पूर्नजन्म भाग ५
पूर्नजन्म: भाग : ४ वरून सुरू
दुसर्या दिवशी त्याच्या बाँसने फॅमिली पार्टीचे आयोजन केले होते. सकाळी मेधाला कामावरून लवकर येवून आवरून तयार रहा, आपल्याला पार्टी ला जायचे आहे सांगून गेला
संध्याकाळी नविन चांदीच्या करडींतील कुकंवाने तिने (हेअर स्टाईल )करून भांग भरला, केसात घुंगरू चं फूल घातल, आणि उत्सवात मिळालेली सुंदर बुट्टयांची सिल्क ची साडी नेसली, मुलगी व शितल तयार झाली. रमण आँफीस मधून आल्यावर लगेचच तयार होवून पार्टीला निघून गेले. खर तर मेधा आज खूपच वेगळी दिसत होती. ती कधीही केसात भांग भरत नव्हती, हेअर स्टाईल करत नव्हती जातायेता जसे यशदाचे पैंजण वाजत होते, तसेच तिच्या केसातील फूल वाजत होतं. हळूहळू पार्टीत ही रमणला डोके दुखायचा त्रास होवू लागला, नी तो ह्या कोलाहलात आपण नक्की कसल्या आवाजाने अस्वस्थ होतो ते शोधू लागला. त्याला घुंगरूच्या आवाजाचा त्रास होत होता, त्याला रात्री गाडी चालवत घरी जायचे होते. तो अस्वस्थ होवून मेधाला घेवून बाल्कनीत गेला, तिथे त्यांनी तिच्या केसातील फूल बाल्कनीतून फेकून दिले. मेधाने आवंढा गिळून पार्टी सोडून बाहेर गेली. सगळे घरी निघाले, खाली गाडी रस्त्यात थांबवून रमणने यशदाचे पैंजण काढून खिडकीतून फेकले, दोघीसाठी तो प्रकार भयानक होता, घरी पोहचताच मेधाने उग्र रूप धारण केले. त्या वस्तू महागड्या होत्या काढून फेकायची काय गरज होती. वापरू नकाेस इतके सांगितले असते तर पुरेसं नव्हते का? घरी आल्यावर आपण नीट बोलू शकलो असतो की नाही? त्यावर रमणने तिच्या एक कानाखाली लगावली. रमण कडून मार? हे मेधाने स्वप्नातही स्विकारले नसतं असं असताना...
शितल ही खूप घाबरली. माझ्या डोक त्या आवाजाने भणाणून निघतय आणि तूला स्वस्त आणि महाग सुचतंय ! मेधाला तो रूद्र अवतार फार भयानक वाटला, हे खरे आहे की स्वप्न? आमच्या संसाराला अशी कुणाची दृष्ट लागलीय. मेधा रडून रडून झोपी गेली. सकाळी मेधा आँफीस ला जायला उठली नाही. रमण स्वारी बोलून कामावर निघून गेला. कित्येक दिवस त्यांच्यात अबोला चालू होता....
यशदा मध्येच पायाकडे बोट दाखवून पैंजण हवेत म्हणून सांगत होती ....
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा