कंपनी भाग १२
कंपनी भाग ११ वरून सुरू
गावात पद जावून ज्याच्याकडे जास्त पैसा, त्याकडे वर्चस्व आले होते, मोठ्या मालकांचे वर्चस्व जावून सर्वांचे हक्क समान झाले होते.
भिवाच्या वस्तीवर आता वेगळेच वातावरण होते, त्यांच्या झोपड्या पाडून पक्की घरे झाली होती, त्याची मुले शाळेत जावू लागली होती. गावठी दारू जावून इंग्लिश दारू आली होती, कामाने/कष्टाने, कमावलेली शरीर दारूत झिंगत होती. प्रत्येकाकडे दोन,/चार चाकी गाड्या आल्या होत्या. पण आता धुरळा न उडता त्या सुसाट डांबरी रस्त्यावर पळत होत्या. पैसा व चैनीच्या वस्तू सहज मिळत होत्या, तरूणांचे लग्नाच बार उडत होते. भिवाच्या मुलाला नोकरी व कंत्राट दोन्ही मिळाले होते, त्यानेही आपल्या लग्नाचा बार जोरा शोहरात उडवून दिला होता. त्याच्याही घरी इंग्लिश बाटल्या रित्या होत होत्या. भिवा मात्र ह्या सर्वांपसून अलिप्त रहात होता.
भिवा रोज वाड्यावर मळ्यात पाणी सोडायला जात होता. भिवा ओटीवर बसून आई साहेबांना गावच्या घडामोडी सांगत होता. आईसाहेब हातात माळ घेवून 'त्या ' दारात बसून ऐकत होत्या, भिवाला वेळ मिळताच तो धाकट्या मालकीणीला पाठीवर बसवून घोडा घोडा खेळवत होता. घरचाा पसारा आता वहिनीसाहेब व ताईसाहेब सांभाळत होत्या. जावयाचा पगार वाड्यात येत होता. गावचा बराचसा भार पोलीस स्टेशन वर गेल्यामुळे पाटीलकी चे पद नावापुरतेच राहिले होते. गायी गुरं जवळ जवळ लुप्त झाली होती. होती ती रानात चरायला जाण्याऐवजी शहरातील कडबा खात होती. वाड्यावर चे उत्सव नियमीत होत होते. धाकटा मुलगा न चुकता हजेरी लावत होता. पण त्यांला आता कंत्राटा मध्ये स्वारस्य उरले नव्हते. उत्सवाला पूर्वीचे महत्व राहिले नसून लोक नमस्कार करायला, व तिर्थ प्रसादासाठी येत होती. गावात वाड्या पेक्षा मोठे सण साजरे होत होते.
वाड्यावरुन भाजीपाला नियमित शहरात विकण्यास जात होता. छोटी मालकीण काकासारखीच हुशार होती. तीही नविन शाळेत जावू लागली होती. आणि आपला पहिला नंबरही सोडत नव्हती....
वाड्या वरची लगबग संपली होती.
समाप्त.
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा