ! पण अजून मी गगनाला गवसणी घातलेली नाही हे आकाश अजूनही माझ्यापासून हजारो वर्ष दूर आहे . आणि मला सत्य समजून चुकले आहे. मीच काय कुणीही त्याला भिडू शकत नाही, अन इतक्या उंचावरून मला दिसलं ते नेत्रसुखद पेक्षा दु:खवणार अधिक आहे. तूझ्या दृष्टीक्षेपात जो प्रदेश येतो तितकच तूला दिसत. त्यातील सूख आणि दू:ख़ तितकच तूझ जग .पण ! .... हे जग तूझ्या कल्पनेहून खूप मोठ आहे. माझ्या नजरेतून हजारो मैल दूरच दिसत, पण मित्रा! ह्या पृथ्वीवर सूख नजरेत न दिसण्याएवढ अन सभोवताली फक्त दू:ख आणि दू:खच! हे मला पहावत नाही.
माझ्या दृष्टीने दिसणार जग हे देखिल त्या आकाशाच्या दृष्टीत येणाऱ्या जगाहून खूप लहान आहे ,आणि मी जेव्हा आजूबाजूला दु:ख संहार नाश पहातो, तेव्हा डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, माझ्या सारखा पहाड देखिल हे दु:ख पाहु शकत नाही . जवळून वहात जाणारी ही गंगा माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आहेत.
पण ह्या सर्वात एक सूख आहे, जेव्हा मला इतरजण पाहतात, तेव्हा सर्वाना वाटत अहाहा! किती सुंदर हा पहाड ह्याने तर आकाशाला ही छेदले!
माझ्या स्वप्न, ध्येय पूर्ण झाले नसलं तरी त्याच्या पूर्णत्वाचा एक आभास निर्माण झाला आहे. तो समाधानाचा क्षण मी जपून ठेवला आहे.
ह्या आकाशाने पूर्ण जगावर आपल् चराचर धरले आहे. त्याच्या छत्र छायेखाली सार जग विसावल आहे, म्हणजे त्याच्या समोर जगाच दु;ख उघड पडले आहे. आणि हे "आकाश", पृथ्वीवरील दु;ख पाहून कधी मुसमुसत, तोच तू पाहणारा रिमझिम पाउस . असह्य होवून धाय मोकलून रडतो, तेव्हा प्रचंड तांडव करणारा पाउस!
आकाशाला वाटत आपल्या ह्या अश्रूने सर्व दु:ख धुवून जातील, दु:खाला कारणीभूत असणारी पापे वाहून जातील, पण..........
हे ऐकल्यावर वटवृक्ष स्तब्ध झाला, मी आहे तिथेच , आहे तसाच बरा आहे, जास्त दु:ख पेलवणर नाही, उंच जाण्यात
सुखापेक्षा दु:खच आधिक..........
समाप्त
वर्षा पाटील©®
Bsc(micro) DMLT.
उरण
९/६/९५
9819406813
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा