कंपनी भाग ७

पान ६ वरून पूढे चालू

आईसाहेब भिंतीला टेकून देवघरात माळ ओढत बसल्या होत्या. माळेचे जप करत असतानाच त्या विचारात ओढल्या गेल्या, पार भूतकाळात जाउन विसावल्या.स्वत:च्या मोठ्या मुलाचं लग्न हे त्यांच्या घरातील पहिले लग्न त्यामुळे ८ दिवस लग्नाचा थाट चालू होता, गावच्या गाव लग्नात सामील झालेली. मुलगी स्वत: मालकांनी पसंद केलेली, खरोखरच १०० नंबरी सोन, रूपानं गुणांनी, सुंदर सुशील सून घराण्याला मिळाली, पण समारंभाला गाल बोट हे लागलं, ताई साहेबांना ही लग्नात एका मुलांने मागणी घातली,खरं तर  तो एक सुनियोजित डाव होता. एका सरळ साध्या शिक्षकाच्या मुलाने लग्नात एवढ धाडस दाखवावे, पण मुलीची ही तिच पसंती असावी. कडक स्वभावाचे वडील नाराज झाले, पण सुंदर सुशिक्षित सरळ साधा मुलगा आई साहेबांना ही आवडून गेला, मुलीच मन मोडून घराणं शोधायचं त्यापेक्षा तिच्या सुखात आपला आनंद, त्यांचही लग्न त्याच मांडवात करून दिलं, पाटलाला खरं तर तो अपमान खूप मनाला लागून गेला. थोड्याच दिवसांत लाडाकोडात श्रींमतीत वाढलेली मुलगी घरी परत आली. आता मात्र आईसाहेबांतील करारी स्त्री जागी झाली, त्यांनी गावकीत मिळवलेला मान असा  कुणी पायदळी तुडवणारं हे चालणार नव्हतं. बायकोच्या प्रेमामुळे मोठ्या घराण्याची अब्रु अशी चव्हाट्यावर येवू नये आबासाहेबांचा, आई साहेबांचा अपमान होवू नये म्हणून, आईसाहेबांनी जावयाला बोलावून घेतलं,त्यांच्याशी सल्लामसलत केली.बायकोच्या प्रेमामुळेच,तीच्या हट्टआमूळए,मोठ्या घराण्याचा अपमान होवू नये.म्हणून ताई साहेबांची मर्जी राखून ताईसाहेबांच्या नवर्याने घर जावई होवून रहाणं मजूंर केले. पण त्या गडबडीत त्यांना आपली तालुक्याची सरकारी नोकरी सोडणं भाग होतं. त्यांनी ते हसत हसत स्विकारले लोकांचे टोमणे, त्याच लोकांशी मैत्री करून त्याच्यात मिसळून संपूष्टात आणले.मोठ्या मालकांशी मित्रत्वाचे नात बनवून त्यांचा डावा हात म्हणून वावरू लागले, त्यांना व्यवहारात  मदत करून सहकार्य करू लागले. सर्व व्यवहार, त्याचे सर्व हिशोब चोख ठेवून आबा साहेबांचा विश्वास संपादन केला. शेतीत रस घेवून, पेरणी ते झोडणी पर्यंत सर्व काळ वस्तीवर राहून जातीने लक्ष घातले, आबा साहेबांसाठी तो जावई नसून धाकटा मुलगाच होता.तो घरातील एक कर्तृत्ववान पुरूष म्हणून सामावून गेला. 

धाकटा मुलगा दिसायला सुंदर अभ्यासात हुशार लहानपणापासून शहराचं आकर्षण शहरात जावून शिकायचा एकच अट्टाहास,उच्च शिक्षण पूर्ण करताच तिथेच साहेबी थाटाची नोकरी पकडली. व आपल्याच बरोबरच्या मुलीशी स्वताच्या पसंतीने लग्न करून गावात परतला,  वडिलांचा राग माहीत असल्यामुळे  घरी येवून माफी मागितली. वडिलांनी माफ केलं पण मुलाशी कित्येक वर्ष बोलणं टाकलं, नंतर मुलगा ़झाल्यावर वडिल निवळले व बोलणं सुरू ़झाल पण अलिप्त पणा कायम राहिला.नंतर १ मुलगी, मोठ्या मुलाला १० वर्षानंतर नवसाने मुलगी झाली. घरात ३ नातवंड ताईसाहेबांना मुलच झालं नाही. सर्व वाड्याचा एकुलता एक वारस वाड्यापासून दूर  शहरात वाढत होता.उन्हाळा ,दिवाळी,  गणेशोत्सव, वाड्यावरील प्रत्येक  उत्सव ,सणांना सहपरिवार येवून वर्षभराचा जिन्नस, चिंच, पापड, लोणची, मसाले, नारळ, भाज्या धान्य, इ. हे सर्व मोठ्या मायेने घरातील सर्व त्यांच्या गाडीत भरत, घराण्याचा वंशज छोटा वारस ह्या वाड्यात कमी वावरत असे तेव्हा सर्व ,आपुलकीने प्रेमाने  भरभरून देत. पण वाडाभर वावरणारी मुलगी गावात वस्तीवर सर्वाना आवडत होती.कारण ती नुसतीच सूंदर नसून लाघवी व प्रेमळ होती. . . .. 

मोठ्या मुलाच्या हाकेने आईसाहेब भानावर आल्या. काळोखात किती वेळ एकट्या बसणार आहात!

.पूढल्या पिढीला जाण्या अगोदरच जायदाद सरकार जमा होत होती. पण त्यावर विचार करून काही उपयोग नव्हता.... 

क्रमशः

वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4