पूर्न जन्म भाग ७

 

पूर्नजन्म भाग ६ वरून पूढे सुरू, 

मेधाची सासुही घाईघाईने तिच्या खोलीत गेली. तिचा ताप पाहून काही घरगुती काढे घेवून आली. तासाभराने ताप उतरून खणखणीत बरी होईल असे वाटले, पण काही फरक पडेना फक्त मेघाला गाढ झोप  लागली होती. सकाळी सासरे स्वतः डाॅक्टर कडे जावून डाँ. घेवून आले, डाँ. ने इंजेक्शन, काही औषधे 💊💉लिहून दिली. संध्याकाळ झाली तरी मेधाचा ताप उतरत नाही, म्हंटल्यावर रमणला 📞 केला, तातडीने ये, म्हणून निरोप पाठविला, रात्री, नोकरा करवी दही ,भात(आंबट भात) अंगावरून ओढून समुद्रच्या रस्त्याला फेकला., पहाटे आजे सासूने मीठ मोहरीची दृष्ट काढली. पण मेघाला आराम मिळेना, मग मात्र सासु, आजेसासुनी शितलला वेठीस धरले खरं सांगायचं तुम्ही समुद्रावर कुठे कुठे गेला होतात.  शितलने  झालेला वृतांत कथन केला. मेधा काहीही न विचारता वर्षानुवर्षे  वैर असलेल्या लोकांच्या जागेत फक्त कुतूहल म्हणून गेली होती........ सासूने भल्या पहाटे खणा, नारळाच्या ओटीसह देवीच्या देवळात जावून नवस बोलून आली. येताना गाभ्यारातील कुंकू , , विभूति आणून मेधाच्या कपाळाला लावली, औषधे चालू होतीच, 

 कामावरून सुटून रमण गावी आला, अचानक मेधा एवढी आजारी पाहून त्याची हालत खराब झाली, त्याने यशदाला उचलून पापा घेतला, रात्री कुणालाही जेवण जाईना सर्वजण चिंताग्रस्त झाले,  गेले ५ दिवस मेधाचा ताप उतरत नव्हता ,दुसर्या दिवशी मुंबईला  हाँस्पिटलमध्ये न्यायचे ठरविले, आणि मध्यरात्री मेधाचा ताप उतरला, तिला खूप अशक्त पणा आला होता. पण ताप पूर्ण उतरल्याने सर्वांचे चेहरे खुलले, रमणने स्वत:ची सुट्टी वाढवून घेतली. मेधाचा ताप उतरला तरी यशदाला तिच्या खोलीत येवून देत नसे शितल खेरीज तिला सांभाळायला आता तिचा बाबाही होता. आठवड्याभरात मेधा व्यवस्थित  हिंडू फिरू लागली, सासूने तूझा दुसरा जन्म झाला हो!आमच्याही तोंडचे तू पाणी पळवले होतेस, किती घाबरवले,होतेस, आम्हाला!!म्हणाली. तेव्हा आजेसासुला बिलगत मेधा म्हणाली आजी ज्या जागेत गेल्यामुळे मी इतकी आजारी पडले त्या जागेचे नी आपल्या घराचे रहस्य तुम्ही ह्या नात सुनेला नाही का सांगणार? 

आजी बोळक्यात हसली नी मग गंभीर चेहरा करून म्हणाली, अग ! रमणलाही त्या घरचे रहस्य ठावूक नाही, पण मी सांगते आता.... 

तुम्हाला ते कळायलाच हवे

आणि आजी भूतकाळातील कटू आठवणी

 सांगू लागल्या....   

वर्षा प्र पाटील. ©®

उरण, नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4