कंपनी : भाग ५
भाग ४ वरून पूढे
काय काम काढल? आईसाहेबांनी चिंतातूर पोराच्या चेहर्याकडे पाहून विचारले , कसं सांगाव कळत नाही? पण आज संध्याकाळी वाड्यावर तातडीची बैठक आयोजित केली आहे. देवघरातील खूर्ची वर बसत मोठा मुलगा आईसाहेबांना म्हणाला, गावात काही भानगडी? दुसर्या खूर्चीत आसनस्थ होत आईसाहेब उद्गारल्या! , नाही पण सरकारने मोठा निर्णय घेतलाय, तालुक्यातून कागद पण आलाय, लवकरात लवकर सरकारला आपली डोंगराखालची सगळी जमीन कंपनी काढायला पाहीजे . आपली एकट्याची नाही गावकीची,वाडी वरील वस्तीची सर्वच जमीन सरकार ताब्यात घेणार आहे.
वाडा, सरपंचाची घर सोडून गावात वीज नाही, मध्येच एखादा खांब सोडला तर रस्त्यावर रात्री उजेड नाही. गावात, वस्तीवर , रस्त्यावर ,कंपनी बरोबर घरा घरात वीज येईल, जमीनीच्या बदल्यात पैसे, घरटी नोकरी व ज्यांची जागा जाईल त्यांना घरासाठी हवी तिथे जागा मिळेल. काळी असली म्हणून काय? झाले! काळी आई विकायची तीही कसदार, अरे भाकड गाय ही कसायाला विकत नाहीत. तीही पोसायला जड नाही तिथे कसदार जमिन विकायची? आई साहेब त्वेषाने म्हणाल्या, जागेचा खरा मालक गेला, तेव्हा जागेला आपल्याकडून सेवा करून घ्यायची नसेल, मुलगा आईसाहेबांचा राग पाहून उतरला, तश्या आईसाहेब वरमल्या. बघू बैठकीत काय निर्णय लागतो ते.....
क्रमश:
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा