कंपनी भाग ११
कंपनी भाग १० वरून चालू
वहिनी साहोबांचा धाकटा मुलगा फक्त उच्च शिक्षित नव्हता तर त्या कडे चांगली नोकरी व अनुभव होता, चांगल्या टेक्निकल लोकांचा स्टाफ त्याच्या हाताखाली काम करत होता, वेळेला त्याला त्यांचा उपयोग करता येणार होता, त्या शिवाय त्याच्या कामावरच्या कंपनीत , खूप सारे मोठे कंत्राटदार येत होते, त्यांच्याशी त्याची चांगली ओळख होती, ती ओळख त्याला स्वत:च्या व्यवसायात उपयोगी येणार होती
टेंडर उघडण्याचा दिवस आला, भिवाच्या मुलाला छोटे मोठे .कंत्राट मिळाले होते,पण हाय रे दुदैर्व! कोटीचे टेंडर धाकट्या मुलाला मिळाले नव्हते. शेजारच्या गावातील अशाच एका उच्च शिक्षितानी ते मिळवले होते, खूप सारे दबाव आणले गेले, बाचाबाची झाली पण पाटलापेक्षा कमी टेंडर भरून ते मिळवले गेले, पाटलाच्या टेंडर मध्ये काही त्रुटी होत्या, एक तर त्यांचे दाखले, पेपर, खरे तर मुंबई च्या पत्यावर होते, तेथे उभे राहून देखरेख करण्यासाठी असणाऱ्या वहिनीसाहेब ह्या घरदांज होत्या त्यामुळे त्या स्वत: कंपनीत जाणे शक्य नव्हते, पाटील तातडीने पाटीलकीचा राजीनामा देणे शक्य नव्हते, धाकट्या मालकाचे पेपर गावच्या पत्यावर करणे शक्य असले तरी ते तातडीने करणे शक्य नव्हते. त्यामुळे हार मानून कंत्राट सोडावे, लागले, गावी स्थाईक होण्याचे स्वप्न धाकट्या मालकाचे हुकले होते, त्याने मुंबई ला परत जाण्यासाठी सामानाची बांधाबांध केली.
क्रमश:
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा