कंपनी भाग ९
भाग ८ वरून पूढे चालू:
आई साहेबांचे बोलणं पूढे तसचं चालू होत..
वाडा,! वाडा जवळील , मालवा, त्या जागेतील फळाफूलांनी डवरलेली 🌲झाडे🌲🌳🌴 त्याचं उत्पादन ,आईसाहेब जिंवत असेपर्यत तसचं वाड्यातील खर्चासाठी वापरले जाईल, पैसा, भात नाही. म्हणून वाड्यावरुन कोणताही सण बंद होणार नाही. मी नसल्यावर सर्वच्या सर्व तिघांत वाटून घ्यावे किंवा अशीच एकत्र पध्दत चालू ठेवावी. एकही नोकर माणूस वाड्यातून काढला जाणार नाही. व ते स्वताहून जाणारं असतील तर त्यांचा मोबदला देवून त्यांची सन्मानाने रवानगी करावी. हे कधीना कधी करावचं लागणार होतं, त्यातच शहाणपण होतं, पण त्याला कंपनी निमित्त ंंमात्र झाली. ही वाटणी आक्षेपार्ह वाटत नसेल, तर आपण कागदपत्रे ही अशीच करूयात. आई साहेबांचे बोलणं थांबले त्याचा आवाज घोगरा झाला. डोळे पाणावले, आबासाहेबाच्यां मागे त्यांनी खूप खंबीरपणे, धीराने निर्णय घेतला, होता. त्यांची आज्ञाधारक मुले त्यांची चूकही सांगणार नाहीत किंवा हरकत ही घेणार नाहीत. हा निर्णय घेताना त्यांना फक्त एक आबासाहेबाच्यां डाव्या हाताने मदत केली. होती. त्यांनी फक्त भिवाची मदत घेतली होती. कारण गावात जे चाललं होत त्यात फक्त भिवाच एक प्रामाणिक होता. की त्यांनी मी जिंवत असेपर्यत वाड्याला अंतर देणार नाही म्हणून आईसाहेबांना सांगितलं होत.......
आई साहेबांचा धाकला मुलगा जून्या गावातून एकदा फेरफटका मारून यावा म्हणून घराबाहेर पडला, बरोबर अगदीच एकटे नको म्हणून भिवा घेतला, गावातून जाताना धाकले मालक म्हणून लोक हात जोडत होती. हात मिळवत होती, चहा पाण्याला बोलवत होती कधी आलात, म्हणून विचारपूस करत होती. मध्येच एखादा गावातील घडामोडींच वर्णन करत होता. गावचं गावपण अजून तरी शिल्लक होत. एखादा अगदीच नवखा/नवखी स्त्री भिवाला खुणेने कोण? म्हणून विचारपूस करत होते. शेताच्या बांधावर जिथून वाडीवर जायला रस्ता होता, तिथे भराव टाकून सपाटीकरण चालले होते, कामे खूपच झपाट्याने चालली होती. वाडी वरच्या लोकांसाठी छोटी पण पक्क्या विटांची घरे बांधत होते. कंपनी खालची १०० एकर जमिनी सभोवती सध्या तारेचे कुंपण घातले होते. त्यात वीज प्रवाह सोडून सर्वाना सावधानतेचे फलक जागोजागी उभारले होते. त्याच तारेची रेषा धरून उंचच्या उंच भिंत उभारण्याचे काम चालू होते. डोंगरावरचा जनावरांचा पाणवठा तसाच होता. बरीच झाड तोडली होती. तरी रान कायम होतं.
गावाजवळच्या रस्त्याला लागून कंपनीने दिलेल्या शब्दानुसार शाळेच्या इमारतीचे काम चालू होते. भिवाने धाकल्या मालकाला वाडीच्या वस्तीवर आपल्या घरी नेले, बायकोला चहाच आधण ठेवायला सांगितलं, धाकल्या साहेबाला आपलं बालपण आपलं शिवार आठवलं, शाळेत नाजूक चणीचा हुशार मुलगा, कायम शहराचं, स्वप्न पहाणारा! त्यातच रमणारा आता आपल्या गावाच शहर होताना पाहून त्याला गेल्या दिवसात आपण काय हरवलं ते कळलं होतं आता तर ते शोधूनही सापडणार नव्हतं. दिवे 💡 लागणीची वेळ झाली तसे दोघे वाड्याकडे परतायला लागले, भिवा काही बाही गावच्या गोष्टी सांगत होता. पण धाकल्या मालकाचे लक्ष कुठेतरी वेगळ्या विचाराकडेच लागले होते नको नको ते विचार मनात घोळ घालत होते. नोकरी सोडून कंत्राट मिळू शकले तर गेलेल्या वर्चस्वाचे धागे परत वाड्यावर येवून कंपनीवर ही अधिपत्य गाजवता येईल. शिक्षण, पैसा, बुद्धी ह्या जोरावर हे शक्य होत.........
कंपनीने गावच्या पाटलाच्या घरावर वाटण्यांची कुर्हाड चालवली होती. पण तरीही वाडा अभंग राहीला होता. वाड्यावर मजूरी करणारी मुलं आता ठेकेदार बनली होती. १०रूची नोटही माहीत नसणारे खिशात पैशांची पुडकी घेवून फिरत होती. काही परिश्रमाने, हुशारीने, तर काही लबाडीने कंत्राटदार बनले होते.
गावात मिणमिणते दिवे ,पेट्रोमँक्स, पिवळे बल्ब जावून प्रकाश झोताचे दिवे आले होते, खटारे जावून दोन चाकी, चार चाकी ,गाड्या आल्या होत्या, लाल मातीचे रस्ते जावून डांबरी रस्ते आले होते. थोरल्या साहेबांची पाटीलकी तशीच अबाधीत होती. पण त्यांचे वर्चस्व जावून सर्वांचे हक्क समान ़़झाले होते. त्यातच कंपनी गावात येताना कडाडून विरोध करणार्या संरपंचाच्या मुलाला मोठे कंत्राट मिळाले होते. त्यामुळे आता गावातील निवडणूका इमानदारीने न होता. जो जास्त पैसा ओतेल त्यावर होणार होत्या. त्यातूनच गावातील वाद विकोपास जाणार होते. आता वादावादी पाटलाच्या चावडीवर न सुटता नविन स्थापन झालेल्या पोलीस चौकीवर सुटणार होत्या.....
क्रमश:
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा