कंपनी भाग ८

भाग ७ वरून पूढे चालू

वरंवार   बैठकीच्या बैठकी वाड्यावर झडत होत्या. अनेक मतलबी, कारस्थानी निर्णय घेतले जात होते. घोडे उधळल्या सारखे अनेक जण बे मतलब पळत होते. गावात धूळीचे लोट उडवत सरकारी अधिकारांच्या गाड्या येत होत्या, वातावरण उत्साहाचे असलं तरी लोकांना ठावूक होतं, खोट्या पैशाचं अमिष दाखवून त्यांच्या तोडचा  घास काढून घेतला जात होता. काळी आई एकदा घेतली की परत मिळणार नव्हती. त्यांची कोठार आता कायम रिती पडणार होती.आणखी भलतीच कुजबूज तरुणात चालली होती. नोकरी पेक्षा नवनविन बांधकामे  रस्ता, टाक्या , मातीच्या भरावाची कामे, मिळवून ठेकेदार बनून जास्त पैसा कमावला जावू शकतो, व ते मिळवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची चढाओढ लागली होती. सर्वांच लक्ष आता बांधकाम करण्याची कामे मिळवण्याकडे लागले होते. गावात एकी राहणार नव्हती. कारण सर्वांना आपला खिसा खुळखुळ वाजणारा हवा होता. 

अशीच एक  सरकारी अधिकार्याची गाडी धूळीचे लोळ उडवत गावात शिरली ,पण ती डोंगराच्या दिशेने न जाता वाड्याकडे वळली. आई साहेबांनी धाकट्या मुलाला तातडीने निरोप पाठवून बोलावून घेतले, गावात कंपनी येते हे त्यालाही माहीत असले, तरी घरच्या गोष्टी त्याच्याही कानी घालायच्या होत्या.. . . 

सर्वजण परत एकदा घरातील निर्णय घेण्यासाठी देवघरात जमले होते, आतापर्यंतच सर्व जमिनजुमला, सर्वांच्यां मालकीचा होता. आणि सर्वांना ते माहीतही होत. आता त्या 

खोलीतील शांतता भंग करत आई साहेबांनी बोलायला सुरूवात केली. मी काही निर्णय घेतलेत. त्यात काही बदल करायचे असतील तर ते सुचवावेत, पण मला मान्य असतील तरच ते स्वीकारीन. कुणीही त्यावर काही न बोलता आई साहेब काय बोलतात, ते ऐकू लागले... 

जागेचा मोबदला म्हणून पैसे वाटणे, तालुक्यात तहसील मध्ये सुरू झाले होते. ते पैसे ताब्यात घेणं गरजेचं होतं व त्यासाठीच आईसाहेब त्यांचा निर्णय सांगत होत्या..... 

पूढे मी हयात नसेन तेव्हा सरकार कडून मिळणारे पैसे,जागा ह्यांची मला वाटते तशी योग्य वाटणी केली आहे. पैसे माझ्या खात्यात जमा झाले, तरी त्याचे ४ समान भाग करून ३ मुलांना तीन व एक माझ्याच नावावर राहील, माझ्या अडल्या पडल्याला मला कुणाकडे मागायला लागू नयेत म्हणून, पण नंतर जे शिलकी राहतील ते मोठ्या मुलाच्या मुलीला देण्यात येतील. कारण मुलीचे शिक्षण वडिलांकडील पैशात झाले तरी तिच्या लग्नाला घरातील पैसे हवेत म्हणून. कारण १० वर्षानी ज्याकडे पैसा त्याच वर्चस्व राहणार होते, धाकट्या मुलाला शहरात छान नोकरी होती. सरकारी नोकरी तिने जावयला दिली. कारण शेतावर घरचा माणूस म्हणून तो राबला होता.पण रिटायर्ड मेंट पर्यंत त्यांना वाड्यावर रहावं लागणार होतं, आणि १/३ पगार घर खर्चाला द्यावा लागणार होता.त्यांना नोकरी करणं आवडत नसेल तर मग मात्र मोठी सून/मुलगी ह्यांचा विचार करण्यात येणार होता.

जमिनीचे मात्र ३ नच भाग करणार होती, तिन्ही मुलांसाठी. मुलीचा  जमिनीचा भाग  मात्र, मुलीच्याच नावे राहणार होता. वाडा इतका भव्य होता की त्याच्या वाटण्या करायची गरज नव्हती, रिटायर मेंट नंतर  धाकटा मुलगा वाड्यावर येवून राहू शकणार होता..... 

सर्वांना आई साहेंबाचा निर्णय मान्य होता.... 

क्रमश:

वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई. 


  ीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीीी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4