पूर्नजन्म भाग ९

पुर्नजन्म भाग ८ वरून

त्या अटी अशा होत्या:

पहिली अट दोघांचे, लग्न खूप ़धामधुमीत व्हायला हवे ,दुसरी अट-ज्या  दिवशी त्यांच्या बहिणीला ह्या घरात अपमानकारक वागणूक मिळेल, त्या दिवशी आम्ही हे लग्न तोडून टाकू. लग्न धामधुमीत करायचे होते कारण इतर  गावांना ते कळलं पाहीजे. की लग्न दोन वैमनस्य असलेल्या घरात होत आहे , असल्या वाह्यात "अटी", त्याही मुलींकडच्या लोकांनी घालाव्यात, हे रमण च्या आजोबांना आवडलं नाही. पण मुलगा बापा जवळ गडगडून  विनंती करू लागला की, ती लोक स्वतः हून तयार झालीत तर कशाला वाकड्यात शिरून माझ्या पसंती वर पाणी फिरवताय, आपल्या मुलाच त्या मुलीवरच प्रेम पाहून ह्यांच्याकडून मान्यता दिली.पण जर अटींना आम्ही तयार झालो नसतो तर अब्रू त्यांच्याच मुलीची जाणार होती, पण आम्ही वैमनस्य न राखता मुलाच्या सुखाकडे पाहीले. मग काय दोन्ही घरात लग्नाच्या जोरात तयारी सुरू झाल्या. जयंतान तर काही ठराविक लोंकासाठी स्वत; चित्रून सुबक पत्रिका तयार केल्या. 💛सोनेरी अक्षरात, मोरपीसाचं सौदर्य त्यावर उतरवलं होतं, मेधाला त्या पत्रिकेचे आणि चित्रातील जोडप्याचे रहस्य उलगडलं होतं, दोन्ही घरात ४ दिवस लग्नाचा बडेजाव चालू होता. आजूबाजूच्या चार गावात त्या ४ दिवसात चूली पेटल्या नाहीत. लोक दोन्ही बाजूने दोन्ही पंगतील आस्वाद घेत होते. सारं, मानपान मनासारखं होतं होते, मुलीकडले काही कमी पडू नये म्हणून काळजी घेत होते.कारण त्यांची श्श्रींमती  लोकांना कळली पाहीजे, आम्ही काळजी घेत होतो, कारण, आपल्याकडून चुकूनही कसले गालबोट लागू नये , आजीने दिर्घ श्वास घेतला, वरात येईपर्यंत  गावच्या  लोकांनी जेवून घेतलं , राहिलेल्यां पाहुण्यांची जेवणं झाली, घरातील लोकांची जेवणं  सुरू झाली. नविन सुन तिच्या खोलीत बसली होती. थोडी छेडछड करण्यासाठी कुणीतरी लहान मुलीला ,तिला जेवणं वाढायला बोलावलं , घरातीलच मंडळी म्हणून सर्व जण बैठक घालून  दिवाणखान्यात खालीच जेवायला बसले होते. नवी नवेली नवरी आली. तिचा भरजरी शालू तिला डोईजड झाला होता. सोन्याच्या तारा होत्या ना त्यात! तिने केसात सोन्याचा खोपा घातला होता तो पूर्ण घुंगरानी बनवला होता, तिचे पैजण पूर्ण घुंगरांचे बनवले होते, श्रींमती कळायला हवी होती ना त्यांची! ,त्या घुंगरांचा चालताना लयबद्ध आवाज होत होता, आणि दोन्ही अलंकाराने तो नाद मोठा  होवून आजूबाजूच्यांचे लक्ष  वेधत होता, नलूच्या नवर्याला ते खूपच खटकट होते. ती जेवणाचे जिन्नस घेवून मधून मधून फेर्यां मारत होती. अचानक तिचा शालू मागून पैंजणात अडकला, ती अडखळली, तिला कुणीतरी मागून खेचल्या सारखे झाले. तिचा तोल गेला,  स्वत:ला सांभाळताना तिच्या हातातील डाळीचे भांडे खाली पडले, जेवायला बसलेल्यांच्या अंगावर सांडले, पण जवळ बसलेल्या भाऊसाहेबांच्या तोंडावर ते उडाले, त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला़ ,नीट चालता येत नाही का? विचारून ते जेवणावरून उठले? नवी नवरी घाबरली, तिला पैंजणामुळे चालताही येईना, बाजूला बसलेल्या नमूने त्यांना जेवायला बसवायचा प्रयत्न केला, आणि रागाने त्याने तिच्या मुस्कटात मारली, रमणची आई पोटूशी होती, दमली होती, ती धावत आली, तिने नवरीचा अडकलेला पैजण काढला, नवरी धावत तिच्या खोलीत गेली,   नमू पण नुकतीच पोटूशी होती, तिचा काहीच अपराध नसताना, तिने थोबाडीत खाल्ली होती, सर्वजण जेवणावरून उठले, जावईबापू थोडं धीराने घ्या जिचा काहीच अपराध नसताना तूम्ही तिच्यावर का 😡राग काढता म्हणून रमणचे आजोबा बोलून गेले, नाही त्या अटी मान्य केल्यात, तिथे ज्यांच्याकडून चूका होतात, त्यांना बोलायची सोय ठेवलीत का?  त्यांना अपमान जिव्हारी लागला होता. त्यांचे बोलणं नवरीने धावत 🏃जाताना ऐकले, या पूढे आपल्या कडून झालेल्या चूकीची शिक्षा दुसर्यला मिळेल हे तिला कळलं, खोलीचे 🚪दार लावून , न जेवताच, ती रडून रडून झोपली. दूसरा दिवस काळ होवून उजाडला, नव्या नवरीला सकाळी माहेरी खांब सोडायला जायचे होते, तर संध्याकाळी दोघांची पूजा होती. तिच्या घरचे तिला न्यायला आले, पण घरातून  तिच्या बरोबर जयंतला पाठवायला कोणीही तयार नव्हते, शेवटी मी दोघांना पूजेला बसायला संध्याकाळी लवकर या म्हणून सांगितले,.... 

तिचा रडून सुजलेला चेहरा, उतरला होता, तिच्या नमस्काराचा कुणीही स्विकार केला नाही. सर्व मागे सरकले, तिला समजून चुकले ह्या घरात आता आपल्याला मान नाही, अपमान सहन करायचा आहे तिने डोक्यातील खोपा, नी पैजण उतरवले, नी जाताना गावाजवळील डोहात फेकून दिले....... 

क्रमशः

वर्षा प्र पाटील. ©®

नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4