पूर्नजन्म भाग १
पूर्नजन्म :भाग १
रमण नी मेधा नी आपल्या मुलीच नाव यशदा ठेवलं, नाव जसं छान तशी मुलगीही गोंडस, हसरी, जीव लावणारी, दोघांची नोकरी आणि मुलगी लहान तिला सांभाळायला त्यांनी गावाहून एक मुलगी आणली १७-१८वर्षाची गुणी चुणचुणीत मुलगी. यशदाचा काहीही त्रास नव्हता, गुबगुबीत होती. त्यामुळे घरभर फिरून डोळा चुकवून कुठे जायची भिती नाही. फतकल घालून एकाच जागी बसली तर १/२तास जागेवरून हलायची नाही, फक्त पुढ्यात खाउ, खेळणं असं काही तरी हवं, त्यामुळे कामात चुणचुणीत असलेल्या शितल, ताई साठी काही काम ठेवत नसे, सर्व कामे ती कामावरून घरी यायच्या आधीच आटपत असे, त्यामुळे ती कामावरून येवून फ्रेश होवून मुलीला खेळवत असे. सुट्टीच्या दिवशी एक दिवस शितलचे बाबा घरी आले. चहा, जेवण आटोपल्यावर त्यांनी रमणच्या आईचा निरोप सांगितला गावच्या देवीच्या उत्सवाला मुलीला देवळात न्यायला या. त्याच्याबरोबर २ दिवस आपलीही मुलगी येईल हा त्यामागचा हेतु. निरोपाने दोघेही खूष झाले. त्या निमित्ताने ४ दिवस गावची मोकळी हवा खाता येईल, तसे लग्न झाल्यावर मेधा १ महिना गावात राहिली होती लग्न गावीच ़झालं होतं. पण रिसेप्शन मात्र मुंबईत, ते करण्यासाठी लगेचच मुंबईत यावं लागलं होतं .यशदाचा जन्म, बारस, बाकी सारे कार्यक्रम यथासांग मेधाच्या माहेरची झाले, होते. लग्नानंतर गावी जाण्याचा हा पहिलाच योग, शीतलला तिचे वडील घेवून आले होते. ती कामवाली नसून रमणची एकप्रकारे मानलेली बहिणच होती. व मेेधाची मैत्रीण.
क्रमश:
वर्षा प्र पाटील. ©®
उरण, नवी मुंबई
््र््र््र््््र््र््र्

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा