पूर्नजन्म भाग :३
पूर्नजन्म भाग: ३
हळूहळू घरातील पाहुणी मंडळी ज्याच्या त्याच्या घरी परतू लागली. आणि मेधाने आपण संध्याकाळी गावात फेरफटका मारून यायचे ठरवले, गावातील शांत ,अल्हादायक वातावरणात मन प्रसन्न करणारे होते, दोन्ही बाजूला झाडी आणि मधे गावची वळण वाट आणि अशी ही नाग मोडी वळण वाट थेट समुद्रावर संपत होती. दोघे फिरत असताना, अचानक एक हवेली रस्त्यात लागली. ती जीर्ण झालेली असली तरी तिचे सौन्दर्य जाणवत होते. पूढे प्रशस्त जागा होती. मेघाला त्या जागेच कुतूहल वाटलं, पण रमणने त्या हवेली बद्दल सांगायला नकार दिला. आहे जूनी पडीक माडी त्यात काय एवढ सांगायचं करून तो विषय टाळला, व ते समुद्रावर फिरण्यास गेले, वाळूत किती वेळ त्यांनी घालवला, दिवे लागण्याची वेळ झाली , ते त्यांना कळलच नाही. दोघेही घरी घाईघाईत परतले. पण घरी ओरडा हा खावाच लागला. आईने अरे! दिवे लागणीपर्यत थांबू नकोस लवकर परत ये सांगितले होते ना?. म्हणून लाडकी दम दिला. त्यात काळजी ही होतीच.
रात्रीची जेवणे झाली. सर्व जण अंगणात गप्पा मारण्यास जमले, मुले पत्ते खेळत होते. यशदा चीडचीड करत होती. तिला झोपावण्यास मेधा तीच्या खोलीत गेली. उद्याच्या सामानाची बांधाबांध दुपारीच झाली होती. पण काही राहिलंय का म्हणून तिने जूने कपाट उघडले. खालचा कप्पा खूपच भरलेला होता. कधीपासून तो रमणनने साफ केला नव्हता, आता वेळ आहे म्हणून आपण खाली न जाता स्वच्छ करूयत ह्या विचाराने तिने तो कप्पा व खण बाहेर काढला.त्यात त्याचे शालेय जीवनाा पासूनचे सामान होते. त्यांनी बनवलेली पोर्ट्रेट होती. काही कविता, लेख, डायरी त लििहीलेले होते. डायरी चााळता चाळता डायरीतून एक लग्न पत्रिका पडली. लग्न पत्रिका इतकी सुुुुबक होती. त्यावर सुंदर मोरपीस कोरले होते. संपूर्ण पत्रिका सुवर्ण अक्षरात लिहीलेली होती. इतकी आकर्षक लग्न पत्रिका छापील नव्हती, तर स्वत:च्या हाताने चित्रीत केलेली होती. इतकी सुबक देखणी पत्रिका तिने प्रथमच पाहिली होती. अनेक पोट्रेट स्त्रियाची होती. पण तिला ती लावण्यवती ओळखता येत नव्हती. लग्नात किंवा उत्सवात अशी एकही स्त्री नव्हती. एक पोट्रेट मात्र लग्नातील जोडप्याचे होते. त्यातील पुरूष रमण सारखाच भारदस्त होता. इतकच नाही तर त्याची चेहरापट्टीही किंचीत रमण सारखीच होती. पण असा पुरूष ही तिने कार्यक्रमात पाहीला नव्हता.
इतक्यात रमणची एन्ट्री खोलीत झाली. उद्या लवकर उठून जायचे आहे, काय करतेस ?अलगद पत्रिका डायरीत टाकून पटापट पोट्रेट झाकून तिने ते सर्व कपाटत टाकले. व डायरी आपल्या पर्स👜 मध्ये सरकावली. खण व कप्पा स्वच्छ करून कपाट बंद🚪 करून झोपी गेली.
पहाटे लवकर तयारी करून चौघे मुंबई ला निघाले, एक पूर्ण दिवस आराम करून दोंघानांही आपापल्या नोकरीवर रूजू व्हायचे होते.
क्रमशः
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा