जीवन घडण: भाग १,२,३,
जीवन घडण:भाग १
आपण लहानपणी खूप लोकांत( नातेवाईक, शेजारी) मिसळलो की त्यांचे विचार ,सवयी , शिक्षण ह्याचा आपल्यावर पगडा बसून आपण चुणचुणीत होतो, मग आपल्या हुशारीवर (अपवाद)आपल्याला उच्च शिक्षण प्राप्त होते . त्याने चांगली नोकरी, व्यवसाय मिळतो, त्यामुळे अनेक चांगले लोक आपल्या सानिध्यात येतात, शिक्षण, अनुभव ह्याने विचारात प्रगल्भता येते.
🌹🌹🌹
जीवन घडण भाग:२
ती आपल्याला चांगल्या श्रेणीचे निवडण्याची सवय लावते. मग आपण इतरांना संस्कारीत करण्याचा प्रयत्न करतो, व आपल्याला विरोधक तयार होतात, आपण तर चांगलेच विचार पूढे न्यायचा प्रयत्न करत असतो, मग विरोध का? तर वैचारिक दरी, भेद, पातळी, या मुळे आपण किताही चांगले विचार मांडले तरी त्या विचाराला विरोध करणारी / ते विचार न समजू शकणारा एक सामान्य सामाजिक स्तर असतो.
🌹🌹🌹
जडण घडण भाग:३
दोघात एक सूक्ष्म वैचारिक रेख तयार होते. विरोधाला कटाळून तुम्ही तुमचे मत /भाष्य, करणे टाळता,विरोध मावळतो,तूमचे विचार आतल्या आत कोंडले जातात,जिवाची तगमग हेाते. चांगले विचार संस्कार लोप पावायला लागतात,हे सहन न होवून तूम्ही धारदार लेखणी उचलुन लिहावयास सुरूवात करता.आणि जे बोलून सांगून होत नाही. ते लिहून ,वाचून होते,मत परिवर्तन,लेखकाचा पगडा,वैचारिक प्रगल्भता आणि मनाला घडवणारे संस्कार...
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा