माझ शहर, /माझ गाव.

 माझं, शहर जगाच्या, देशाच्या नकाशावर छोटसं न दिसण्या,इतपत छोट,. पण मुंबई शहरापासून जवळ. त्यामूळे त्याला महत्व प्राप्त झालेलं. तुरळक वस्ती असलेलं. मी लग्न होवून गेले, तेव्हा मला जवळ जवळ सर्वच ओळखायचे. ४ वर्षातच मी परत आले. पण मला एक गोष्ट जाणवली. इथले रस्ते निर्मनुष्य झालेले, सगळी लोक गेली कुठे? 

झाडावरून पक्षी उडून गेलेली ,पानगळीतील झाडाचे शेंडे कसे बोडके, भकास दिसतात. तसे माझ्या शहराचे झाले होते. पण जे लोक कुणी राहिले होते, ते मला पहिल्या सारखेच ओळखत होते. आणि अचानक! शाळा सुटावी, व रस्ता भर मुलांचे जथ्थे दिसावेत, तशी माणसं दिसू लागली. मुंगीलाही शिरायला जागा नसावी. इतकी माणसं सर्व अनोळखी, माणूसकी नसलेली, काय कमवायला आली ?आणि काय मिळवायला? कुठून आलेली? कशाचा थांगपत्ता नसलेली. हवरटा /आधाश्या सारख सगळं लुटत बसलेली. 

आज १५ वर्षांनी परत हेच गाव, / शहर सोडायची वेळ माझ्यावर आली. अनोळखी लोकांनी मला काय दिलं? आणि काय हिसकावून घेतलं,? काय हिशोब केला? काय न्याय केला?....... 🌹

प्रथम मी ज्या गावात  जन्म घेतला, मी लहानाची मोठी झाली. ते गाव दूर दूर पर्यत माझ गावचं, नाही. जिथे हसले खेळले, ते मित्र  ,सखे ,माझे नव्हतेच! तर माझे शत्रू होते. 

जे शिक्षण मी घेतले ते, माझे नव्हतेच.....? मग त्यामुळे मिळणारा व्यवसाय, नोकरी दूरच.... 

ज्या नातेवाईकांच्यात मी वाढले, मोठी झाले. ते त्याच्यावर पूर्ण विश्वासून ! पण...... ते माझे नव्हतेच. ते माझे कुणी ही लागत नाहीत. केव्हढा मोठा विश्वासघत!! 

पानिपतच्या लढाईत विश्वास मारला गेला, त्यानंतर विश्वा स ठेवताच कशाला? 

४-६ कदाचित १०वर्षानी मी परतून आले तर... 

भरगच्च लोकांच्या  गर्दीत रस्त्यात कुणीही माझ्या ओळखीचे असणार नाही. 

कदाचित रस्ते परत शांत निर्मनुष्य होतील, एखादा त्रयस्थ रस्त्यात भेटेल. पण तोही ओळखीचा नसेल. 

कदाचित मी परतून ह्या शहरात येणारच नाही. जे जे ह्या शहराने अंगा खांद्यावर वाढवताना मला दिले. ज्या अलंकाराने सजविले, ते काढून घेतले. 

बागेत जमणारी फुलपाखरे, पतंग, भवरे,मधमाशी फुलाभोवती पिंगा घालतात. मध गोळा करतात. आणि परत निघून जातात. जाताना परागकण, मध तेव्हा घेवून जातात. 

इथे फक्त कटू आठवणी माझ्याच गावात परक्यानीं धाडसाने येवून दिलेल्या.....

माझ्याच शहरात मला अनोळखी करणार्या. 

हे घडत असताना फक्त माझा गाव मुक रुदन करत होता का?....... 

माझे पूर्वज दु:की झाले असतील का? हेच तुझे प्राक्तन म्हणाले असतील..... 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤वर्षा प्र. पाटील. ©®❤

❤उरण नवी मुंबई❤


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4