पूर्नजन्म भाग ११
पूर्नजन्म भाग १० वरून पूढे चालू
दोघे तयार होवून निघत होते इतक्यात.....
संध्याकाळ झाली, पूजेचा मुहूर्त निघून गेला, तरी दोघेही अजून आले नव्हते कुणाला पहायला पूढे पाठवायची सोय नव्हती. काय करावे कळेना एवढ्यात भाऊसाहेबांनी पुढाकार घेवून जयंताच्या बाबांना म्हटले, मी ़जावून पाहून येतो, का? एवढा उशीर झाला, खरं तर त्यांना कालच्या आपल्या चिडखोरपणाची लाज वाटत होती, तशी त्यांनी जयतांच्या बाबांची माफीही मागितली होती. बरोबर दोन नोकर व डा्यव्हर घेवून ते इनामदाराच्या घरी रवाना झाले,
त्यांच्या घरी पोहचताच, त्यांच तसं स्वागत करायला कुणी नव्हतं, पण नोकरने छोटे मालक आहेत का? म्हणून आवाज दिला, बाहेर नंदीनीचा मोठा भाउ आला, नमस्कार करून भाऊसाहेब म्हणाले, नवदाम्पंत्य अजून घरी आले नाहीत, पूजेसाठी सर्वजण खोंळबले आहेत, त्यावर आधी आपण पाहुणचार घ्या मग सावकाश बोलू आपण, असे विक्षिप्तपणाने नंदीनीचा भाउ म्हणाला, तरीही आवाजावर नियंत्रण राखत भाऊसाहेब म्हणाले, आम्हाला वेळ होतोय, बोलवा त्यांना पटकन, तेवढ्यात त्यांच्या घरातील कामवाली ४ ग्लास सरबत घेवून आली, भाऊसाहब व डा्यव्हर ने ते सरबत पिण्यास नकार दिला, म्हणून ते पेले,तिने माडीवर नेले, दोघे खाली यायला निघालेच होते, पण सरबत पिण्यास थांबले.........
पण पूजा आहे सांगितले तरी ते एवढा वेळ थांबले कसे ?भाऊसाहेब म्हणाले, लग्नात घातलेल्या अटी नूसार जर मुलीचा सासरी अपमान झाला असता तर मुलगी जेवली नसती, व परत घरी आली नसती, तूम्ही वर्चस्व दाखवण्यासाठी अटी घालणार नी आम्ही वरा कडील असून तुमच्या तालावर नाचणारे कागदी घोडे 🐴 वाटलो की , काय ? भाऊसाहेब चिडून म्हणाले, तेवढ्यात नंदीनीचे दोन भाउ व पाहुणे शिकारी ला जाण्यासाठी बाहेर आले, त्याच्या हातात जिवंत काडतुसांच्या भरलेल्या बंदूका होत्या, तसेच धारदार तलवारी होत्या,.तसे असेल तर जयंताला बोलवा नी, तुमच्या हुकूमावर नाचणार्या मुलीला ठेवा तुमच्या घरीच! , निवळलेलं वातावरण पार गढूळ झालं, त्याचा धाकटा भाउ क्रुद्ध झाला, त्याने जसं तुम्ही फक्त मुलगा घेवून जाउ शकता तसं आम्ही आनंदाने दोघांना घरजावई म्हणून ठेवून पाेसू शकतो, आणि मुलीसाठी कायमचा तुमचा मुलगा तुमच्या पासून तोडू शकतो, असे म्हणून त्यांने हवेत गोळीबार केला, तो आवाज ऐकून खाली कोण? आलं आहे का ?म्हणून जयंताने कामवाल्या/मैत्रीणीला विचारले, हो तूमच्या घरचे कुणीतरी आले आहे. हे वाक्य कानी पडताच जयतांने सरबत खाली ़़़़ठेवून तो धडपडत खाली आला, भाऊसाहेबांनी जयतांला पहाताच, जयतांला चल लवकर कालच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी आमच्यावर फायरिंग केली आहे, तेव्हा इथे १ मिनीटही न थांबता चल येथून त्यांनी जाताना जयंताचा हात पकडून गाडी कडे वळले. थांबा ! मी नंदीनीला घेवून येतो म्हणून जयतां वळला आणि बहिणीला न घेताच जात आहेत म्हंटल्यावर धाकट्या भावाने भाउसाहेबावर गोळी झाडली, ती गोळी झाडा ला जावून लागली, दुसरा भाउ तलवार घेवून भाउसाहेबावर धावून आला,त्याने जोरदार भाउसाहेबांनवर वार केला./(भोसकले)., पण जयंता आडवा आला, दोघांच्या मध्ये आल्याने तलवार जयंताच्या आरपार गेली, व तो खाली पडला, वरून कामवाली खिडकीतून ुुुुपहात होती, नंदीनीच्या काही लक्षात येण्याअगोदरच तिने नंदीनीला, 'जयतां' तूला घरी जायला बोलवत आहे. घरी तूला काही खाता येणार नाही, पटकन सरबत पी सांगून हातातील ग्लास तिच्या तोंडाला लावला........
खाली कसला आवाज येतोय म्हणून नंदीनीने विचारले, तूम्ही जायला निघाला म्हणून फटाके 🎇वाजवतात, तिचे बोलणे पूर्ण होण्या आधीच नंदीनी भोवळ येवून पडली.
जयंता खाली कोसळला हे पाहून नंदीनीचा भाउ घाबरला, त्या ला जयतांला मारायचे नव्हते, तो बिथरला, त्याने भाउसाहेबावर ३-४ गोळ्या चालवल्या त्यापैकी २ त्यांच्या आरपार गेल्या व तेही खाली कोसळले, हे सारे रागात, व क्षणात घडले संध्याकाळ सरून रात्र चढायला लागली, ड्रायव्हर ने गाडी सुसाट पोलीस स्टेशनला नेली, . ...
एक दिवसापूर्वी ज्या गावात आनंदोत्सव चालू होता, तिथेच पूर्ण गावभर पोलीस पहारा होता, एका गावात ३ माणसे मृत झाली होती, त्यात दोघे गोळी लागून व वार होवून आणि नवरी विषबाधेने मेली, आपला पती आधीच खाली मेलेला आहे हे ही तिला कळले नाही. आपलीच मैत्रिण आपल्याला हे कळू नये म्हणून सरबतातून विष पाजत आहे हेही तिला समजले नाही. ...
क्रमश:
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा